Rajlaxmi Society

Rajlaxmi Society Invest in Rajlaxmi Multistate Credit Co-op Society Ltd & be Assured of Safe & Best Returns!

Rajlaxmi Multi-State Credit Co-operative Society; a multistate co-operative credit society registered with ministry of Agriculture, Department of co-operation by registration number MSCS/544/2012. It was established on 12th June 2000 with a very small capital of Rs. 29700. Initially a venture of Middle Class – 2nd inning players, now an eternal breathe of thousands in Yavatmal and its suburbs of M

aharashtra State. The slogan of Co-operative movement “Long Live Co-operation” has totally been obliterated by this Society and swung into nearest State of Telangana to recognize as a Multi-State Venture just within a decade. Rajlaxmi is now ISO 9001 – 2015 branded for its Quality Management System by International Standards Organization. Our Multistate Society has implemented and Preferred “CORE BANKING TECHNOLOGY”, which result in prompt, quality and accurate services to our customers from any branches.

12/06/2026
🌸 जागतिक महिला दिनानिमित्त समाजासाठी छोटासा मानाचा मुजरा🌸दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यवतम...
10/03/2026

🌸 जागतिक महिला दिनानिमित्त समाजासाठी छोटासा मानाचा मुजरा🌸

दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यवतमाळ शहरातील अग्रेसर अशी राजलक्ष्मी मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे एक छोटासा पण मनाला स्पर्श करणारा उपक्रम राबविण्यात आला.

यवतमाळ शहरातील अनेक महिला रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कडक उन्हात भर रस्त्यावर बसून भाजीपाला व फुलहार विकण्याचे काम करतात. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी त्या दिवसेंदिवस प्रामाणिक मेहनत करत असतात. या महिलांचे कष्ट, जिद्द आणि आत्मसन्मान खरोखरच समाजासाठी प्रेरणादायी आहेत.

याच कष्टकरी महिलांप्रती कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी आपल्या संस्थेच्या वतीने मातीच्या पाण्याच्या बाटल्या (माठाच्या बाटल्या)देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड आणि शुद्ध पाणी मिळावे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या छोट्याशा उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी अनेक महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे आणि आनंदाचे हास्य हेच आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान ठरले. समाजातील कष्टकरी महिलांना मानाचा मुजरा देणे आणि त्यांच्या मेहनतीची दखल घेणे हेच या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट होते.

🌼 “स्त्री ही शक्ती आहे, स्त्री ही प्रेरणा आहे, आणि स्त्री हीच समाजाची खरी उर्जा आहे.”🌼

आगामी काळातही समाजातील विविध घटकांसाठी असेच समाजोपयोगी व प्रेरणादायी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.

🙏 सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏

#महिलादिन

🇮🇳 राजलक्ष्मी पतसंस्थेच्या मुख्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 🇮🇳राजलक्ष्मी पतसंस्थेच्या मुख्यालयात प्रजासत्ताक दि...
26/01/2026

🇮🇳 राजलक्ष्मी पतसंस्थेच्या मुख्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 🇮🇳
राजलक्ष्मी पतसंस्थेच्या मुख्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच संस्थेचे संचालक श्री नितीन भागवते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्थापक, अध्यक्ष, संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय ध्वजारोहण करून देशाच्या संविधानाला अभिवादन करण्यात आले व एकतेचा आणि देशसेवेचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.
🇮🇳 जय हिंद 🇮🇳
#राजलक्ष्मीपतसंस्था #संविधानदिन

आज रोजी कळंब शहरात श्री चिंतामणी जन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आपल्या संस्थ...
24/01/2026

आज रोजी कळंब शहरात श्री चिंतामणी जन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आपल्या संस्थेच्या कळंब शाखेतर्फे महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री तायडे काका व अध्यक्षा सौ. तायडे काकू तसेच संचालक श्री. सवनकर उपस्थित होते. कळंब शाखेतील अधिकारी, कर्मचारी व दैनिक ठेव प्रतिनिधी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते श्री चिंतामणी जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कळंब शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

राजलक्ष्मी पतसंस्थेचा दरवर्षीप्रमाणे हळदी-कुंकू कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. महिलांच...
18/01/2026

राजलक्ष्मी पतसंस्थेचा दरवर्षीप्रमाणे हळदी-कुंकू कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. महिलांच्या सन्मान, स्नेह आणि एकात्मतेचे प्रतीक असलेला हा कार्यक्रम सभासदांमध्ये विशेष आकर्षण ठरला.
या कार्यक्रमाला यवतमाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष कु. प्रियदर्शनी उईके, सौ. सीमा दर्डा, नगरसेविका सौ. रेखा कोठेकर, सौ. कीर्ती राऊत तसेच इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी राजलक्ष्मी पतसंस्थेच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमादरम्यान प्रत्येक महिला सभासदाला व्यक्तिगत लक्ष देत, मैत्री आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाचे रोप भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमधील आपुलकी, स्नेह आणि विश्वास अधिक दृढ झाला. महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत राजलक्ष्मी पतसंस्थेप्रती आपले आभार मानले.
अशा सामाजिक, सांस्कृतिक व भावनिक नातेसंबंधांना बळ देणाऱ्या उपक्रमांमुळे राजलक्ष्मी पतसंस्था ही केवळ आर्थिक संस्था न राहता, कुटुंबवत्सल व विश्वासार्ह संस्था म्हणून अधिक दृढपणे उभी राहत आहे.
🌸 राजलक्ष्मी पतसंस्था – नात्यांमध्ये विश्वास, सेवेमध्ये समर्पण! 🌸

Address

Rajlaxmi Heights, Sankat Mochan Road, Mainde Chowk
Yavatmal
445001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajlaxmi Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajlaxmi Society:

Shortcuts

Share

Category