Kaalikai INDIA

Kaalikai INDIA Kaalikai India has been materialized in FMCG, Household Products, Fabric materials and Health and Li

कालिकाई इंडिया ग्रुपचे प्रकल्प संचालक श्री अभिनंदन गांधी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
30/10/2017

कालिकाई इंडिया ग्रुपचे प्रकल्प संचालक श्री अभिनंदन गांधी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कालिकाई मनोकामना – दिवाळी अंक (वास्तू विशेष)घर बघावं बांधून ही आता पूर्वीपेक्षाही जटील समस्या होवून बसली आहे. शहरामध्ये ...
11/10/2017

कालिकाई मनोकामना – दिवाळी अंक (वास्तू विशेष)
घर बघावं बांधून ही आता पूर्वीपेक्षाही जटील समस्या होवून बसली आहे. शहरामध्ये घर घेणं, ब्लॉक घेणं आता स्वप्न होत चाललयं. विभक्त कुटुंबामुळे परवडणारी छोटी घरं व नंतर कमी पडणारी जागा त्यामुळे घरांच्या मागण्या वाढू लागल्या आहेत. प्रत्येकाची मागणी, गरजा व आवड यांना परवडतील अशी घरे, ब्लॉक, बंगले बांधून देणाऱ्या व्यक्ती व संस्था पुढे येवू लागल्या. आता फक्त चार भिंतींचे घर एवढीच गरज नाही तर त्याही पलिकडे जावून आसपासचा परिसर, शाळा, बाजार, कामाचे ठिकाण यांना जवळ पडणारे, वास्तुशास्त्र केलेले व योग्य सजावट, दिशा प्रकाश योजना सोयीसुविधा यांचाही विचार होवू लागला आहे व त्यासाठी लागणारा पैसा, तो उभा करण्यासाठी लागणारे कर्ज, ते मिळवण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे, ते देणारे बांधकाम व्यावसायिक, सोसायटीज, त्याचे कायदे नियम या सर्व विषयांना समोर ठेवून आपल्या जिव्हाळ्याचा हा विषय कालिकाई मनोकामनाने दिवाळी अंकासोबत हाताळला आहे व परिपूर्ण करायचा प्रयत्नही केला आहे.

कालिकाई मनोकामना मासिक
दिवाळी अंक (वास्तू विशेष)
किंमत : रुपये ९५/- फक्त
संस्थापक- संपादक – श्री हेमंत गणपत रेडीज
प्रकाशक – कालिकाई मिडिया प्रा. लि.
पत्ता : १०२, श्रीकृष्ण पार्क, राघोबा शंकर पथ, दत्त मंदिर जवळ,
चेंदणी, ठाणे (प.) ४०० ६०१
संपर्क : ९८२०७९७८४८ / ०२२-२५३६६३२४
#दिवाळी #अंक #मनोकामना #मासिक

कालिकाई मनोकामना दिवाळी विशेषांक विशेष भेट रेसिपी पुस्तिकेसहीत
09/10/2017

कालिकाई मनोकामना दिवाळी विशेषांक विशेष भेट रेसिपी पुस्तिकेसहीत

20/09/2017

Sunrays Tea brings you the perfect balance of strength and flavor. The tea is unique for the broken leafs which are crushed to give their signature look. Royal Tea is specially handpicked from selected upper Assam quality gardens with makes it ready with natural antioxidants. It lowers the risk of heart ailments and certain types of cancer. Royal tea has an earthly flavor with a strong body and distinct notes. The unique manufacturing process adds to the aroma of the tea keeping your spirits high. We assure the best quality with continued consistency in superiority and taste. Our trademark tea stands out from the other brands in the market as we provide authentic taste and premium quality.

Kaalikai Foundation works to bring about change in the lives of children, youth & vulnerable individuals. We at Kaalikai...
06/09/2017

Kaalikai Foundation works to bring about change in the lives of children, youth & vulnerable individuals. We at Kaalikai Foundation carry out various activities like educating children, providing healthcare facilities & training and conducting camps to train young men & women in skills for livelihood.

संगमेश्वर तालुक्यात कालिकाई फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
06/07/2017

संगमेश्वर तालुक्यात कालिकाई फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.

28/04/2017

‘चल कहीं दूर निकल जाये’
कंटाळलात ना ? या रोजच्या त्याच त्याच कामाला, या शहरी धकाधकीच्या आयुष्याला. आजकाल आपलं आयुष्यच एवढं व्यस्त आणि स्पर्धेचं झालंय की, आपल्याला स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी वेळच मिळत नाही. असं म्हणतात की, ‘खूप जगा, दुनियेचा आनंद लुटा.’ पण आपण पैशाच्या मागे एवढं धावत असतो की, आपण आपलं जगणंच आपण विसरून जातो. आपण नेहमीच वैतागलेले असतो, चाकरमानी असेल ऑफिसच्या त्याच-त्याच कामांना, गृहिणी असेल तर घरच्या छोट्या-मोठ्या कामांना, घरच्या जबाबदाऱ्या पेलून ती अगदी थकून जाते. मुलं असतील तर अभ्यासाला, सगळेच त्रासून गेलेलो असतो. नैराश्येत जगत असतो. या सर्वांचा परिणाम होतो आपल्या कामावर, आपल्या व्यैयक्तिक जीवनावर, आपल्या माणसांवर. मग आता याला पर्याय काय? प्रत्येक गोष्टीला जसं उत्तर असतं तसा आपल्याकडे पर्याय सुद्धा आहे, ‘खूप फिरा, स्वस्थ राहा’. थोडसा वेळ काढून आपण आपल्या माणसांसमवेत, आपल्या परिवारासोबत चार सुखाचे क्षण घालवण्यासाठी एखाद्या शांत ठिकाणी, निसर्गाच्या सानिद्ध्यात रोजच्या आयुष्यातला त्रास विसरण्यासाठी सहलीला जायचं. मग आता कुठे जायचं, किती दिवसांसाठी जायचं, कसं जायचं या सगळ्यांचं प्लानिंग करायला नको का? कोणाला समुद्र किनारा हवा असतो, तर कोणाला नवनवीन शहरं, कोणाला गड-किल्ले सफर करायचे असतात तर कोणाला परदेशात जाऊन ब्रिटीशांचा इतिहास जाणून घ्यायचा असतो. वेगवेगळ्या राज्यांमधल्या, देशांमधल्या लोकांची कला, सांस्कृतिक वारसा, त्यांचे राहणीमान, त्यांचा स्वभाव, त्यांच्या भाषा असं सर्वच जाणून घ्यायचं असतं. यामध्ये पण काही शहरं, त्यातील वास्तू अशा असतात की, काळ कितीही बदलला, नवनवीन पिढ्या आल्या तरीही त्या वास्तूंचा आपलेपणा, त्या वास्तूला जाणून घेण्याची ओढ, आतुरता कायम राहते.
काही दशकांपूर्वीचा काळ असा होता की, लहान मुलांना सुट्ट्या लागल्या की, शहरात असणारी चाकरमानी मंडळी थोड्या दिवसांसाठी का होईना रजा घेऊन गावी जायचे. पण आता हे गावी जाण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. याला कारणही आपणच आहोत. एक तर वाढत्या शहरीकरणामुळे गावे ओस पडली आहेत आणि दुसरं म्हणजे खेड्यापाड्यांचे शहरीकरण होत आहे. त्यामुळे शहर आणि गाव यामधील तफावत आता कमी झाली आहे. बहुतेकदा गावी न जाण्याचं कारण असं की, गाव आहे पण तिथे राहायला माणसंच नाहीत. त्यामुळे आजकालच्या सुट्ट्यांचा बेत हा सहसा गावी जाण्याचा नसून एखाद्या पर्यटनस्थळी जाण्याकडेच आहे.
कालिकाई मनोकामनाच्या या अंकात आपण विविध पर्यटन स्थळांची माहिती तर घेणारच आहोत, पण त्या जोडीला एक कळकळीची विनंती पण करावीशी वाटते. तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यातला शीण विसरण्यासाठी, नवे काही जाणून घेण्यासाठी, मनाची रिफ्रेशमेंट करण्यासाठी खूप फिराच पण नवीन ठिकाणी गेल्यावर तिथल्या नियमांचं पालन करा, स्वच्छता राखा, त्या वास्तूंचं, ठिकाणाचं, त्याच्या सौंदर्यतेचं जतन करा. कारण त्या वास्तुच त्या-त्या शहराचं प्रतिनिधित्व करत असतात. आपण आपल्या घरात, आपल्या सभोवतालच्या परिसरात जशी स्वच्छता राखतो त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण जाऊ, त्या ठिकाणाची, त्या शहराची सुद्धा स्वच्छता राखणं, त्यांच्या नियमांचं पालन करणं ही सुद्धा आपली जबाबदारी नाही का?
चला तर मग ‘खूप फिरा आणि स्वस्थ राहा.’
__________________________________________
तुमच्या सारख्या रसिक आणि चोखंदळ वाचकांनी गौरवलेले "कालिकाई मनोकामना" मासिक आता फेसबुकवर..
हे पेज like करा आणि नियमित अपडेट मिळवा.
https://www.facebook.com/manokamnamagazine/
आणि या मासिकाचे सभासद होण्यासाठी आजच नाव नोंदणी करा.
*संपर्क – ९८२०७९७८४८*

Sunrays washing powder makes white clothes extra white and colored clothes brighter and lets your clothes smell like per...
12/04/2017

Sunrays washing powder makes white clothes extra white and colored clothes brighter and lets your clothes smell like perfume. It is tough on stains but leaves clothes gentle. It protects clothing fabric and color. It leaves your clothes fresh and clean. The fragrance stays on until the next wash. Sunrays washing powder has been designed and fine- tuned to meet the needs of our customers. With its revolutionary laundry technology, Sunrays works hard to remove stains from the fibers of the fabric more easily. Sunrays washing powder is Dermatologically Tested and contains no dyes.

Sunrays washing Powder makes white clothes extra white and colored clothes brighter and lets your clothes smell like perfume. It protects clothing fabric and...

सामाजिक कार्याची जाणीवस्वत:साठी तर प्रत्येकजण जगतच असतो. इतरांसाठी जगणारे खूप कमी असतात. स्वत:साठी जगणाऱ्यांना जग विसरून...
04/03/2017

सामाजिक कार्याची जाणीव
स्वत:साठी तर प्रत्येकजण जगतच असतो. इतरांसाठी जगणारे खूप कमी असतात. स्वत:साठी जगणाऱ्यांना जग विसरूनही जाते. पण जे इतरांसाठी जगतात ते आपल्या कार्याने अमर होतात. पिढ्यानपिढ्या त्यांच्या कार्याचं कौतुक होतं. लोक त्यांना स्मरणात ठेवतात. स्वत:साठी जगलास तर मेलास पण इतरांसाठी मेलास तर जगलास हे प्रत्येक क्षेत्रात आपण पाहतो. परोपकाराची, दुसऱ्यांसाठी काही करण्याची वृत्ती ही प्रत्येक माणसात विद्यमान असते, फक्त तिला तिची जाणीव व्हायला हवी. आपणात जेव्हा आपल्या जबाबदारीची जाणीव होते तेव्हाच मन काही करण्यास उद्युक्त होते. समाजालाही विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार, गौरव समाज करत असतो. त्यांच्या कार्याची दखल समाज घेतो व त्यांना आदर्श मानून त्यापासून प्रेरणा घेणारी नवी पिढीही तयार होत जाते. सामान्य कामही असामान्य रीतीने आपण करू शकतो. त्यासाठी काही वेगळे करण्याची गरज नसते. अनेक सामाजिक संघटनांमधून अनेक कार्यकर्ते कार्य करत असतात. दुसऱ्याचा विचार करणारा व त्यासाठी कार्य करणारा हा नेहमीच मोठा असतो. त्याला ते कार्य करण्याची प्रेरणा कुठून व कशी मिळाली हे पाहणंही रंजक असतं. कधी कधी एखादी छोटीशी घटनाही माणसाचं संपूर्ण जीवन बदलवून टाकते, त्याच्या जीवनाला त्या क्षणाने कलाटणी मिळते, फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे.
पहिला भारतरत्न होण्याचे सौभाग्य ज्यांना प्राप्त झाले ते कै. धोंडो केशव कर्वे. त्यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, व विधवा पुनर्विवाह या समस्यांवर उपाय शोधल्याचे व त्यांच्यासाठी काम करण्याचे हाती घेतल्यावर असे कामही करता येऊ शकते वा केले जाऊ शकते हे कुणाच्या गावीही नसेल. अस्पृश्यता निवारण्यास स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रत्यक्ष केलेलं कार्य असो वा कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटेंनी केलेले कार्य असो याची सुरुवात एका छोट्याशा प्रसंगातूनच झालेली आहे.
सामाजिक कार्य करण्यासाठी काही मोठं काम हाती घ्यायला हवं आहे असं नाही, आपण जेथे आहात व जे करता आहात तेच अधिक उत्तम प्रकारे करणे ही सुद्धा एक समाजसेवाच आहे. समाजसमूह हा व्यक्तींचा बनलेला आहे. एक व्यक्ती जरी सुधारली तरी समाजकार्यासाठी मोठं योगदानच आहे. एक पाऊल समाज पुढे जात आहे हे जाणून घेतलं पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीने स्वत:पुरते जरी एक काम निरपेक्षपणे केले तरी ते राष्ट्राप्रती समाजाला मोठी प्रेरणा देणारे व समाजसेवेतील पाऊल ठरेल. व्यसनमुक्ती, स्वच्छता शिक्षण, सामाजिक शिक्षण याविषयी आपण जागरूकता दाखवली तरीही फार मोठ्या सामाजिक कार्यातील छोटा खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य आपणाला मिळू शकतो पण त्यासाठी जाणीव होणे व जाणीव असणे आवश्यक आहे.
सार्वजनिक ठिकाणी ठेवायची स्वच्छता, प्रत्येकाला दिलेली वेळ पाळणे, खर्चातील काटकसर, विजेची-पाण्याची उधळपट्टी हे जरी थांबवले तरी देशासाठी व समाजासाठी फार मोठे कार्य होऊ शकते. सामाजिक कार्य हे जाणिवेतूनच फुलत जाते. आपण समाजासाठी काही देऊ शकतो ही भावना प्रत्येकात जागृत होते आणि त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक. चला तर मग स्वत:साठी जगण्याबरोबरच समाजासाठीही जगूया. सर्वांचं जीवन सुसह्य करूया. एकमेकांना सहकार्य करूया. ‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे वचन सार्थ करूया.
_________________________________________________
तुमच्या सारख्या रसिक आणि चोखंदळ वाचकांनी गौरवलेले "कालिकाई मनोकामना" मासिक आता फेसबुकवर..
हे पेज like करा आणि नियमित अपडेट मिळवा.
https://www.facebook.com/manokamnamagazine/
आणि या मासिकाचे सभासद होण्यासाठी आजच नाव नोंदणी करा.
संपर्क – ९८२०७९७८४८

नवीन वर्ष हे डिजिटल वर्ष म्हणूनच ओळखले जाईल यात काही शंका नाही. सध्याच्या संगणक युगात डिजिटल क्रांतीचे पडघम गेल्या नोव्ह...
23/02/2017

नवीन वर्ष हे डिजिटल वर्ष म्हणूनच ओळखले जाईल यात काही शंका नाही. सध्याच्या संगणक युगात डिजिटल क्रांतीचे पडघम गेल्या नोव्हेंबर पासून वाजत आहेत. कॅशलेस इंडिया करण्याच्या नव्या संकल्पनेतून डिजिटल इंडिया करण्याकडे नवीन सरकारचा हा दृष्टीकोन संपूर्ण जगात आपल्या देशाला नव्या युगाकडे समर्थपणे घेऊन जाईल. जगातील इतर देशांमध्ये आपला देश आर्थिक गतिमानतेकडे, प्रगतीकडे, वैभवाकडे, समृद्धीकडे जावा, पारदर्शी व्यवहाराची सवय आपल्या जनमानसाला व्हावी व सर्वांना न्याय मिळावा, भ्रष्टाचाररुपी राक्षसाचे निर्दालन व्हावे व सर्व जनतेला न्याय मिळावा याच हेतूने कॅशलेस इंडिया व डिजिटल भारत ही आपल्या पंतप्रधानांची महत्वाकांक्षी योजना आपण सफल करण्यासाठी प्रयत्न करूयात. उद्याच्या बलशाली समृद्ध भारताची बीजेही डिजिटल इंडियात दडलेली आहेत. आपण यात यशस्वी झालो तर ती फार मोठी क्रांती असेल.
यापूर्वीही पौराणिक काळापासून अर्वाचीन काळापर्यंत भारतीयांनी अनेक विस्मयकारक गोष्टी एकत्रितपणे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत व सोमनाथपासून कामाख्या पर्यंत स्वीकारून जे जे नवे ते ते एकसाथ स्वीकारून आपल्या सांस्कृतिक व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन जगताला घडवलेले आहे. २०१७ मध्ये याचेच दर्शन पुन्हा एकदा जगाला घडवूयात व फार मोठ्या क्रांतीचे फक्त साक्षीदारच नव्हे तर सहभागदारही होऊयात. संपूर्ण भारतामध्ये जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती, संपर्काची व्यवस्थाही नव्हती, तेव्हाही या खंडप्राय विशाल देशातील सुज्ञान जनतेने समजूतदारपणे व एक निर्धाराने, एकसाथ, एकमनाने निर्णय घेऊन चित्र पालटलेले आहे. एकेकाळी हा देश गोमांस भक्षण करत होता परंतु नंतर ते शरीरास आणि देशाच्या साधन सेवेतील विनाशकारी आहे हे लक्षात आल्यावर येथील जनतेने सुज्ञपणे निर्णय घेऊन गोमांस भक्षण वर्ज्य केलेलं आपण पाहिलं आहे. आज जगातील सर्वात मोठा शाकाहारी समुदाय भारतात आहे. गौतम बुद्धांच्या शांतता तत्वज्ञानाच्या प्रेमात पडून हा देश एकेकाळी बुद्धमय झाला होता. परंतु परकीय आक्रमणे यांच्यापासून आपल्या संस्कृती व परंपरांचे रक्षण करण्यासाठी केवळ शांततेचा धर्म उपयोगी पडणार नसून आपल्यालाही शस्त्र हाती घेणे आवश्यक आहे, हे उमजल्यावर पुनरुपी हिंदुत्वाचा जयजयकार फटीतल्या आक्रमणाबरोबर गेली दोन हजार वर्ष भारत लढत आला आहे व बौद्ध धर्माचा त्यागकरिता झाला. ह्या समाजाने अगदी अर्वाचीन काळातील अनेक वाईट रूढी परंपरांचा त्याग सामुहिक रित्या व एकत्रपणे केलेला दिसतो. विदेशी वस्त्रांची होळी, त्याग, असहकार, मिठाचा सत्याग्रह हे सर्व निर्णय समाजाला एकत्रित करून घेतलेले होते व कुणीही न सांगता त्याची अंमलबजावणी भारतीयांनी केलेली आपण पहिली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी व कालबाह्य विचार टाळून समाजाने नवी घटना स्वीकारली. या देशाने नेहमीच नव्याचा स्वीकार केला आहे आणि म्हणूनच भारत ह्या जगात श्रेष्ठत्व मिळवू शकला आहे. कॅशलेस इंडिया – डिजिटल भारत ही घटना इतिहास घडवणारी, इतिहासाला कलाटणी देणारी व संपूर्ण भारताचे भविष्य बदलवणारी ठरणार आहे. आपण फक्त सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.
डिजिटल भारतामुळे अनेक वर्षांचे दुर्धर रोग, भ्रष्टाचार, असत्य, विलंब व्यवस्थापन, शिक्षण, समाजकारण, राजकारण, असंतुलन, परंपरा, अंमलबजावणी कार्यवाही यामध्ये शिरलेल्या अनिष्ट झारीतील शुक्राचार्यांना बाहेर काढता येईल. आपली अर्थव्यवस्था गतिमान तर होईलच पण प्रत्येक भारतीयाला त्याचे मुलभूत हक्क अधिक प्रभावीपणे वापरता येतील, उपभोगता येतील.
नवीन वर्ष, नवा उत्साह, नवी दृष्टी, नवी आव्हाने, नवी स्वप्ने घेऊन आशेने आपल्या दारात आले आहे. निराशा, आळस, नकारात्मकता यांना झटकून या नवीन वर्षाचं स्वागत करूया.
नवे वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे जावे ही सदिच्छा.

11/02/2017
Leban Beauty Soap - Beauty Soap for Beautiful Skin
17/03/2016

Leban Beauty Soap - Beauty Soap for Beautiful Skin

Address

101/102 Shri Krishna Park, R. S. Road, Chendni, Near Datta Mandir
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kaalikai INDIA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kaalikai INDIA:

Share