Lokmangal Masale

Lokmangal Masale Lokmangal Masale is a part of larger 'Lokmangal group'. Group is involved in varied activities including Agro-Industries, Banking & Finance, Education etc

The spice industry is extensive and shows promise for growth. More people now opt for ready-to-use spices. Considering this shift and increasing demand, Lokmangal Group has forayed into the fast growing spices industry. A high requirement of workforce has been felt for the production and packaging of the products of Lokmangal Spices. We have employed extensive indigenously available workforce for

the purpose and an additional marketing team. With the launch of more products in the pipeline, the Group aims to dominate the domestic and international markets in the near future.

सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
10/07/2022

सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...
26/01/2021

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...

 #स्वातंत्र्य_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा
15/08/2020

#स्वातंत्र्य_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा

व्हेज कटलेट साहित्य :-उकडलेले बटाटेउकडलेली फरसबी आणि गाजरतिखटपातळ पोहेगरम मसाला अथवा छोले मसालाबारीक रवा मीठतेलसाहित्य :...
27/07/2020

व्हेज कटलेट
साहित्य :-
उकडलेले बटाटे
उकडलेली फरसबी आणि गाजर
तिखट
पातळ पोहे
गरम मसाला अथवा छोले मसाला
बारीक रवा
मीठ
तेल

साहित्य :-
बटाटे उकडून ते मॅश करून घ्या.
त्यात उकडलेले गाजर आणि फरसबी घाला.
त्यावर पातळ पोहे, तिखट, गरम मसाला अथवा छोले मसाला, मीठ घालून सर्व मिक्स करा.
गोळे बनवा तुम्हाला त्याचा हवा तसा आकार द्या आणि शॅलो फ्राय करा.
गरमागरम कटलेट सॉस आणि चटणीसह खायला द्या.

फोडणीचा पाव अथवा ब्रेडसाहित्य :-ब्रेड अथवा पाव (तुमच्या अंदाजाप्रमाणे)तेलकांदाफोडणीचं साहित्यचवीनुसार मीठमिरचीकोथिंबीरसा...
16/07/2020

फोडणीचा पाव अथवा ब्रेड
साहित्य :-
ब्रेड अथवा पाव (तुमच्या अंदाजाप्रमाणे)
तेल
कांदा
फोडणीचं साहित्य
चवीनुसार मीठ
मिरची
कोथिंबीर
साहित्य :-
ब्रेड अथवा पाव व्यवस्थित कुस्करून घ्या
मीठ त्यावरच तुमच्या अंदाजानुसार घाला.
मिरचीचे तुकडे करून घ्या.
एका कढईत तेल ओता.
त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, कडिपत्ता घाला, त्यात चिरलेला कांदा आणि मिरच्यांचे तुकडे घालून व्यवस्थित परतून घ्या.

Step 6: कांदा शिजत आल्यावर वरून ब्रेड अथवा पावाचा चुरा घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.

Step 7: चिरलेली कोथिंबीर वरून पेरा आणि एक वाफ काढून गरमगरम ब्रेड वा पाव सॉसबरोबर खायला द्या.

नवरतन कुर्मासाहित्य :-१) अर्धी वाटी गाजराचे लहान तुकडे२) अर्धी वाटी फरसबीचे लहान तुकडे३) अर्धी वाटी हिरवे वाटाणे , ह्या ...
07/07/2020

नवरतन कुर्मा

साहित्य :-
१) अर्धी वाटी गाजराचे लहान तुकडे
२) अर्धी वाटी फरसबीचे लहान तुकडे
३) अर्धी वाटी हिरवे वाटाणे , ह्या भाज्या उकडून घ्याव्यात .
४) एक वाटी अननसाचे लहान तुकडे
५) अर्धी वाटी सफरचंदाचे साले काढून लहान तुकडे
६) पाव वाटी काजूचे तुकडे
७) पाव वाटी अक्रोडचे तुकडे
८) मलई , व्हाईट ग्रेव्ही
९) पाव वाटी बेदाणे , साखर
१०) खडा गरम मसाला , मीठ
११) दोन टेबल स्पून तूप .

कृती :-
१) एक कांदा चांगला परतून घ्यावा . त्यात उकडलेल्या भाज्या व ड्राय फ्रुट टाकावे .
२) दोन लवंग , दोन दालचिनीचे तुकडे , दोन वेलच्या त्या मिश्रणात टाकाव्यात .
३) थोडेसे पाणी टाकून चवीला साखर , मीठ टाकणे . दोन टेबल स्पून व्हाईट ग्रेव्ही टाकावी . अर्धा चमचा मावा व एक चमचा मलई टाकावी . वरून त्यात कोथिंबीर टाकावी .

02/07/2020
चिकन मलबारी साहित्य :- चिकन चे तूकडे १ कप, तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता १ कप,कांदा चिरलेला २ मोठे चमचे,टोमॅटो चिरलेला १ ...
24/01/2020

चिकन मलबारी
साहित्य :-
चिकन चे तूकडे १ कप, तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता १ कप,कांदा चिरलेला २ मोठे चमचे,टोमॅटो चिरलेला १ लहान चमचा,लसूण बारीक केलेली १/२ चमचा,आलं पेस्ट १ लहान चमचा,लसूण पेस्ट १ लहान चमचा
धना पावडर १ लहान चमचा,जिरे पावडर १ लहान चमचा,गरम मसाला १ लहान चमचा,लाल तिखट १ मोठा चमचा,बडिशेप भाजून केलेली पावडर १ लहान चमचा,मीठ स्वादानुसार,खोबरं तेल ३ मोठे चमचे,खोबर्याच दूध १/२ कप,मलबारी पेस्ट :- कांदा २ मोठे,टोमॅटो १ मध्यम,ओलं खोबरं १/३ कप
काजू १२ ते १५, बडिशेप १ लहान चमचा,जिरे १ लहान चमचा,हिरवी मिरची २, कोथिंबीर १ मोठा चमचा,हळद १ लहान चमचा.
कृती :-
सर्व प्रथम चिकन पाण्यात स्वच्छ करुन घ्या मग कोमट पाण्यात ठेवा
मलबारी पेस्ट चे साहित्य तेलात चांगले भाजून घ्या व त्याची बारीक मऊ पेस्ट करुन घ्या.
आता एक खोलगट भांड घ्या त्यात तेल घालून तापवून घ्या
मग मंद आच करुन कापलेले लसूण घालून परतवून घ्या
मग गरम मसाला , धणे जिरे पावडर , लाल तिखट , मीठ , आलं लसूण पेस्ट घालून चांगल परतवून घ्या
आता कोमट पाण्यातील चिकन,कडिपत्ते चिरलेला कांदा , टोमॅटो घाला व एकत्र करुन ७ ते ८ मि. वाफवून घ्या
मग तयार मलबारी पेस्ट घालून मिश्रण एकजीव करुन घ्या
खोबर्याच दूध घाला व झाकण ठेवून चिकन शिजवून घ्या
आता तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता व भाजलेल्या बडिशेप पावडर घाला व मिश्रण एकजीव करा
चिकन १ ते २ मि. मध्यम आचेवर परतवून घ्या मग आच बंद करा
कोथिंबीर घाला व गरमागरम गरम सर्व्ह करा.
टिप :-
खोबरं तेलाऐवजी रोजच तेल वापरु शकता. अशाच पद्धतीने मटण किंवा मासे बनवू शकता.

Address

Lokmangal House, 8536 A/11, Murarji Peth, Near Old Poona Naka
Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmangal Masale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokmangal Masale:

Share

Category