Lokmangal Co-op. Bank Ltd

Lokmangal Co-op. Bank Ltd Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lokmangal Co-op. Bank Ltd, Financial service, 128, Muraraji Peth, Near Sevasadan School, Solapur.

26/04/2023
लोकमंगल बँक प्रधान कार्यालय येथे आज सकाळी " श्री " चीं महापूजा  सोलापूर जिल्हा-जिल्हा क्रीडाधिकारी, मा. श्री. नितीन तराळ...
18/09/2018

लोकमंगल बँक प्रधान कार्यालय येथे आज सकाळी " श्री " चीं महापूजा सोलापूर जिल्हा-जिल्हा क्रीडाधिकारी, मा. श्री. नितीन तराळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक श्री. दिनकर देशमुख, श्री. प्रशांत अंबुरे, श्री. सौरभ घाडगे यांच्यासह बँकेचे सभासद, ग्राहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकमंगल बँक प्रधान कार्यालय येथे " श्री " चीं प्रतिष्ठापना सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. सुभाष (बापू) देशमुख य...
15/09/2018

लोकमंगल बँक प्रधान कार्यालय येथे " श्री " चीं प्रतिष्ठापना सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. सुभाष (बापू) देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सरव्यवस्थापक, संचालक मंडळ व परिवारातील सदस्य उपस्थित होते.

लोकमंगल बँकेतर्फे गोल्डफींच पेठ, सावरकर मैदान येथील मुख्य शाखेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम बँकेचे सरव्यवस्थापक दिनक...
24/07/2018

लोकमंगल बँकेतर्फे गोल्डफींच पेठ, सावरकर मैदान येथील मुख्य शाखेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख सर व बँकेच्या संचालिका सौ.पुष्पांजली काटीकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाखा व्यवस्थापक श्री. प्रशांत अंबुरे सर, महावीर जाधव सर, बापू साठे सर, किर्ती इन्फोटेक चे अशोक मुलीमनी सर यांच्या सह बँकेचे सभासद, खातेदार कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वृक्ष संवर्धनाची काळाची गरज आहे, तसेच प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे पालकत्व घ्यावे असे आवाहन बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख सर यांनी केले.

लोकमंगल को ‒ऑप बँक व लोकमंगल सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवी कालिदास जयंती निमित्त शुक्रवार दि. १३.०७. २...
17/07/2018

लोकमंगल को ‒ऑप बँक व लोकमंगल सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवी कालिदास जयंती निमित्त शुक्रवार दि. १३.०७. २०१८ रोजी लोकमंगल बँकेच्या प्रधान कार्यालयात काव्य संमेलन आयोजित करण्यात आले. काव्य संमेलनाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना बँकेचे सरव्यवस्थापक श्री. दिनकर देशमुख यांनी केली. यावेळी त्यांनी आषाढ महिन्याचा पहिला दिवस श्रेष्ठ कवी कालिदास जयंतीचे औचित्य साधून मागील ४ वर्षा पासून लॊकमंगल समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्र,कर्नाटक,छत्तीसगड या तिन्ही राज्यात सुमारे २०० पेक्षा जास्त ठिकाणी एकाच वेळी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी कवयित्री सौ. निर्मला मठपती,सो. मनीषा पाटील, सो. विमलताई माळी, सौ.गार्गी काळे व कवी श्री. अतिश पाटोळे यांनी समाज प्रबोधन पर काव्य वाचन केले. काव्यातून सद्य समाजाची स्तिथी मांडली. शेवटी आभार बँकेचे व्यवस्थापक श्री. प्रशांत अंबुरे यांनी मानले. यावेळी बँकेचे संचालक श्री. दिनकर पाटील व्यवस्थापक बापू साठे, महावीर जाधव, सौरभ घाडगे व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदन सुरवसे, धर्मराज मळगे, सौ अनिता जगदाळे,राजू देशमुख यांनी परिश्रम केले.

सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रथम महिला कुलगुरू श्रीमती डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी पदभार घेतल्यानंतर आज लोकमंगल बँक प्रधा...
15/06/2018

सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रथम महिला कुलगुरू श्रीमती डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी पदभार घेतल्यानंतर आज लोकमंगल बँक प्रधान कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली. बँकेच्या कार्यपद्धती व कामकाजाविषयी माहिती घेतली. यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक श्री. दिनकर देशमुख, ह. भ. प महाराज श्री. सुधाकर इंगळे व बँक अधिकारी उपस्थित होते.

Address

128, Muraraji Peth, Near Sevasadan School
Solapur
413001

Telephone

0217-2735503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmangal Co-op. Bank Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share