24/08/2026
आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी, हॉटेल रितेश येथे सायंकाळी 6.00 वाजता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात तीर्थरक्षा शिरोमणी प. पु. श्री 108 आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या चरणी वंदन करुन, दिप-प्रज्वलनाने झाली.
अहवाल सालामध्ये संस्थेचे ठेवीदार, सभासद, हितचिंतक, देशाच्या सीमेचे रक्षण करताना शहीद झालेले सैनिक तसेच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रातील दिवंगत झालेल्या व्यक्तींना संस्थेकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून वार्षिक सभेची सुरूवात करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश फडकुले सर होते. तर मुख्य अतिथी म्हणून नीलकंठ को-ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष श्री. धनराज नोगजा (चार्टर्ड अकाउंटंट) तसेच त्यांच्या पत्नी सौ. निलशा धनराज नोगजा (चार्टर्ड अकाउंटंट) हे उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या व्यवस्थापिका सौ. लक्ष्मी आरगी यांनी दि. १३/०८/२०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तांत वाचन केले. तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वैभव आहेरकर यांनी ३१.०३.२०२६ चे ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक यांचे वाचन केले. सर्व सदस्यांनी त्यास मंजुरी देऊन विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
तदनंतर क्रमाने एक - एक विषय घेऊन, त्याचे यथायोग्य स्पष्टीकरण करून, तसेच सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची, शंकांची समाधानकारक उत्तर देऊन सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाँ. राजेश फडकुले सर यांनी सर्व सभासदांना मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या झालेल्या नफ्यापोटी १२% लाभांश जाहीर केला. सर्व सदस्यांनी टाळ्याच्या गजरात अध्यक्षांचे व मा. संचालक मंडळ यांचे अभिनंदन केले.
सालाबादप्रमाणे विविध परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे संस्थाध्यक्ष, संचालक व सल्लागार सदस्य यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा बुके देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाँ. राजेश फडकुले सर यांनी आपणा सर्वांच्या सहकार्याने व विश्वासाने आपल्या संस्थेने २7 वर्ष पूर्ण केली आहेत आजतागायत आपल्या संस्थेस प्रत्येक वेळी ऑडिट वर्ग "अ" प्राप्त आहे. सोलापूर शहरातील एक नामवंत पतसंस्था म्हणून आपल्या पतसंस्थेची गणना होत आहे. सध्या आपण पन्नास कोटी ठेवींचा टप्पा गाठला आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेची अशीच भरभराट होवो, ही आर्यनंदी महाराजांच्या चरणी प्रार्थना.
यावेळी संस्थेच्या सल्लागार सदस्या व निधी कंपनीच्या संचालिका डॉ. सौ. शिल्पा फडकुले मॅडम, उपाध्यक्ष श्री बाहुबली दुरूगकर, संचालक तसेच सर्व सन्माननिय सल्लागार सदस्य, ठेवीदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री वैभव आहेरकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री निलेश एखंडे यांनी केले.
कार्यक्रमानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.