21/01/2022
*मेडिक्लेम (MEDICLAIM) म्हणजे काय ?*
*अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघातामुळे २४ तासापेक्षा अधिक कालावधी साठी इन्शुरन्स कंपनी कडून दावा / क्लेम घेण्यासाठी एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनीकडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत दाखल करून झालेला सर्व खर्च परत मिळवता येतो.*
*मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात*
*१) खोलीभाडे(Room Rent)*
*२) नर्सिंग चार्जेस (Nursing Charges)*
*३) डॉक्टर तपासणी चार्जेस (Doctor Consulting Charges)*
*४) डॉक्टर फेरी चार्जेस (Doctor Round Charges)*
*५) आय सी यु चार्जेस (ICU CHARGES)*
*६) गोळ्या, औषधे , सलाईन खर्च अर्थात (MEDICINES CHARGES)*
*७) सोनोग्राफी खर्च (SONOGRAPHY)*
*८) एम आर आय खर्च (MRI CHARGES)*
*९) सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन),*
*१०) रक्त-लघवी तपासणी खर्च (Blood Urine Test),*
*११) प्लेटलेस (Platless) पिशवी*
*१२) रक्त पिशवी खर्च (Blood)*
*१३) विशेष लॅबोरेटरी तपासण्यांचा खर्च (SPECIAL LABORATORY TESTS)*
*१४) रुग्णवाहिका खर्च (AMBULANCE)*
*१५) ऑपरेशन थिएटरचे भाडे खर्च (OPERATION Theater Charges)*
*१६) डॉक्टर सर्जरी खर्च ( DOCTOR Surgery Charges)*
*असे व आणखी इतर खर्च मिळतात.*
*मेडिक्लेम काढणे गरजेचे का आहे ?*
*१) अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.*
*२) बँकेत बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.*
*३) बँकेत ठेवलेली FD (एफ. डी.) मोडावी लागते.*
*४) सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.*
*५) शेअर्स विकावे लागतात.*
*६) नातेवाईक मित्र मंडळी यांच्याकडे हात पसरावे लागतात.*
*७) बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते.*
*८) या खर्चां करिता घर, गाडी, जमीन विकताना लोक दिसतात.*
*९) वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.*
*मेडिक्लेम असल्यास*
*१) आपली निश्चिन्तमनाने मानसिक आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटलच्या खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.*
*२) हॉस्पिटलमध्ये deposit भरण्याची शक्यतो गरज पडत नाही.*
*३) बँक, खाजगी सावकार यांच्याकडून कर्ज घ्यायची गरज नाही.*
*४) घर, गाडी, जमीन, प्लॉट, फ्लॅट, दुकान, विकण्याची वेळ येत नाही.*
*५) चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.*
*६) नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडे हात पसरण्याची वेळ येत नाही.*
*७) भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.*
*मेडिक्लेमची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही आणि मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.*
मेडिक्लेम हा प्रथम काढावयाचा इन्शुरन्स आहे.
{Health Insurance Agent}