अंकलेश्वर को ऑप . क्रेडीट सोसायटी लि., अंकलखोप

  • Home
  • India
  • Sangli
  • अंकलेश्वर को ऑप . क्रेडीट सोसायटी लि., अंकलखोप

अंकलेश्वर को ऑप . क्रेडीट सोसायटी लि., अंकलखोप Ankleshwar Co. Operative Credit Society Limited Ankalkhop is established in year 2015.

*अंकलेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी अंकलखोपचा 15% लाभांश जाहीर*                                                            ...
05/10/2025

*अंकलेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी अंकलखोपचा 15% लाभांश जाहीर*
सभा दिनांक 28 /09/ 2025
अंकलेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी मर्या. अंकलखोप ची 9 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
संस्थेला सभासदांचे विश्वासाच्या जोरावर सन 2024 - 2025 या आर्थिक वर्षात रुपये 1 कोटी 6 लाख इतका निव्वळ नफा झालेचा संस्थापक अध्यक्ष मा. राजेश चौगुले यांनी सांगितले. ठेवीदार व सभासदांचे हित जोपासत सर्वसामान्य माणूस आयुष्यात उभा रहावा. अशा उद्देशाने संस्था नेहमी कार्यरत आहे. संस्था सतत 15 टक्के डिव्हिडंट देत असून, यावर्षीही 15% डिव्हिडंट देत असलेली घोषणा मा. अध्यक्षसो यांनी जाहीर केली.
संस्थेकडे अल्पकाळातच आज अखेर 67 कोटी 16 लाख ठेवी, वसुल भागभांडवल 2 कोटी 15 लाख, निधी 1 कोटी ३६ लाख, गुंतवणूक 17 कोटी 24 लाख, कर्ज 42 कोटी 35 लाख, एकूण व्यवसाय 109 कोटी 51 लाख इतका झालेला आहे. संस्था भक्कम पायावरती उभी आहे.
संस्थेने जिल्हा कार्यक्षेत्र घेऊन आष्टा, दुधगाव, सांगली, वसगडे व इस्लामपूर येथे नवीन शाखा सुरू केल्या आहेत. त्या नवीन शाखांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व शाखा व प्रधान कार्यालय पूर्ण संगणकीकृत असून सुसज्ज आहे. संस्थेने सर्व ग्राहकांना अद्यावत सुविधा SMS, RTGS, NEFT, व क्यू आर कोड ची सुविधा पुरवली आहे.
तसेच संस्थेने शेतकरी बांधवांसाठी अंकलेश्वर कृषी व पशुखाद्य विक्री केंद्र अंकलखोप, आष्टा व वसगडे तसेच हायटेक नर्सरी अंकलखोप येथे सुरू करून माफक दरात खते, बि-बियाने, औषधे व दर्जेदार उस रोपे पुरवण्याची सेवा देत आहे.
संस्थेची शंभर कोटी ठेवीकडे वाटचाल सुरू असून लवकरच उद्दिष्ट पूर्ण करीत आहोत. संस्थेने नेहमी 0% एन.पी.ए ठेवण्याची परंपरा जोपासली असून संस्थेला सतत ऑडिट वर्ग “अ” आहे.
सभेचे स्वागत संस्थेचे व्हा. चेअरमन श्री रघुनाथ गडदे प्रास्ताविक संस्थेचे सल्लागार सौ. अरुणा सूर्यवंशी, श्रद्धांजली श्री आप्पासो सकळे सर, अहवाल व नोटीस वाचन श्री रामगोंडा पाटील तर आभार संस्थेचे संचालक कुंभार सर यांनी केले. यावेळी डॉ. उमेश चौगुले, श्री अरुण सावंत, श्री. विकासराव सूर्यवंशी, श्रीमती मंगल मिरजकर, राजेंद्र मोटकट्टे, सचिन लांडगे, सुभाष चौगुलेसर, सुरेश जोशी, तज्ञ संचालिका सौ. शितल चौगुले व ॲडव्होकेट अभिजीत परमणे, सल्लागार श्री.पंडितराव पाटील ,सौ. वनिता सूर्यवंशी उपस्थित होते. सूत्रसंचालक शशिकांत हजारे यांनी केले.

27/09/2025
*अंकलेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या इस्लामपूर शाखेचे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न*इस्लामपूर (ता. १८) : अंकलेश्वर को-ऑप...
21/09/2025

*अंकलेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या इस्लामपूर शाखेचे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न*

इस्लामपूर (ता. १८) : अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या इस्लामपूर येथील सहाव्या शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुनील चव्हाण (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली) व मा.श्री.उमाकांत कापसे (चार्टर्ड अकाउंटंट) व मा. श्री संभाजी पाटील (सह. निबंधक सहकारी संस्था इस्लामपूर वाळवा) व मा.डॉ. सतीश गोसावी (एमडी मेडिसिन) यांनी उपस्थित राहून संस्थेच्या अल्पावधीत झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचे कौतुक केले.

सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेश चौगुले यांनी सांगितले की, “अंकलखोप सारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेली ही संस्था आज लोकांच्या विश्वासामुळे वेगाने विस्तारत आहे. अल्पावधीतच संस्थेने ६५ कोटी ३० लाख ठेवींचा टप्पा गाठला असून सध्या संस्थेचे ३९५० सभासद आहेत. संस्थेचे वसूल भाग भांडवल २ कोटी ६५ लाख, निधी १ कोटी ३५ लाख, कर्जवाटप ४२ कोटी ०१ लाख आणि गुंतवणूक १६ कोटी ०३ लाखांवर पोहोचली आहे. एन.पी .ए 0% आणि एकूण व्यवसाय १०७ कोटी ३१ लाख तर निव्वळ नफा १ कोटी ५ लाख इतका झाला आहे.”आणि सतत १५ % डिव्हिडंट ची परंपरा कायम राखली आहे.

इस्लामपूर सारख्या सहकार नगरीत संस्थेला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, “लवकरच १०० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार करू. या प्रगतीमागे संचालक मंडळ, सभासद व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. आर्थिक साहाय्याबरोबरच शेतकऱ्यांना माफक दरात खते, ऊसाची रोपे, पशुखाद्य पुरवून संस्थेचा मूळ उद्देश शेतकरी व गरजूंचे हित साधणे हाच आहे.”

समारंभाला उपाध्यक्ष रघुनाथ गडदे, संचालिका शितल चौगुले, संचालक राजेंद्र कुंभार, विकास सूर्यवंशी, डॉ. उमेश चौगुले, अरुण सावंत, सचिन लांडगे, अप्पासो सकळे, सुभाष चौगुले, सुरेश जोशी, मंगल मिरजकर, श्री.पंडित पाटील,श्री. अधिक जाधव सौ. अरुणा सूर्यवंशी सौ. वनिता सूर्यवंशी तसेच इस्लामपूर व परिसरातील अनेक मान्यवर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंकलखोप, सर्व सभासद ,ठेवीदार ,कर्जदार व हितचिंतक यांना दिवाळी पाडव्याच्या...
02/11/2024

अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंकलखोप, सर्व सभासद ,ठेवीदार ,कर्जदार व हितचिंतक यांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

संस्थापक चेअरमन ,व्हॉइस चेअरमन ,संचालक व सर्व कर्मचारी

*अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा 15 टक्के लाभांश जाहीर : संस्थापक अध्यक्ष मा.राजेश चौगुले*अंकलेश्वर को ऑप क्रेड...
01/10/2024

*अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा 15 टक्के लाभांश जाहीर : संस्थापक अध्यक्ष मा.राजेश चौगुले*

अंकलेश्वर को ऑप क्रेडिट सोसायटी मर्या अंकलखोप ची ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली
संस्थेला सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात रुपये ७५ लाख १४ हजार इतका निव्वळ नफा झाल्याचा संस्थापक अध्यक्ष मा.राजेश चौगुले यांनी सांगितले. संस्था ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी संस्थेची स्थापना केली असून ३१ मार्च २०२४ अखेर एकूण ठेवी रुपये ३८ कोटी ७३ लाख, वसूल भागभांडवल १ कोटी ७३ लाख, निधी ८५ लाख, कर्जे २९ कोटी ९८ लाख, गुंतवणूक ८ कोटी १५ लाख, खेळते भांडवल ४४ कोटी ६२ लाख, एकूण व्यवसाय ६८ कोटी ७१ लाख व संस्थेची आर्थिक उलाढाल १२६ कोटी २३ लाख इतकी झाली असून सभासदांना नेहमीप्रमाणे १५ टक्के डिव्हीडंट देणार असल्याची घोषणा मा. अध्यक्ष सो यांनी केली.
संस्थेने ग्राहकांना अद्यावत सुविधा SMS, RTGS, NEFT व QR CODE पुरवण्या बरोबरच शेतकरी बांधवांसाठी अंकलेश्वर कृषी व पशुखाद्य विक्री केंद्र अंकलखोप, आष्टा व वसगडे सुरू करून परिसरातील शेतकऱ्यांना माफक दरात खते, बी बियाणे, औषधे व नर्सरी ऊस रोपे पुरवण्याची सेवा देत आहे.
लवकरच अंकलेश्वर क्रेडिट सोसायटीच्या आष्टा, वसगडे येथे शाखा सुरू करीत असून आणखी तीन शाखा सुरू करण्याचा मानस आहे. संस्थेची १०० कोटी ठेवीकडे वाटचाल सुरू आहे संस्थेने नेहमी शून्य टक्के एन पी ए ठेवण्याची परंपरा जोपासली असून संस्थेचा सतत ऑडिट वर्ग 'अ' आहे.
सभेचे स्वागत संस्थेचे व्हा. चेअरमन श्री रघुनाथ गडदे व श्री आप्पासो सगळे सर यांनी केले. नोटीस व अहवाल वाचन संस्थेचे सचिव श्री रामगोंडा पाटील तर समारोप व आभार संस्थेचे संचालक कुंभार सर यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक विश्वनाथ मिरजकर, अरुण सावंत, डॉक्टर उमेश चौगुले, श्री विकास सूर्यवंशी, श्रीमती मंगल मिरजकर, सचिन लांडगे, प्रशांत सूर्यवंशी, तज्ञ संचालक ॲड.श्री.अभिजीत परमने, सौ.शितल चौगुले, सल्लागार सुभाष चौगुले सर व एस के जोशी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री शशिकांत हजारे यांनी केले.

Address

Sangli
416316

Opening Hours

Monday 10:30am - 5:30pm
Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 10:30am - 5:30pm
Saturday 10:30am - 5:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अंकलेश्वर को ऑप . क्रेडीट सोसायटी लि., अंकलखोप posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share