08/04/2022
*Earn And Learn Students* या संकल्पनेची निर्मिती कशी झाली याविषयी-डॉ.लक्ष्मण शिंदे
गेली अनेक वर्षे मी वेगवेगळ्या महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून सेवा करत आलो.महिला महा.तासगाव,विलिंग्डन कॉलेज,महावीर कॉलेज,कोल्हापूर, विवेकानंद संस्थेचे नागठाणे कॉलेज,तळमवले कॉलेज.मिरज महाविद्यालय,
त्यापूर्वी रयत शिक्षण संस्थेचे रामानंदनगर कॉलेज,औंध पुणे कॉलेज,एसजीएम कॉलेज या सर्वच ठिकाणी खूप चांगले विद्यार्थी,सहकारी मिळाले..
प्रत्येक ठिकाणी खूप अनुभव गाठीशी बांधता आले..
कर्मवीर अण्णांच्या कार्याबद्दल पहिल्यापासून नितांत आदर होताच.रयतेत प्राध्यापक म्हणून सेवा करताना प्रा.डॉ.एन.डी पाटील सरांचा अनेकदा जवळून संबंध आला.त्यांची अभ्यासपूर्ण भाषणं ऐकता आली.भाई एन.डी. पाटील हे तर मला कर्मवीर अण्णाच वाटतात.
शिक्षक म्हणून सेवा करत असताना अनेक जुने नवे विद्यार्थी संपर्कात असतात.विद्यार्थ्यांच्यात मिसळण्याचा माझा स्वभाव असलेने मुलं आपल्या अडचणी सांगतात.अनेक हुशार मुलांना शिकायचे असते..पण परिस्थिती नसते..अनेक हुशार मुलींची तर कॉलेज पूर्ण होण्याअगोदर लग्न होतात.
पण शिकून आपली परिस्थिती पालटू पाहणाऱ्या मुलांना पैश्यांची खूप मोठी अडचण येते.अशावेळी ते मिळेल त्या पगारावर काहीही कामं करायला तयार असतात.अशावेळी भांडवली व्यवस्थेत त्यांच्या श्रमाचे तीव्र शोषण होताना दिसते.डीएड झालेले आमच्याकडे बीए करणारे विद्यार्थी खाजगी इंग्लिश स्कुलमध्ये दोन हजार रुपयांमध्ये राबताना दिसतात.एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या मुलांची अवस्था तर पाहवत नाही..
मला स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांमुळे अशा धडपडणाऱ्या मुलांबद्दल प्रचंड आस्था आहे.कारण मी ही शिकत असताना सर्व प्रकारची कामे केली.क्लीरीकल कामापासून इंग्लिश विषयाचे क्लासेस यशस्वीपणे चालवले.सर्व शिक्षण स्वावलंबी पद्धतीने पूर्ण केले.
बऱ्याचदा भेटणारी मुलं
'सर,कुठं जॉब असेल तर बघा प्लिज!'
असं म्हणतात.
गेली अनेक वर्षे दवाखाने,खाजगी शाळा वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी ओळखीचा उपयोग करून त्यांना नोकऱ्या देत आलो.
पण राहून राहून असे काम मागणारे विद्यार्थी आले की प्रा.एन.डी. पाटील यांनी ते प्राध्यापक असताना सांगितलेली गोष्ट आठवायची.त्यांनी सुरुवातीला शिवाजी कॉलेज मध्ये प्राध्यापक असताना स्वावलंबी पद्धतीने शिकू पाहणाऱ्या मुलाना काम मिळावे व त्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा म्हणून खडी पुरवण्याचे कॉन्टॅक्ट घेतले होते.मुले जेवढे तास खडी फोडण्याचे काम करायची तेव्हडे त्यांना पैसे मिळत.त्यांतून ते आपला दैनंदिन खर्च करीत.त्यांचे स्वावलंबी शिक्षण चालू राही..
या पार्श्वभूमीवर मला असे काही करता येईल का याचा विचार करत होतो.आजच्या काळात खडी फोडण्याचे काम तर अशक्य होतं.
सांगली मिरज परिसरात अशा आजी माजी विद्यार्थी मित्रांसाठी काय करता येईल याचा विचार चालूच होता..यातून काही कल्पना सुचल्या त्या प्रत्यक्ष अमलात आणल्या आहेत.आपल्या सर्व फेसबुक मित्रांनी या सेवांचा लाभ घेऊन धडपडणाऱ्या मुलांना मदत करावी ही विनंती
यातील चालु केलेले उपक्रम खाली दिले आहेत.आपण आपल्या सूचना नक्की कळवा,त्यांचे मनापासून स्वागत असेल
*आरोग्यविमा*
आजच्या कोरोनाच्या काळात आरोग्य विमा खूप घेतले जात आहेत.सर्व प्रक्रिया ना भेटता ऑनलाईन पद्धतीने करता येते.अशा health policies स्टार सारख्या सर्व कंपन्यांचे हेल्थ इन्शुरन्स आपण Earn And Learn Students कडून घ्याव्यात ही विनंती.कंपन्या,आस्थापना यातील 25 पेक्षा जास्त संख्या असणाऱ्या संस्थांना अगदी कमी किमतीत ग्रुप आरोग्य विमा..ज्यातून आपला दवाखाण्याचा सगळा खर्च वाचेल.संपर्क-8668690615
*टर्म इन्शुरन्स/लाईफ इन्शुरन्स/जनरल इन्शुरन्स* बएलआयसीसारख्या अनेक IRDA मान्यताप्राप्त कंपन्यांचे सेविंग प्लॅन्स*
आमची मुलं एलआयसी सह इतर कंपन्यांचे चांगले प्लॅन त्यातील मर्यादांसह सांगतात. आपण मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट बँकापेक्षा कमवा शिका योजनेतील आमच्या मुलांकडून विमा,प्लॅन्स घ्यावेत.ही विनंती
संपर्क-8668690615
*कोणत्याही वर्गाचे शैक्षणिक विडिओ*
लंडनला प्राध्यापक असणारे व इकडे येऊन सर्व माध्यमांच्या(CBSE,State,Marathi,Semi etc.) सर्व वर्गाचे उत्कृष्ट अभ्यासक्रमांचे शैक्षणिक विडिओ बनवणारे मित्र योगेश कोरे यांच्या मदतीने हा उपक्रम मुलांसाठी राबवत आहोत.शाळा बंद असल्याने मुलांचा घरीच टॅब,मोबाईल,टीव्ही वर पूर्ण व्यवस्थित अभ्यास व सराव होण्यासाठी शैक्षणिक व्हिडीओ चा पूर्ण डाटा योग्य किमतीत मिळेल संपर्क-866869061
*शेअरमार्केट,कमोडिटी मार्केट,फॉरेक्स मार्केट,क्रिप्टो करन्सी मार्केट संबंधी सेवा*
Share Market Account Opening,Mutual Fund, Trading Tips,SIP मार्गदर्शन याचाही लाभ घ्यावा.
सांगली मिरज परिसरात आता सध्या याच कल्पना आमलात आणलेत,पुढे अजून काही करायचं आहे.
स्वतंत्र फेसबुक पेज आहे त्याला खालील लिंक वर क्लीक करून like करावे..
https://www.facebook.com/proflaxmanshinde/
आपण सगळे नक्की साथ द्याल.
*-डॉ.लक्ष्मण शिंदे*
*9860778100*
*Fb Post*
Earn And Learn Students Movement provides all services under One Roof located now at Miraj