14/05/2021
मित्रानो,
सद्याचा काळ हा काळाने व्याप्त असा हा भयानक काळ आहेच पण ह्याच काळात खरया खोट्या लोकांची पारख करावी असा सुद्धा आहे.अस म्हणतात की विपरीत परिस्थिती मधेच खरे रूप बाहेर येते.
ह्या Corona काळामध्ये बऱ्याच नुकसानी ला अनेकांना सामोरं जावं लागतंय.काहींची जिवलग ,आप्तेष्ट नाहीशी झाली तर काहींचे रोजगार बुडाले तर काही व्यावसायिक देशोधडीला लागण्याच्या वाटेवर आहेत.
अशातच ज्यांच्या घरी positive patient असेल त्यांच्या परिवाराला हॉस्पिटल ची भली मोठी बिले भरण्याची वेळ आली आहे.
ऐपत असेल अशांनी भरली , नसेल त्यांनी कर्ज काढले पणं एक वर्ग असाही आहे की जो वर्षा नु वर्षे अशा प्रकारच्या आपत्ती चे नियोजन म्हणून विमा कवच अर्थात Mediclaim policy हफ्ते न चुकता भरत होते.
परंतु जस जसे पेशंट वाढू लागले पर्यायाने claim वाढू लागले तसतसे विमा कंपन्या सुद्धा काहीतरी खुसपट काढून एक तर claim नाकारू लागले किंवा बिलामध्ये काटछाट करून काही तरी तडजोड केल्याचा तुकडा उपकार म्हणून फेकू लागले.
म्हणून मी आधी , वर म्हणाल्या प्रमाणे विपरीत परिस्थितीत खरे रूप बाहेर येते.
अनेक विमा कंपन्यांनी जी agent ची खोगीर भरती केली होती , त्या खोगिरांची सुद्धा खरी रूप बाहेर येऊ लागली . आणि सामान्य विमा धारकाला केवळ निराशाच पदरी पडली.
जी agent मंडळी आधी अनेक नाती गोती, मैत्री,घनिष्ट संबंध आणि जिव्हाळा ह्यांचा गळ घालून किंवा सुट बूट चा देखावा करून नित्य नेमाने premium घेऊन जात होती, ती मंडळी सुद्धा "असेच असते " म्हणून हाथ वर करू लागली.
ह्या आणि तत्सम अनेक प्रकारच्या व्यथा समोर आल्यावर सांगावेसे वाटते की,
ज्या कुणाला अपूर्ण किंवा असमाधानकारक claim झाल्यासारखे वाटत असेल त्याने कृपया सम्पर्क साधावा .
विना शुल्क मार्गदर्शन करण्यात येईल.
आनंद व्यवहारे
8793446273
9881841880
कृपया आपल्या मित्रा मद्ये आणि ग्रुप मद्ये share करा .