Swami Swaroopanand Sahakari Patsanstha

Swami Swaroopanand Sahakari Patsanstha CLOUD SERVER TECHNOLOGY(AWS) वर आधारीत कोअर बँकींग प्रणालीयुक्त आर्थिक व्यवहार सर्व शाखांशी संलग्न

स्थापना : १९९१

नोंदणी क्रमांक : आरटीजी(आरटीजी)/आरएसआर/सीआर ७०५/ ९०-९१ सन १९९१

कार्यक्षेत्र : महाराष्ट्र राज्य

शाखा :
रत्नागिरी, पावस, जाकादेवी, कुवारबाव, खंडाळा, चिपळूण, पाली, नाटे, साखरपा, मारुतीमंदीर(रत्नागिरी), मालगुंड, लांजा, राजापूर, पुणे(कोथरूड), कोकण नगर (रत्नागिरी), देवगड जामसंडे, देवरुख

स्वमालकीची ७ प्रशस्त कार्यालये

एस.टी. स्टॅड समोर, रत्नागिरी
गाडीतळ रत्नागिरी
जाकादेवी रत्नागिरी
कु

वारबाव रत्नागिरी
खंडाळा रत्नागिरी
मारुती मंदिर रत्नागिरी
राजापूर रत्नागिरी
इतर वैशिष्ट्ये

संस्थेचे व्यवहार कोअर बँक सिस्टीमने सर्व शाखांशी संलग्न
RTGS / NEFT सेवा उपलब्ध
२१ एजंटच्या माध्यमातून दररोज रु.५ लाख ९२ हजाराची पिग्मी जमा
संस्थेच्या सर्व शाखांची प्रारंभीपासून १००% वसुली
एकूण वसुली सतत ५ वर्षे ९९% चे वर
सातत्याने २८ वर्ष ऑडीट वर्ग "अ"
सामाजिक बांधीलकीमध्ये अग्रेसर
स्थापनेपासून नफ्यामध्ये
पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार २०१२
सहकार सुगंध तर्फे प्रतिबिंब वार्षिक अहवाल पुरस्कार २०१५, २०१६
राज्य पतसंस्था फेडरेशन तर्फे दीपस्तंभ पुरस्कार २०१६, २०१७, २०१८, २०१९
अविज पब्लिकेशन तर्फे बँको पतसंस्था पुरस्कार २०१६, २०१७, २०१८, २०१९
स्वामी स्वरूपानंदांसारख्या सत्पुरुषाच्या नावाने स्थापन झालेली ही संस्था आर्थिक क्षेत्रात विश्वासार्ह, अग्रनामांकीत पतसंस्था म्हणून जनमान्यता प्राप्त करती झाली. सन २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला "सहकारभूषण" हा पुरस्कार संस्थेला प्राप्त झाला आणि जनमान्यतेबरोबर राज्यमान्यताही प्राप्त झाली.

16/07/2026
ॲड. दीपक पटवर्धन यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहकार गौरव पुरस्कार  उद्या मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन ३ जुलैरत्नागिरी : म...
03/07/2026

ॲड. दीपक पटवर्धन यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहकार गौरव पुरस्कार

उद्या मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन

३ जुलै
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उद्या ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता नरिमन पॉईंट, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार-२०२६ सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे. या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सहकार चळवळीच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान, प्रभावी नेतृत्व, समर्पित कार्य आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पुरस्कार निवड समितीने ॲड. दीपक पटवर्धन यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष असलेले ॲड. पटवर्धन यांची गेल्या महिन्यातच राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे ते आता राज्यात सर्वत्र पतसंस्था चळवळीचा आढावा घेऊन मार्गदर्शन करत आहेत. या पुरस्कारामुळे रत्नागिरीत सहकार क्षेत्रातील सर्वांनी आनंद व्यक्त केला.

20/06/2026

स्वामी स्वरूपानंदच्या ठेववृद्धी मासाचा आजपासून प्रारंभ ;
ठेव वृद्धी मासाच्या पहिल्याच दिवशी संस्थेकडे २ कोटी ३७ लाखाच्या नव्या ठेवी संकलित. - ॲड. दीपक पटवर्धन

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या २० जून ते २० जुलै ठेव योजनेला आजपासून सुरुवात झाली असून ठेवीदारांच्या अनमोल सहकार्यामुळे संस्थेकडे २ कोटी ३७ लाखाच्या नव्या ठेवी संकलित झाल्या.
आज या ठेव वृद्धीमासाचा प्रारंभ मोठ्या उत्साहाने गुंतवणूकदारांनी केला. संस्थेच्या १७ ही शाखांमध्ये ठेवीदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. १४० ठेवीदारांनी मिळून रुपये २ कोटी ३७ लाखाच्या नवीन ठेवी स्वरूपानंद पतसंस्थेच्या विविध योजनांमध्ये गुंतवल्या. संस्थेच्या आकर्षक योजना ठेवीदारांसाठी नेहमीच पसंतीस पडतील अशाच राहिल्या आहेत.
आज प्रत्येक शाखेत ठेवीदारांची लगबग सुरू होती. त्यांच्या स्वागतासाठी स्वरूपानंदचे कर्मचारी, अधिकारी सज्ज होते. पतसंस्थेची विश्वासार्ह प्रतिमा व गुंतवणूकदारांचा संस्थेबद्दल असलेला स्नेह यातून वाढत जाणारे संस्थेचे अर्थविश्व नेहमीच गतिमान होत जात आहे. हा उत्साह अजून द्विगुणीत करण्यासाठी अधिकाधिक ठेवीदारांनी संस्थेच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करावी असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

17/06/2026
दि.१७/०६/२०२६ रोजी रत्नागिरी दौऱ्यावर असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण,भाजपा आमदार सरचिटणीस योगेश सागर, आमदार...
17/06/2026

दि.१७/०६/२०२६ रोजी रत्नागिरी दौऱ्यावर असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण,भाजपा आमदार सरचिटणीस योगेश सागर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी पतसंस्थेला भेट दिली.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्षपदी नवनिर्वाचित अधक्ष अॅड.दीपक  पटवर्धन यांची बिनविरोध निवड झालेबद्दल अभ...
15/06/2026

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्षपदी नवनिर्वाचित अधक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झालेबद्दल अभिनंदन करताना डावीकडून फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक श्री.वसंतराव शिंदे, संचालक डॉ.भोसले, श्रीवाजे, सुदर्शन भालेराव, महासचिव राजोबा सर, उपाध्यक्ष श्री.डॉ.शिंगी सर,संचालक वासुदेव काळे,संचालक बांगर.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी ॲड.दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवडसंपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पत...
13/06/2026

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी ॲड.दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र व स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज बिनविरोध निवड झाली याबद्दल संपूर्ण राज्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत
युद्धजन्य परिस्थिती इंधनाचे वाढते दर यामुळे अर्थविश्वासमोर एक आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे पतसंस्थांसमोर नवीन आव्हाने उभी राहत आहेत अशा परिस्थितीत राज्यभर १९००० पतसंस्थांना योग्य असे मार्गदर्शन व नेतृत्व मिळाले आहे असे उद्गार भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीशजी मराठे यांनी यावेळी काढले व ॲड.दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केले. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक वसंतराव शिंदे, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष डॉ.शिंगी, महासचिव श्री.राजोबा सर, ज्येष्ठ संचालक श्री.दादाराव तुपकर यांचेसह पतसंस्था फेडरेशनचे राज्यभरातील सर्व संचालक उपस्थित होते.
राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा.ना.उदयजी सामंत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.रविंद्रजी चव्हाण, आमदार किरणजी सामंत, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीणजी दरेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.उदयजी जोशी, आमदार प्रसादजी लाड यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर या पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी यांनी संस्थेला सदिच्छा...
02/04/2026

वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर या पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी यांनी संस्थेला सदिच्छा भेट दिली.

Address

Maharashtra State Highway 4, Police Head Quarters
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 10:30am - 5:30pm
Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 10:30am - 5:30pm
Saturday 10:30am - 5:30pm

Telephone

+912352221263

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Swaroopanand Sahakari Patsanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swami Swaroopanand Sahakari Patsanstha:

Shortcuts

Share

Category