04/06/2020
*सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना आगामी खरिप हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा.*
*महत्त्वाच्या सूचना*
1). *पेरणीची घाई करू नका* पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी.
2)*सरकारमान्य अधिकृत *परवानाधारक व विश्र्वासपात्र* कृषि सेवा केंद्र/ विक्रेता यांचेकडूनच बियाणे,रा.खते, किटकनाशके व इतर निविष्ठा खरेदी करा.
3). बियाणे,खते, किटकनाशके व इतर निविष्ठा *खरेदीचे पक्के बिल / पावती घेण्यास विसरू नका.*
4).खरेदी केलेल्या साहित्य/ निविष्ठाची रक्कम रोख स्वरूपात न देता *धनादेश/ RTGS / PFMS व इतर कॅशलेस पद्धतीनेच अदा करा.*
5).*पिकाची काढणी होईपर्यंत* बिल, टॅग, पिशवी व थोडे बियाणे जपून ठेवा.*काही समस्या उद्भवल्यास* तक्रार दाखल करता येईल.
6)*आपल्याकडे एक- दोन वर्षांचे आतील *सुधारित बियाणे असल्यास* उगवणशक्ती तपासून घ्या व उगवणशक्तीचे प्रमाणात एकरी/ हेक्टरी बियाणे वापरावे.
7). *बिजप्रक्रिया करूनच बियाणांची पेरणी/ लागवड करा.*
8) कडूनिंब निंबोळ्या, आंब्याच्या कोया, जांभूळ बिया, सुबाभूळ बिया, मोहाच्या बिया( टोरी) व इतर झाडे/ *फळझाडांच्या बिया गोळा करून ठेवा.*
9) गोळा केलेल्या बिया *पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्यानंतर अथवा जुलै/ आॅगष्ट महिन्यात* शेताचे बांधावर, सरकारी पडीत जमिन,स्मशान भूमी, रस्त्याचे दुतर्फा ,डोंगर यावर टाकून द्या/ लागवड करून *निसर्गाचा समतोल कायम राखण्यास मदत करा.*
10) * प्रत्येक शेतकऱ्याने आंबा, चिकू,फणस,पेरू, लिंबू, शेवगा, कडूनिंब,कवठ,बेल, करवंद, जांभूळ,साग,सिसम, अर्जुन, गुलमोहर, बदाम, पारिजात,वड,पिंपळ, सिताफळ,मोह, करंज,चाफा, चिंच, बांबू या झाडापैकी *कमीतकमी १० झाडे* आपल्या शेतात लावावीत.आणि गावातील पडीत जमिन, स्मशानभूमी, सरकारी जमीन, रस्त्याचे दुतर्फा लोकसहभागातून/ ग्रामपंचायत मार्फत जास्तीत जास्त क्षेत्रावर वरिल झाडांची लागवड करावी.
11) .*प्रधानमंत्री कृषि सिंचन* *सूक्ष्म सिंचन* योजनेंतर्गत* *तुषार संच, ठिबक सिंचन* योजनेचा लाभ घेण्यासाठी *लवकरात लवकर*आॅनलाईन* अर्ज करा.कमी पाण्यात जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणा.
१2).*प्रधानमंत्री *पिक विमा *योजनेंतर्गत* कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन पिकाची पेरणी/ लागवड झाल्यानंतर विहित मुदतीत पिक विमा अवश्य काढून घ्या.
12) *प्रधानमंत्री किसान सन्मान* निधी* अंतर्गत *पात्र असुनही लाभ मिळाला मिळाला नसल्यास व काही त्रुटी असल्यास संबंधित विभागासी संपर्क साधून अवश्य लाभ घ्यावा.*
13) *गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत* अपघातात शेतकऱ्याचे एक अथवा दोन अवयव निकामी झाल्यास अथवा मृत्यू झाल्यास *शेतकरी/ वारसदार यांना लाभ मिळतो.अशी अपघाती घटना घडल्यास *कृषि विभागाशी संपर्क साधून* आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर करा.याबाबत शेतकऱ्यांना मदत करा.
14) . आपल्या गावातील शेतक- याची कृषि विभाग यांचेकडून *शेतीशाळेकरिता निवड झालेल्या शेतकऱ्यांनी* प्रत्येक शेतीशाळेस आवर्जून उपस्थित राहावे.तसेच प्रशिक्षणास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून *आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी.*
15) *कृषि विभाग व अन्य विभागातील कर्मचारी/ अधिकारी यांचेशी मैत्रीपूर्वक/*सहानुभूतीपूर्वक* आणि आपुलकीने* वागावे.
16) हा मॅसेज प्रत्येकाने तर *कमीतकमी कमी १० शेतकऱ्यांना* सांगावे.*तसेच आपल्या विविध ग्रुप मध्ये फारवर्ड करण्यास विसरू नये.