31/05/2026
शिक्षक हो तुमच्यासाठी २०२६!
पंचतंत्रात एक छोटी गोष्ट आहे — एका राजपुत्राकडे सर्व सुखं होती, पण त्याच्यापाशी विवेक नव्हता. त्याच्या गुरूंनी त्याला जंगलात नेलं आणि एका छोट्याशा दिव्याजवळ बसवलं. गुरु म्हणाले, “हा दिवा स्वतः जळतो, म्हणून दुसऱ्यांना प्रकाश देऊ शकतो.” शिक्षकही असेच असतात की. स्वतः संघर्ष करून विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतात...
म्हणूनच क्रिसेंटने आयोजित केलं शिक्षकांसाठी कृतज्ञतापूर्ण एक सुंदर संमेलन... या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व शिक्षकांचे, प्रमुख वक्ते मा. धीरज डोंगरे व मा. सीमा शिंदे यांचे मनापासून आभार!