Happy Family Insurance Services

Happy Family Insurance Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Happy Family Insurance Services, Insurance Agent, Janaki Plot No 89 Right Bhusari Colony Paud Road Kothrud, Pune.

15/09/2023
रिटायरमेंट / पेन्शन प्लॅन का असावा?पेन्शन : पैसा की म्हातारपणाची काठीकोकणात कितीही दिवस फिरा, मन काही भरत नाही. रत्नागिर...
29/05/2023

रिटायरमेंट / पेन्शन प्लॅन का असावा?

पेन्शन : पैसा की म्हातारपणाची काठी

कोकणात कितीही दिवस फिरा, मन काही भरत नाही. रत्नागिरीपासून थोडं दूर रस्त्यानं गेले की, शेतामध्ये मोठमोठी घरे असल्याचे पाहायला मिळते. एक घर, एक स्टाईल असे कधीच नसते. मोठे घर छोटे शेत, छोटे घर मोठे शेत. आंबे, नारळ, सुपारीच्या बागाच बागा. कोकण म्हणजे आपल्या राज्याचे सौंदर्य आहे. रस्त्याच्या कडेला आंब्याची बाग आणि त्या आंब्याच्या झाडावर असलेले पाडाचे आंबे कुणाचेही मन त्यावर जाईल असं सगळं होतं. मी गाडी थांबवायला लावली. चारी बाजूने आंब्याच्या बागेला कुंपण होते. एक गेट आणि त्या गेटच्या आतमध्ये एक छोटेसे घर होते. मी आतमध्ये आवाज दिला. कुणीही येत नव्हते. मी गेट काढून आतमध्ये जाईन तेव्हढ्यात एक छोटे कुत्र्याचे पिलू अंगावर चाल करून आले. मी अर्धा उघडलेलं गेट बंद केलं. त्या कुत्र्याच्या अंगावर मांस नव्हते, तरी गेटवरचा अख्खा किल्ला तो लढत होता. मी त्या कुत्र्याच्या मागे पाहिले तर एक आजोबा काठी टेकवत टेकवत येत होते. पांढराशुभ्र पोशाख, चेहऱ्यावर कसली तरी काळजी. आजोबा जवळ आले आणि म्हणाले, ‘काय पाहिजे.’ मी म्हणालो, ‘‘आजोबा दोन आंबे द्याल का?’’ आजोबा म्हणाले, ‘‘घ्या ना. तसे मी हे कुणीतरी यावे, आंबे खावेत यासाठी ठेवले आहेत. हल्ली तसे कोणी खायलाही येत नाही.’’ मी एक बोललो आणि आजोबा चार बोलत होते. मी चार आंबे काढले आणि मागे पाहतो तर आजोबा नाहीत. मी आंबे घेऊन गेटपर्यंत जाणार तोच आजोबा एक छोटी बॅग घेऊन आले. आजोबाने आवाज दिला. म्हणाले, ‘‘अहो ही बॅग घ्या. अजून आंबे काढा. घरी न्या.’’ त्यांचा आग्रह खूप झाला. बॅगेत थोडे आंबे घेतले. मी आजोबांजवळ आलो, किती पैसे झाले, असे मी विचारले. त्यावर आजोबा म्हणाले, ‘‘नाही हो, ही बाग मी लोकांनी खावी यासाठी लावली आहे.’’ पुन्हा आजोबा बोलत होते. मी एक आंबा खायला लागलो. पाहता पाहता चार आंबे संपले. माझे हात रसाने भरले होते. आजोबा म्हणाले, ‘‘चला मी तुम्हाला पाणी देतो.’’ मी हात धुतले. मला एक फोन आला. मी फोनवर बोलत होतो. आजोबा समोर असणारी समाधी धूत होते. मी म्हणालो, ‘‘कुणाची समाधी आहे ही.’’ आजोबा म्हणाले, ‘‘माझ्या कारभारणीची.’’ मी पुन्हा म्हणालो, कधी गेल्या त्या, आजोबा म्हणाले, सहा वर्षे झाली. आमच्या गप्पा सुरू झाल्या. आजोबा जेव्हढे बोलके होते, त्यापेक्षा जास्त भावनाशील होते. काय एकेकाचे आयुष्य असते, सगळे असून काहीतरी चुकतंय अशी सल मनामध्ये अनेक वेळा राहून जाते.
मी ज्या आजोबांशी बोलत होतो, त्यांचे नाव रामचंद्र देवेंद्र देवकर. रामचंद्र काका पुण्यात एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांच्या पत्नी सविता यादेखील शिक्षिका होत्या. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी. मुलगी श्वेता आजारामध्ये गेली. तीन मुलांमध्ये एक मुलगा परदेशात आहे. दोन मुले पुण्यात प्राध्यापक आहेत. सुना नोकरी करतात. नातू-नात असा काकांचा मोठा गोतावळा आहे, पण मुलांमध्ये होणाऱ्या भांडणामुळे काका सर्वांमध्ये राहत नाहीत. एकाही सुनेला आणि मुलालाही काका अजिबात आवडत नाहीत, कारण त्यांचा काहीही उपयोग नाही असे आहे. काकाच्या मुलांना त्यांची आठवण येते. ती काकांच्या पेन्शन मिळणाऱ्या दिवशी. या महिन्याचे पेन्शन आम्हाला द्या, आम्हाला काम आहे, अशी पेन्शनसाठीची लाईन पंधरा दिवसांपासून लागलेली असते. काकांचे वय आता ८५ पार झाले आहे. डोळ्याला नीट दिसत नाही. चालता येत नाही. या जगात आई नंतर बहीण, बायको आणि मुलगी हे नाते काळजी घेणारे असते. पण यापैकी कुठलेच नाते काकांकडे शिल्लक नव्हते.
जर त्या म्हाताऱ्या माणसांकडे सेव्हिंग नसेल, एखादा जमिनीचा तुकडा नसेल, तुमचे पेन्शन नसेल तर तुम्हाला रोज बुटाची ठोकर मारण्याचे काम तुमची मुले करतात. एक-दोन नाही तर माझ्यासोबत असणाऱ्या अनेक प्राध्यापक, इतर मित्र या सर्वांची अवस्था अशीच आहे. कुणालाही सेवानिवृत्तीनंतर ‘सुख’ कशाला म्हणतात हे माहिती नाही. याबाबतचे अनेक ‘किस्से’ काका मला सांगत होते.
सुनांच्या आहारी गेलेली मुले आणि कधी न विचारणाऱ्या सुना या आयुष्याला ‘वाळवी’ लागल्यासारखे असतात, असे काका सांगत होते. मी काकांची समजूत काढत होतो. काका म्हणाले, ‘‘मी समाजशास्त्राचा प्राध्यापक होतो, आयुष्यभर विद्यार्थांना मी सामाजिक मूल्य कशी जपायची, आपले घर, कुटुंब किती महत्त्वाचे आहे ते शिकवले, माझे अनेक विद्यार्थी समाजशास्त्रामध्ये मोठे संशोधक आहेत. मी सर्वांच्या मनात समाजशास्त्र रुजवण्यात सक्सेस झालो, पण माझ्या मुलांच्या मनात मी समाजशास्त्र रुजवू शकलो नाही, ही माझ्या मनात खंत आहे.
माझी घरी प्रचंड अवहेलना होते, हे सर्व पाहुण्यामंडळींना माहिती आहे. मला ते फार वाईट वाटते. म्हणून मी फारसा सर्वांच्या संपर्कात नसतो. कुणाच्या लग्नकार्यात जात नाही. अलिप्तपणे या शेतात राहतो. माझे ‘समदुःखी’ असणारे अनेक मित्र येथे येतात. मी म्हणालो, ‘ही जमीन कधी घेतली.’ काका म्हणाले, ‘‘माझ्या पत्नीला भाऊ, बहीण कोणीच नाही, तिच्या वडिलांनी मरताना तिच्या नावावर हा जमिनीचा तुकडा केला. सविताची नेहमी इच्छा असायची, दारात आलेला माणूस कधी उपाशी, रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे. ती देव, कर्माला खूप मानायची, तिच्या मैत्रिणी मुलांना म्हणायच्या तुमच्या आई-बाबांची पुण्याई आहे म्हणून तुमच्याभोवती ऐश्वर्य लोळण घेते. या शेतात मी खाण्यापुरते ठेवतो. आणि बाकी सर्व येणाऱ्या-जाणाऱ्यांना वाटून टाकतो.
हा जमिनीचा तुकडा आमच्या नावावर करा, तेव्हाच तुम्हाला नातवाशी बोलू देतो, अशी जबरदस्ती माझ्यावर सुरू झाली. माझे मित्र म्हणाले, तू मुलांना शिकवले, त्यांची लग्न केली, त्यांना नवे घर करून दिले. नातवांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली. सर्वांचे कर्ज भागवलेस. तुझे घर तू मुलांच्या नावे केले, तुझी सर्व जबाबदारी तू पार पाडली. आता हा जमिनीचा तुकडा कशाला मुलांच्या नावे करायचा. माझ्या दोन मित्रांनी तर जेव्हा सगळे मुलांच्या नावावर केले, तेव्हा त्या दोघांनाही त्यांना घरातून घरातून जाण्यास भाग पाडले. आता एकजण मुलीकडे राहतो आणि एकजण पुण्यातच वृद्धाश्रमात. काका त्यांच्या मित्रांचे, ओळखीच्या लोकांचे किस्से जेव्हा सांगत होते, तेव्हा अंगावर काटा येत होता. या उच्चशिक्षित मुलांविषयी मनात चीड निर्माण होत होती. हल्ली जेव्हढे उच्चशिक्षित तेव्हढे व्यावहारिक पाहायला मिळतात. त्या व्यवहारात ते अगोदर आई-बाबाला टार्गेट करतात. हे सर्व ठिकाणी पाहायला मिळते. आम्ही बोलत असताना माझा मोठा मुलगा जयेश गाडीतून बाहेर आला. त्याने ‘चला’ म्हणून मला आवाज दिला. काकांना मुलाला पाहताच क्षणी लक्षात आले हा माझा मुलगा आहे. ते बाहेर गेले. काका गेले, माझी पत्नी सारिका, लहान मुलगा अर्णव, मोठा मुलगा जयेश यांना घेऊन आले. शेतात काम करणाऱ्या गड्याला बोलून त्यांनी आंबे काढायला लावले. आम्ही आंबे खाल्ले, माझी दोन्ही मुले आणि आजोबा खेळण्यात बेभान झाली.
मुले खेळतच होती. आजोबा दमून माझ्या आणि माझ्या बायकोच्या जवळ येऊन बसले. डोळ्याला रुमाल लावत ते पुन्हा रडायला लागले. आम्हाला कळेचना नेमके झाले तरी काय? माझी पत्नी सारिका प्रचंड हळवी. काही विचारले नाही, काही नाही, काकांच्या सोबत तीही रडायला लागली. त्यांचे रडणे बाजूला खेळणाऱ्या मुलांनी पाहिले आणि तेही येऊन लहान तोंड करून बसले. आजोबांनीच सर्वांना शांत केले. त्यांच्या रडण्याचे कारण काय हे सांगत आजोबा मला म्हणाले, ‘‘आज एक वर्ष झाले, सहा नातू आहेत, पण एकाचेही तोंड पाहिले नाही. तुमच्या गोड मुलांना पाहून मला माझ्या नातवांची आठवण आली. बिच्चारे... त्यांनाही फार हुरहुर लागली असेल. माझी तेही वाट पाहत असतील. माझ्या म्हातारपणाच्या काळजीने मी नातवांच्या प्रेमाला मुकलो. काय करावे बाबा? पेन्शनचे थोडे मिळणारे पैसे आणि हा जमिनीचा तुकडा माझ्या आयुष्याची काठी बनली आहे. सुनांच्या रोज उठता-बसता मिळणारे टोमणे खाऊन मी पार वैतागलो होतो.
आम्ही निघतानाही आजोबांचा कंठ दाटून आला. माझ्या दोन्ही मुलांना दोन हातात धरून त्यांनी गाडीपर्यंत सोडले. आम्ही निघालो. माझ्या मनात अनेक विचार येत होते. सर्वच मुले काकांच्या मुलांसारखी नसतात, हे खरे आहे. पण जी मुले असे वागतात आणि त्यांचे प्रमाण खूप आहे, त्यांचे काय करायचे? हल्ली घरोघरी हे चित्र आहे, याचे करायचे काय? वय झालेल्या माणसांकडे काही असेल तरच त्याला किंमत, अन्यथा नाही. असे आहे का? आम्ही भारतीय संस्कार म्हणतो, अशा वेळी कुठे जातात हे संस्कार? आई-बाबांना तुम्ही लाथा मारणार असाल तर हा निसर्ग काय तुम्हाला सोडणार आहे, कदापि नाही?

संदीप काळे
……

*LIC ची "कँसर केअर (९०५) पॉलिसी सगळ्यात उत्तम!!!**कॅन्सरचा विळखा फक्त पेशंट च्या प्रकृतीलाच नसतो तर त्याच्या पूर्ण कुटुं...
04/02/2023

*LIC ची "कँसर केअर (९०५) पॉलिसी सगळ्यात उत्तम!!!*

*कॅन्सरचा विळखा फक्त पेशंट च्या प्रकृतीलाच नसतो तर त्याच्या पूर्ण कुटुंबाच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीलाही बसतो* ज्यामुळे मुलांची शिक्षणे अर्धवट राहू शकतात, लग्ने पुढे जाऊ शकतात किंवा मोडतात तसेच तरुण पिढीचा आत्मविश्वास गेल्याने त्यांचे करिअर धोक्यात येऊ शकते. या तर्हेच्या बातम्या आपण पेपरात वाचत असतो. अशा कुटुंबाकडून मदतीसाठी काही याचना (पोस्ट) व्हाट्सएप किंवा फेसबुकवर टाकल्या जातात. उदाहरणार्थ:

".... माझ्या ओळखीत एक ताई आहेत दुर्देवाने त्यांच्या मिस्टरांचे कॅन्सर नी निधन झाले आहे. घरात दुसरा कोणी ही कमावता नाहीये. मुलगा 8 वी मध्ये आहे. त्या मुळे त्यांना कामाची खरच खूप खूप गरज आहे. त्या खूप उत्तम स्वयंपाक करतात. तरी कोणालाही कुठल्याही कौटुंबिक छोट्या कार्यासाठी जेवण किंवा स्नॅक्स हवे असतील तर प्लिज नक्की सांगा. अगदी 100 जणांचा देखील स्वयंपाक त्या करून देतील. कामाची गरज आहे त्या मुळे सहकार्य करा."

कँसर कुणालाही आणि कधीही होऊ शकतो आणि त्यात कमावत्या कुटुंब प्रमुखाला किंवा व्यक्तीला झाल्यास वर लिहिल्याप्रमाणे कुटुंबाची वाताहत होऊ शकते आणि अशी पोस्ट टाकून मदतीचे आवाहन करावे लागते. या सगळ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी *LIC ची "कँसर केअर" पॉलिसी (प्लॅन क्र. ९०५)* कुटुंबातील प्रत्येक कमावत्या व्यक्तीने घेणे अत्यावश्यकच आहे.

1) *LIC ची "कँसर केअर" पॉलिसी २० ते ६५ या वयोगटातील व्यक्ती १०लाख ते ५०लाख रकमेची १० ते ३० वर्षांच्या कालावधीसाठी केव्हाही घेऊ शकतो.*

२) *प्राथमिक स्थितीतील कँसर* आढळल्यास केवळ डॉक्टरांच्या पत्रावर *२५% रक्कम लगेच खात्यावर जमा* होते. म्हणजे ५० लाखाची पॉलीसी असेल तर १२.५लाख रुपये जमा केले जातील. तुम्ही कुठलीही बिले द्यायची जरूर नाही.

३) तसेच *पुढची 3 वर्षे प्रीमियमचे हप्ते भरण्यापासून सूट* मिळते.

४) बरें झालात तर हप्ते पुन्हा चालू होतात. पण *कँसर बळावला आणि मेन स्टेज ला गेला तर राहिलेले ७५% खात्यावर जमा होतात* ज्यातून कुटुंबाचा व उपचारांचा खर्चहोऊ शकतो.

५) *३० वर्षांच्या व्यक्तीला ५० लाखांसाठी ३० वर्षांसाठी जास्तीत जास्त प्रीमियम दरसाल ₹८४५०/-* (अंदाजे रोज फक्त ₹२७/-) द्यावा लागतो.

६) जर त्या व्यक्तीला *मेजर स्टेजचा कँसर* झाला तर तिला *प्रथम ₹५०लाख खात्यावर जमा होतील आणि त्याशिवाय दर महिना ₹५०,००० पुढील १२० महिने मिळतील.*
७) *म्हणजे एकंदर ₹१कोटी १०लाख मिळतील* मग भले कँसर बरा होवो अथवा न होवो.

८) आपल्या लक्षात आले असेल की LIC त्या कुटुंबाच्या चरितार्थाची तसेच उपचारांच्या खर्चाची सोय करून देते जेणेकरून कुटुंबाचे मानसिक व आर्थिक स्थैर्य कायम राहते व पेशंटला कॅन्सरचा यशस्वी सामना करण्यास बळ मिळते.

७) आजची एकंदरीत महागाई आणि वाढलेला कॅन्सरचा उपचार खर्च लक्षात घेता प्रत्येक कुटुंब प्रमुखानेच नव्हे तर *कुटुंबातील प्रत्येक कमावत्या व्यक्तीने ही LIC ची "कँसर केअर (९०५)"पॉलिसी घेणे अत्यावश्यक आहे.*

आपल्याला मदत करायला मी आहेच! व्हाट्सएप करा अथवा फोन करा:

आपला हितचिंतक,
*हेमंत मोडक* *९५५२५८८४७४*
*विमा सल्लागार व अभिकर्ता*
हॅपी फॅमिली इन्शुरन्स सर्विसेस
पुणे ४११०३८.

*Reasons you need to buy life insurance*Young people think life insurance is something you need to think about when you ...
10/12/2022

*Reasons you need to buy life insurance*

Young people think life insurance is something you need to think about when you get old. But that is a big myth.

Life insurance is a bit of extra money that is invested and it accrues cash value.
Life insurance is a bit of extra money that is invested and it accrues cash value.

Buying life insurance is one of the most important financial decisions, but believe it or not, only 10 per cent of Indians are insured. But why is it so important? Well, regardless of how much you earn, no one knows what the future holds. Lots of people die a prematurely every year from illness or accident and, if you happen to be the sole breadwinner in the family and you were to pass away, it could have devastating consequences for your loved ones-their ability to pay household expenses, debts and maintain their standard of living.
The least you can do, therefore, is to secure your family's financial future by buying a life insurance policy. Besides, do not overlook benefits of a life insurance during your lifetime, especially if you are young. We list 10 compelling reasons for buying a life insurance policy.

1. LOOKING AFTER YOUR LOVED ONES EVEN AFTER YOU'RE GONE: This is the most important aspect of life insurance that one needs to factor in. Your family is dependent on you even after you're gone and you certainly don't want to let them down. Whether it's for replacing lost income, paying for your child's education or making sure your spouse get the much-needed financial security, life insurance could save the day for your surviving dependents.

2. DEALING WITH DEBT: You don't want your family to deal with financial liabilities during a crisis. Any outstanding debt-a home loan, auto loan, personal loan, or a loan on credit cards-will be taken care of if you happen to buy the right life insurance policy.

3. HELPS ACHIEVE LONG-TERM GOALS: Since it is an instrument that keeps you invested for the long term, it would help you achieve your long-term goals such as buying a home or planning your retirement. It also provides you with diverse investment options that come along with different types of policies.
Some policies are tied to certain investment products that pay dividends based on their performance. If you are opting for an investment-linked policy, be sure to read the fine print to be fully aware of the potential risks and returns.

4. LIFE INSURANCE SUPPLEMENTS YOUR RETIREMENT GOALS: Who wouldn't like their retirement savings to last until they do? With a life insurance plan, you can ensure you have a regular stream of income every month. Putting money in an annuity is like a pension plan- put in some money regularly in a life insurance product and enjoy a steady income every month even after retirement.

5. BUYING INSURANCE IS CHEAPER WHEN YOU'RE YOUNGER: Not every millennial needs a life insurance policy. If you haven't created an emergency fund or you're still living off your parents' money, insurance shouldn't be a priority.
However, if you do have dependents or you have co-signed a loan with your parents (or any other member of your family or friend), whether it be a student loan or a home loan, you need to start considering buying a life insurance policy. Besides, coverage costs are much lower when you're single. Insurance agents may try to sell you a policy that you might not need.
Therefore, do your due diligence or approach a financial planner to determine how much insurance you need considering the other assets you may own. Even if you're single, there may be other dependents and you need to ensure they're taken care of. Pradeep Pandey, chief marketing officer, Future Generali Life Insurance, says, "The earlier the better. For instance, single people provide financial support for ageing parents or a sibling with special needs. Insurability is another reason to consider life insurance when you're single. If you're young, healthy and have a good family health history, your insurability is at its peak, and you can get the best rates on your life insurance policy."

6. YOUR BUSINESS IS ALSO TAKEN CARE OF: Life insurance isn't only for yourself and your family. Some insurance policies also take care of your business. If you own a business, then your business partner can purchase your portion of the business without hassle. Your business partner( s) will enter a buy-sell agreement and the payout would go to the deceased partner's nominees, but without giving them a stake in the company. There are two types of life insurance policies-a term insurance policy and a life insurance policy.
While we are all aware of the death benefits these insurance policies provide, we know little about the various options they lay out that could help strengthen your financial position.
A term insurance provides protection for a specified period of time (10, 20 or 30 years) and pays out the benefits only if you die during the term. The policy will expire and coverage will end if you outlive your policy. An investment- cum-protection plan on the other hand offers you a lump sum amount on the completion of the term of the policy. These plans also offer you protection but the cover is usually not as high as offered with term plans.

7. TAX-SAVING PURPOSES: You could save taxes with insurance policies irrespective of what plan you buy. The premium you pay on an insurance policy is eligible for a maximum tax benefit of Rs 1.5 lakh under Section 80C, and for tax-free proceeds on death/maturity under Section 10 (D) of the Income Tax Act, 1961.

8. A TOOL FOR FORCED SAVINGS: If you choose a traditional or unit-liked policy, you pay a premium each month, which is higher than what it costs to insure you. This bit of extra money is invested and it accrues cash value. This cash can then be borrowed against the policy or you can choose to sell it or draw income from it.

9. YOU MAY NOT BE QUALIFIED FOR IT LATER: Life insurance policies run on uncertainties. You may be healthy now and paying a premium for life insurance may seem to be an added financial burden, but if you suddenly fall ill, you may not be allowed to but a life insurance policy. Therefore, it is imperative to buy one early on in your life because it remains in force if your health deteriorates later on. Insurance companies allow you to attach certain riders or benefits to your existing or new policy.
These riders enhance the quality of your insurance. The accelerated death benefit rider, for instance, allows the policy owner to avail all or a part of the policy's death benefit if he or she has less time to live due to a critical illness, or wants to use the money for medical treatment or related expenses.

10. PEACE OF MIND: Death is unavoidable. In the face of tragedy, the least you can do for your family is to secure their financial future. Even if it is a small policy, you know that you've done all you can to help them tide over difficult times.

Life insurance is a great tool for both protection as well as helping a consumer save in a disciplined manner, which leads to creation of a good corpus. The need for life insurance changes at different stages of your lifecycle depending on the financial obligations and dependencies.
****************

Insurance agent

०१ सप्टेंबर 2022भारतीय आयुर्विमा महामंडळ आज 66 वर्षांचे झाले. आजी आजोबा ,मुलगा मुलगी, नात नातू सर्वांच्या विश्वासाला एल ...
01/09/2022

०१ सप्टेंबर 2022
भारतीय आयुर्विमा महामंडळ आज 66 वर्षांचे झाले. आजी आजोबा ,मुलगा मुलगी, नात नातू सर्वांच्या विश्वासाला एल आय सी ने या 66 वर्षात जपले आणि वाढवले... सर्व ग्राहक, हितचिंतक यांच्या मुळे आजही एल आय सी ची शानदार कामगिरी सुरू आहे... या आनंदाच्या दिवशी सर्वांचे अभिनंदन , मनापासून धन्यवाद व शुभेच्छा...!🎂
💐

*लवकर कोट्यधीश होण्याचे स्वप्न तुम्ही सत्यात आणू शकता.* प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो. परंतु त्यासाठीचा योग्य मार्ग लोका...
08/06/2022

*लवकर कोट्यधीश होण्याचे स्वप्न तुम्ही सत्यात आणू शकता.*

प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो. परंतु त्यासाठीचा योग्य मार्ग लोकांना माहित नसतो. तसे पाहाता चुकीच्या मार्गाने देखील पैसे कमावता येतात. परंतु स्वत:च्या कष्टाचे पैसे कमावण्याची मजा ही वेगळीच असते. आता तसे पाहाता सरळ मार्गाने चालनारा कोणताही व्यक्ती अगदी रात्रीत श्रीमंत होणार नाही. तर त्यासाठी गरज असते ती, संयमाची, मेहनतीची आणि योग्य मार्गदर्शनाची. ते म्हणतात ना थेंबे थेंबे तळ साचे, हे पाण्याच्या बाबतीतच नाही तर पैशांच्याबाबतीतही लागू होतं. त्यासाठी तुम्हाला योग्य फॉर्म्यूला वापरण्याची गरज आहे.

चला तर मग लवकर श्रीमंत होण्याचा हा फॉर्म्यूला कोणता आहे, हे आपण जाणून घेऊ या.
*काटकसरी जीवनशैली*
वाचवलेल्या प्रत्येक रुपयामध्ये तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करण्याची क्षमता असते. जगातील काही श्रीमंत लोक काटकसरीचे जीवन जगतात. ज्या सुखसोयींची भरभराट होऊ शकते त्याला अंत नाही.

त्यामुळे तुम्ही कमवते झाल्यानंतर आयुष्याच्या सुरुवातीला फार गोष्टींचा मोह न करता, प्रतीक्षा करणे, संपत्ती जमा करणे, तुमचे भविष्य सुरक्षित करणे आणि नंतर तुम्हाला हव्या असलेल्या सर्व ऐशो आरामाच्या वस्तू खरेदी करणे चांगले.

*पद्धतशीरपणे बचत*
तज्ञ सुचवतात की तुम्ही शक्य तितकी बचत करावी आणि लवकरात लवकर पद्धतशीरपणे गुंतवणूक सुरू करावी.

अशा गुंतवणुकीमुळे निर्माण होणाऱ्या चक्रवाढ परिणामामुळे कोणीही गुंतवणुकीचा प्रवास लवकर सुरू होतो आणि आपल्याला त्याचे रिटर्नस देखील लवकर मिळतात.

20 व्या वर्षी त्यांचे व्यावसायिक जीवन सुरू करणार्‍या प्रत्येकासाठी, त्यांचे आर्थिक ध्येय साध्य करण्याचा मार्ग त्यांना त्यांचा पहिला पगाराचा धनादेश प्राप्त झाल्यापासून सुरू होतो.

त्यामुळे तुम्ही तुमचा पगार खर्च करण्यापेक्षा तो कसा जमा करता किंवा कशी गुंतवणूक करता यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे.

*15-15-15 नियम*
करोडपती होण्यासाठी 15-15-15 चा नियम नेहमी लक्षात ठेवा.

15 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा 15 हजार गुंतवावे लागतील 1 कोटीचे लक्ष्य गाठण्यासाठी वार्षिक 15 टक्के उत्पन्न देतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विमा घ्या.

वैद्यकीय आणि जीवन विमा जितका लवकर घेतला जाईल तितके चांगले. कारण यामुळे तुम्हा अचानक पैसे आणण्याची गरज भासणार नाही. विमा कंपनी तुम्हाला त्यासाठी पैसे पुरवेल. यामुळे स्वत: किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला अचानक हॉस्पिटलायझेशन झाल्यास विमा मिळाल्याने त्यांना आर्थिक धक्क्यापासून संरक्षण मिळते.
*(संग्रहित माहिती)*
अधिक माहितीसाठी-
हेमंत मोडक
(९५५२५ ८८४७४)
विमा सल्लागार आणि अभिकर्ता (एजंट)
LIC आणि Star Health साठी)

25/04/2022

*LIC-IPO Is Finally Announced*
*Issue Opens : 4th May 2022*
*Issue closes: 9th May 2022*
*Issue Size: 21,000Cr*

*आत्ता २९ मार्च पर्यंत केव्हाही माझ्याशी बोला आणि पुढील सर्व काळासाठी आपला भरघोस फायदा करून घ्या.**आपला हितचिंतक,**हेमंत...
25/03/2022

*आत्ता २९ मार्च पर्यंत केव्हाही माझ्याशी बोला आणि पुढील सर्व काळासाठी आपला भरघोस फायदा करून घ्या.*

*आपला हितचिंतक,*
*हेमंत मोडक*
*9552588474*
*विमा एजंट आणि सल्लागार*
ता.क.: न बोलल्यामुळे लक्षात न येणारे नुकसान होत राहील.😳

Insurance agent

*पूर्ण कुटुंबाचा LIC आयुर्विमा फक्त एक हजार रुपयात!!*त्वरा करा - योजना फक्त 31 मार्च पर्यंत!!
23/03/2022

*पूर्ण कुटुंबाचा LIC आयुर्विमा फक्त एक हजार रुपयात!!*
त्वरा करा - योजना फक्त 31 मार्च पर्यंत!!

आत्ताच विचार करायला हवा...भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी असं गाणं ऐकत आलेलो आह...
05/03/2022

आत्ताच विचार करायला हवा...

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी असं गाणं ऐकत आलेलो आहोत, पण काल महान लेगस्पिनर शेन वॉर्न यांच्या हार्ट अटॅक ने जाण्याचा बातमीने अजून एक मोठा धक्का बसला. अशा अनेक न्यूज मागे पण आपण ऐकल्या .सौरभ गांगुलीला पण अटॅक येऊन गेला. तरुण वयात हृदयविकाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बदलती जीवनशैली त्याला कारणीभूत असावी. मग आपल्या हातात काय आहे ?
तर आपल्या हातात आहे पुरेसे संरक्षण घेणे.
साधी गोष्ट आहे पावसाळ्यात आपण छत्री घेऊन किंवा रेनकोट घेऊन बाहेर पडतो ,पाऊस येईल की नाही माहिती नाही . मग आपल्या आयुष्य विषयी आपण एवढं गाफील का असावं ? सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून मृत्यू होणे हे नैसर्गिक आहे, पण अर्ध्यावरती कर्ती व्यक्ती सोडून जाणं अतिशय वेदनादायक त्याच प्रमाणे कुटुंबाचं प्रचंड आर्थिक नुकसानही करणारं असतं. भावनात्मक नुकसान भरून काढता येणार नाही पण कुटुंबाचा होणारे आर्थिक नुकसान मात्र आपण विम्याच्या माध्यमातून भरून काढू शकतो. टर्म इन्शुरन्स सारखा विम्याचा प्रकार अतिशय स्वस्त असतो त्याला गांभीर्याने घ्या आणि आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान , किमान दहापट विमा घ्या ही माझी नम्र विनंती आहे 🙏 एवढे सुंदर आयुष्य गाफील होऊन जगू नका. थँक्यू..!

आपला हितचिंतक,
हेमंत मोडक
📳 आणि Whatsapp 9552588474
विमा अभिकर्ता (एजंट)- एलआयसी आयुर्विमा आणि स्टार हेल्थ आरोग्यविमा.

Insurance agent

Address

Janaki Plot No 89 Right Bhusari Colony Paud Road Kothrud
Pune
411038

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919552588474

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Happy Family Insurance Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Happy Family Insurance Services:

Share