23/12/2025
सप्रेम नमस्कार,
सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, आपल्या 'सुवर्णयुग सहकारी बँकेच्या दिनदर्शिका २०२६' (Calendar 2026) चे प्रकाशन आणि पूजन आज, मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाच्या चरणी विधिवत संपन्न झाले आहे. यावेळी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुनील रासने, कोषाध्यक्ष श्री महेश सूर्यवंशी, बँकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी श्री दिनेश परदेशी व फिनोलेक्स पाइप्सचे श्री शिरीष पानके (HR Head), श्री. सुमित भाटिया (Marketing Head), श्री अनिरुद्ध सरनाईक, श्री विशाल भामरे व मुकुल माधव फाउंडेशनचे श्री पार्थ कलाल, श्री जितेंद्र जाधव उपस्थित होते.