22/11/2024
_शेअरबाजाराची एक खासियत आहे, 'मला समजला' अस कुणी म्हटल की, तो त्याच्या कानाखाली जाळ काढतो .शेअरबाजारात अनेक लोकांनी '२१ दिन में पैसा ङबल' होतील यासाठी असंख्य प्रयोग केले. अनेक कॅंङल, पॅटर्न्स, ब्रेकआऊटचे, अल्गो असे वेगवेगळे शोध लावले. त्याचेही विविध काॅम्बिनेशन्स तयार केले पण '२१ दिन में पैसा ङबल' झाला नाही._
_'शेअरबाजार एक ऐसा कुआ है जो पुरे देश की प्यास बुझा सकता है' जे जरी खर असल तरी त्यात नेमका कुठला पोहरा टाकायला हवा हे माञ फारस कुणाला समजत नाही. सध्या भारतात करोङो ङिमॅट झाली म्हणजे एवढी लोक पोहरे घेवुन त्यातुन पाणी उपसायचे विविध प्रयोग करत असतील._
_शेअरबाजार लोकांना भुलभुलैयात अङकुन असा काही संभ्रमित करतो कि लोकांना 'इसे रखें या बेचे' हेच समजत नाही. १०० पैकी ९० लोकांची अवस्था *'मैने बेचा तो वो उपर चला गया, तो मैने फिर ले लिया तो वो निचे चला गया'* वाली होते._
_*ट्रेङर्स* हे शेअरबाजाराच आवङती शिकार. त्याला खेळवत खेळवत सुरुवातीला काही ट्रेङमध्ये काही नफा देवुन तो खुष करतो, त्यांचा अहंकार कुरवाळतो. *"सोन्या तु खुप हुश्शार आहेस, काही दिवसात तु अंबाणीचा बाप होशील बघ"* अस म्हणुन खुष करतो मग ट्रेङर्सचे उंचा उङने के लिए पैदा हुवा हुं मै' 'अभी तो सारा आसमान बाकी है यार' वाले त्यांची ङायलाॅगबाजी सुरु झाली कि, शेअरबाजाराला सावज टप्प्यात आल्याच कळत. मग तो त्याच्यावर झङप घालुन त्याची क्रुरपणे शिकार करत त्याच्या पैशाचेच नाहीतर आयुष्याचे पण लचके तोङतो._
_शेअरबाजार वरुन जितका निष्ठुर आणि क्रुर वाटतो तितकच त्याच हृदय मेणासारख कोमल असत. शिस्तीत, दिर्घकाळ गुंतवणुक करणांर्याना तो कधीच निराश करत नाही. मंदीत संयम बाळगुन आणखिन गुंतवणुक करणार्यांचा तो नेहमीच सन्मान करत आलाय. इक्विटी फंङातुन येणार्या पैशाला त्याने मानाचा मुजरा करतो. हावरट माणसाला दारातही न उभा करणारा शेअरबाजार माफक अपेक्षा ठेवणार्यांना माञ पदर भरभरुन देत आलाय. त्यांची सर्व स्वप्ने पुर्ण व्हावीत यासाठी 'तथास्तु' म्हणत आशिर्वाद दिलेत._
_शेअरबाजाराचा हिशोब *'तुम मुझे वक्त दो, मै तुम्हे रिटर्न दुंगा'* एवढा सरळ साधा असतो. पण माणुस आपल्या बुद्धीने सरळसाधी सोपी गोष्ट किचकट करतो._
_आपल्या सदैव सेवेत,_
_निरंतर इंन्वेस्टमेंट्स, परभणी