Mansing Co Op Bank ltd Dudhondi

Mansing Co Op Bank ltd Dudhondi आपली बँक मानसिंग बँक

।। जाहीर निमंत्रण, जाहीर निमंत्रण, जाहीर निमंत्रण ।।कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार व दुधोंडी पंचक्रोशीचे भाग्यविधाते ...
25/04/2017

।। जाहीर निमंत्रण, जाहीर निमंत्रण, जाहीर निमंत्रण ।।
कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार व दुधोंडी पंचक्रोशीचे भाग्यविधाते मा. जे. के. (बापू) जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या देशभरात सहकार व बँकिंग क्षेत्रात नावलौकिक पुरस्कार मिळवलेल्या मानसिंग को ऑप बँक ली दुधोंडीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त १ मे २०१७ ते ५ मे २०१७ खालील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे
कार्यक्रमाचे ठिकाण:- मानसिंग को ऑप बँक प्रधान कार्यालय दुधोंडी*
पहिला दिवस:-
१ मे २०१७ रोजी वार सोमवार
मानसिंग बँकेचा वर्धापन दिनानिमित्त सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण पूजा आयोजित केली आहे तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे मा खासदार राजू शेट्टी, अध्यक्ष मा खासदार संजय पाटील, प्रमुख उपस्थिती मा आमदार मोहनशेठ (दादा) कदम यांच्या उपस्थित होणार आहे.
दुसरा दिवस:-
२ मे २०१७ रोजी वार मंगळवार
खास युवकांसाठी आम्ही कसे घडलो या विषयावर व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा सकाळी ९.३० वा. आयोजित केले आहे तरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार डॉ. पतंगरावजी कदम, व प्रमुख पाहुणे मा खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक उपस्थित राहणार आहेत तरी उद्योजक हरी कुलकर्णी, उद्योजक सर्जेराव यादव, स्पर्धा परीक्षा अधिव्यख्याते हणमंतराव कराळे, तसेच उपअधीक्षक सांगलीच्या सुवर्णा पत्की* या सर्वांचे मार्गदर्शन होणार आहे.
तीसरा दिवस:-
३ मे २०१७ रोजी वार बुधवार
खास महिलांसाठी आम्ही उद्योजिका या विषयावर महिला उद्योगजकता मेळावा सकाळी १०.३० वा आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व प्रमुख वक्ते डॉ सौ जयश्री पाटील यांचे मार्गदर्शन होणार आहे.
चौथा दिवस:-
४ मे २०१७ रोजी वार गुरुवार
खास शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकरी या विषयावर झुआरी ऍग्रो चे कृषीतज्ञ यांचे सर्व शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन सकाळी ९.०० वा मोफत पाणी, माती, देठ, आणि पाने परीक्षण आयोजन केले आहे तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे *महाराष्ट्र राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री मा. सदाभाऊ खोत व कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर व प्रमुख उपस्थिती पलूस मार्केट कमिटीचे कमिटीचे सभापती सुनिल नलवडे, उपस्थित राहणार आहेत.
पाचवा दिवस:-
५ मे २०१७ रोजी वार शुक्रवार*
कै.सौ. मिनाक्षीताई जे. के. (बापू) जाधव बी. शे. क्रेडिट सोसा. ली दुधोंडी या संस्थेचा उदघाटन समारंभ सकाळी 8 वा तसेच
खास सुशिक्षित बेरोजगारांसाठी भव्य नोकरी मेळावा व मार्गदर्शन आयोजित केला आहे आणि समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा "मानसिंग पुरस्कार" देऊन यथोच्छित सन्मान करणार आहे तरी या कार्यक्रमासाठी मा आमदार मोहनराव कदम तसेच महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा ना महादेवराव जानकर व माजी खासदार ब्री. सुधीर सावंत आणि अविनाश काका दिनकर पाटील सभापती तासगाव मार्केट कमिटी उपस्थित राहणार आहेत तसेच नोकरी मुलाखतीची वेळ सकाळी ८ ते २ पर्यंत आहे तरी गरजू उमेदवारांनी दिनांक ४ मे २०१४ पर्यंत http://www.mansingbank.com या संकेतस्थळावर *नोंदणी अर्ज करावा. तरी मेळाव्यासाठी शिपाई पासून मॅनेजर, एच आर,तसेच मोठ्या पदासाठी नामवंत कंपनी खालील प्रमाणे येणार आहेत,
Idea, Jio, LIC, VG Computer, BSG Software, Acute Infomatics, Piaggio, Dynamix, Vencher steel, Fiat, John deere, click it, just dail, Time skils, Hindustan feeds, 40 पेक्षा जास्त इतर नामवंत कंपन्या मुलाखतीसाठी येणार आहेत तरी सर्वांनी या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सहकार्य करावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती.
नोकरी मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी संपर्क
9021352020, 9372110900, 9766009159, 9657812784, 9860209640, 7620898247,
आपलाच विश्वासू
सुधीर (भैया) जाधव
चेअरमन-मानसिंग को ऑप बँक ली दुधोंडी

Mansing co-operative bank ltd., dudhondi ta. palus, dist.-sangli

Happy New Year....
31/12/2016

Happy New Year....

मानसिंग बँकेला बँकिंग फ्रँटियर्स पुरस्कारमानसिंग को-आँप.बँकेला सन 2015-16 ला एन पी ए व्यस्थापन आणि ग्राहकांना दिल्या जाण...
24/09/2016

मानसिंग बँकेला बँकिंग फ्रँटियर्स पुरस्कार
मानसिंग को-आँप.बँकेला सन 2015-16 ला एन पी ए व्यस्थापन आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व उच्च गुणवत्ता यासाठी व बँकेचे जनरल मॅनेजर मा संभाजी कृष्णा जाधव याना BEST CEO म्हणून राष्ट्रीय स्तरावरील बँकिंग फ्रँटियर्स पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार दिल्ली येथे बँकिंग फ्रँटियर्स चे बाबू नायर व मनोज अग्रवाल यांच्या हस्ते देण्यात आला अशी माहिती बँकेचे संस्थापक
मा जे के बापू जाधव यांनी दिली.
बँकेची स्थापना 1 मे 1997 रोजी दुधोंडी सारख्या ग्रामीण भागात केलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील आयएसओ 9001 : 2008 नामांकन प्रमाणित बँक असून सध्या बँकेचे 5586 सभासद आहेत बँकेकडे एकूण ठेवी 109 कोटी 56 लाख असून कर्जवाटप रू.74 कोटी 47 लाख इतके केलेले आहे. गुंतवणूक रू.32 कोटी 83 लाख आहे. बँकेचा नेट एन.पी.ए.शुन्य टक्के इतका असून सी.आर.ए.आर 13.45 टक्के आहे प्रती कर्मचारी व्यवसाय 4 कोटी 23 लाख आहे. बँकेची थकबाकी 1.28 टक्के इतकी असून बँकेचे भाग भांडवल रू. 3 कोटी 46 लाख इतके आहे. एकूण राखीव व इतर निधी रू. 5 कोटी 18 लाख इतका आहे सुरवातीपासून आँडीट वर्ग "अ" आहे ग्राहकांना आपले व्यवहार मोबाईल वर कळण्यासाठी एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.तसेच बँकेला अनेक सर्वोत्कृष्ठ कामकाजाबद्दल राज्य व देशपातळीवरील पुरस्कार मिळालेले आहेत बँकेच्या सध्या दुधोंडी,सांगली,पलूस ,विटा व कराड येथे पाच शाखा आहेत व शाखा सांगली व पलूस शाखेमध्ये 365 दिवस अखंड सेवा ग्राहकांना दिली जाते बँकेने स्वमालकीची प्रधान कार्यालयाची इमारत तीन मजली आकर्षक इंटीरीयर व कँप्सुल लीफ्ट सह बांधलेली आहे तसेच सांगली व पलूस येथील शाखा बँकेच्या स्वमालकीच्या इमारतीत कामकाज करतात सर्व शाखामध्ये लाँकर्स ची सुविधा आहे. बँकेमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची विज बिले स्विकारली जातात. पँन कार्ड काढणेची सुविधा तसेच आधार पेमेंट मुळे सर्व शासकीय अनुदान जमा होण्याची सुविधा सर्व शाखामध्ये आहे.
ई टँक्स पेमेंट भरून घेण्याची सुविधा बँकेने उपलब्ध करून दिलेली आहे बँकेला आयएफएससी कोड असल्यामुळे आरटीजीएस व एनईएफटी मुळे त्वरीत फंड जमा होतात.ग्राहकांच्या सेवेसाठी बँकेने कोअर बँकिंग प्रणाली चालू केलेली असून ग्राहकांना कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येतात .बँकेने आधुनिक पध्दतीने डेटा सेंटर व डीआर साईट स्व:मालकीची सुरू केलेली आहे. माँडर्न बँकिंग मध्ये बँकेने रूपे एटीएम कम डेबीट कार्ड सुरू केलेले असून मुख्य शाखा दुधोंडी येथे एटीएम सेवा उपलब्ध करून दिलेली आहे सदर एटीएम मधून ग्राहकांना कोणत्याही इतर बँकेच्या एटीएम चा वापर करुन पैसे काढता येणार आहेत व ग्राहकांना आपल्या बँकेच्या एटीएम द्वारे देशभरातील 240000 हून अधिक एटीएम मधून पैसे काढता येत आहेत सदर डेबीट कार्डद्वारे आपणास खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच बँकेने कँश डिपाँझीट मशीन बसविलेली असून ग्राहकांना रांगेत उभे राहून कँश भरणा करण्याऐवजी कँश डिपाँझीट मशीनद्वारे 50रू पासून 1000 रू पर्यंतच्या नोटा भरून घेतल्या जातात.ग्राहकांच्या सोईसाठी बारकोड सुविधेसहीत पासबुक भरण्याची मशीन ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध केली आहे तसेच बँकेला मोबाइल बँकिंग ची परवानगी मिळाली आहे लवकरच ह्या सेवेचा लाभ ग्राहकांना मिळेल अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री.सुधीर (भैय्या) जाधव व व्हा.चेअरमन श्री.शितल सावळवाडे यांनी दिली मा.जे.के.(बापू) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची घौडदौड सुरू आहे.

मानसिंग बँकेची २० वी वार्षिक सर्व साधारण सभा उत्सहात संपन्नकिर्लोसकरवाडी / प्रतिनिधी - मानसिंग बँकेने नेहमी सभासद , ठेवी...
18/07/2016

मानसिंग बँकेची २० वी वार्षिक सर्व साधारण सभा उत्सहात संपन्न
किर्लोसकरवाडी / प्रतिनिधी - मानसिंग बँकेने नेहमी सभासद , ठेवीदार व कर्जदार यांचा विचार करून शासनाच्या अनेक योजना राबविल्या. आज बँकेचा एन पी ए शून्य टक्के राखायचा असेल तर कर्जदाराच्या बाबतीत थोडीशी आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागते त्यामुळे राजकारणात सुध्दा याचा त्रास आम्हाला होतो . परंतु बँक टिकवायची असेल तर असे निर्णय घ्यावे लागतात असे प्रतिपादन मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव यांनी मानसिंग बँकेच्या २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभा या कार्यक्रमात मानसिंग बँकेच्या प्रधान कार्यालय दुधोंडी (ता. पलूस) येथे केले . यावेळी कृष्णा मिनरल्स चे अध्यक्ष क्रांतीकुमार आबा जाधव प्रमुख उपस्थितीत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर (भैया) जाधव व प्रमुख पाहुणे म्हणून वारणेचे केदार आप्पा महाराज हे होते .
यावेळी जे. के. बापू यांनी सांगितले की सध्या बॅकेच्या एकूण ठेवी १०५ कोटी तर कर्जे ७० कोटी आहेत व सी.आर.आर १३.४५% असून नेट एन.पी.ए 0% आहे. प्रति कर्मचारी व्यवसाय ४.६१ लाख असून मुख्य शाखा दुधोंडी येथे ए.टी.एम, कॅश डिपॉझिट मशीन, पासबुक प्रिटींग मशीनची सुविधा आहे. त्यामुळे ग्राहकांना रात्री अपरात्री , सार्वजनिक सुटीच्या दिवशी २४ तास या मशीन मध्ये पैसे भरता येतात व पासबुक सुध्दा भरून घेता येते. ग्राहकांना रुपे डेबीट दिल्यामुळे देशभरातील २,२०,००० हून अधिक एटीएमचा वापर करुन पैसे काढता येतात. सध्या बँकेच्या दुधोंडी, सांगली, पलूस, विटा व कराड येथे शाखा कार्यरत असून सर्व शाखामध्ये लाईट बील, पॅन कार्ड ची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सर्व शाखामध्ये लॉकरची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे असे बापू यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षाची निवड सूचक म्हणून सुरेश रानमाळे यांनी केले तर अनुमोदक कुबेर पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन जयकर कदम व शरद शिंदे यांनी केले. तसेच बँकेच्या विषय पत्रिका वाचन मॅनेजर हणमंत महाडिक व अहवाल वाचन बॅंकचे अध्यक्ष सुधीर जाधव यांनी केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनीफ मुजावर व आभार मानसिंग बँकेचे उपाध्यक्ष शीतल काका सावळवाडे यांनी मानले . या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती आर . एन . आण्णा पाटील , रामानंदनगर सरपंच दीपक मोहिते , महाराष्ट्र एस टी कामगार संघटना माजी अध्यक्ष उत्तम जाधव,सहकार बोर्डचे सांगली जिल्हा अध्यक्ष भालचंद्र आरबुने , बँकेचे जनरल मॅनेजर संभाजी जाधव भूपाल गोतपगर , महिपती जाधव , जयकर पाटील , शिवाजी नलवडे , भास्कर कदम , डॉ रावसो सावंत , शिवाजी तातुगडे , प्रशांत नलवडे , संदीप जाधव , तुषार बुचडे , बँकेचे संचालक सतीश धनवडे , उमेश लाड , रमेश राजमाने , शिवलाल वाघ , सुभाष शितोळे , दौलतराव लोखंडे , सौ सरोजिनी पाटील , वैशाली मोहिते व बॅंकचे सर्व संचालक, सभासद , ठेवीदार , कर्जदार व सर्व शाखाधिकारी, कर्मचारी हितचिंतक उपस्थित होते.
फोटो ओळी - दुधोंडी - मानसिंग बँकेच्या २० व्या वार्षिक सर्व साधारण सभेत मनोगत व्यक्त करताना बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव, बाजूस केदार आप्पा महाराज, सुधीर जाधव , शीतल सावळवाडे व अन्य

मानसिंग बँकेचे माजी चेअरमन प्रकाश बजरंग आरबुने यांचे सकाळी 10 वाजता दुखःद निधन झाले आरबूने यांनी मानसिंग  बँकेचे 7 वर्षे...
26/03/2016

मानसिंग बँकेचे माजी चेअरमन प्रकाश बजरंग आरबुने यांचे सकाळी 10 वाजता दुखःद निधन झाले आरबूने यांनी मानसिंग बँकेचे 7 वर्षे अध्यक्ष म्हणून काम पहिले आहे त्यांच्या पाश्चात वडील, पत्नी असून मुले व मुली तसेच पुतण्या, पुतणी असा मोठा परिवार आहे रक्षाविसर्जन रविवार दि.27 मार्च रोजी सकाळी 10 वाजता दुधोंडी येथे आहे.

शोकाकूल --- सुधीर भैय्या युवा शक्ती दुधोंडी

31/10/2015

उद्या मानसिंग को ऑप बँक ली दुधोंडी या बँकेला मिळालेला बँकोचा पुरस्काराचे प्रसारण सकाळी ठीक 8 वाजता साम टीव्ही वर दाखवण्यात येणार आहे.

मानसिंग को ऑप बँक ली दुधोंडी व कृष्णाकाठ उद्योग समूहा तर्फे 15 ऑगस्ट दिनानिमित्त ध्वज वंदन करण्यात आले यावेळेस मानसिंग ब...
15/08/2015

मानसिंग को ऑप बँक ली दुधोंडी व कृष्णाकाठ उद्योग समूहा तर्फे 15 ऑगस्ट दिनानिमित्त ध्वज वंदन करण्यात आले यावेळेस मानसिंग बँकचे चेअरमन व कृष्णाकाठ अग्रो प्रोसेस लि चे मैनेजिंग डायरेक्टर मा सुधीर जाधव तसेच कृष्णाकाठ सह दूध व्यावसायिक संस्थेचे चेअरमन संदीप पाटील, दुधोंडी ग्राम विकास सोसायटीचे चेअरमन हिंदुराव (बापू) कदम, कृष्णाकाठ शेतीमाल प्रकिया व भाजीपाला फळे प्रक्रिया संस्थेचे चेअरमन राजेंद्र नलवडे, कृष्णा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत कदम, शिवाजी जलसिंचन योजनेचे चेअरमन आनंदराव आरबुने तसेच सर्व संस्थेचे व्हा. चेअरमन व संचालक मंडळ सभासद इतर मान्यवर दुधोंडी गवमधील हितचिंतक व सर्व स्टाफ उपस्थित होते

ग्रामीण व शहरी भागाची अर्थवाहिनी असलेली मानसिंग को ऑप बँक लि. दुधोंडी ता.पलुस - शाखा विटा आज या बँकेचा 12 वा वर्धापन दिन...
03/08/2015

ग्रामीण व शहरी भागाची अर्थवाहिनी असलेली मानसिंग को ऑप बँक लि. दुधोंडी ता.पलुस - शाखा विटा आज या बँकेचा 12 वा वर्धापन दिन त्यानिमित्त बँकचे संस्थापक मा. बापुना तसेच शाखेला सांगली जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष मा.मोहनशेठ (दादा) कदम, प्रतापशेठ (दादा) साळुंखे, पंचायत समितीचे सभापती मा. सुहास (भैया) बाबर, तसेच विटा नगरपरिषेदेचे माजी नगराध्यक्ष मा. वैभव (दादा) पाटील, नगरसेवक प्रशांत (दादा) कांबळे, विट्ठल साळुंखे तसेच विटा व विटा परिसरातील सर्व नामांकित खातेदार,ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक बँकेचे चेअरमन सुधीर भैया व्हा. चेअरमन शीतल काका तसेच सर्व आजी माजी संचालक उपस्थित होते.

22/07/2015

मानसिंग को ऑप बँक ली दुधोंडी या बँकेची सन 2014 - 2015 ची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 24.07.2015 रोजी सकाळी 9.30 वा दुधोंडी येथील बँकेच्या मुख्य कार्यालय दुधोंडी येथे आयोजित केली आहे तरी सर्व ठेवीदार, सभासद, कर्जदार, खातेदार, हितचिंतक, संबंधित यांनी उपस्थित रहावे ही विनंती.
आपला विश्वासु
सुधीर (भैया) जाधव
चेअरमन
मानसिंग को ऑप बँक ली दुधोंडी

11/07/2015

दुधोंडीच्या सर्व MPSC करणाऱ्या मित्र व विद्यार्थी बांधवांसाठी मानसिंग बँकेत चर्चासत्र व मार्गदर्शन आयोजित केले आहे तसेच MPSC करणाऱ्यांसाठी पुस्तक वाटप करणार आहे, तरी इच्छुक विद्यार्थ्यानी आज शनिवार रोजी दुपारी ठीक 3.30 वा मानसिंग बँक दुधोंडी येथे उपस्थित रहावे. या कार्यक्रमासाठी आपले आदरणीय मा. जे. के. बापू जाधव व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सुधीर (भैया) जाधव
चेअरमन- मानसिंग को ऑप बँक दुधोंडी

।। मानसिंग बँकेच्या सर्व शाखांमधुन मानसिंगचा ग्राहक मेळावा ।।सभासदांचा प्रचंड विश्वास हे मानसिंग बँकेचे खरं भांडवल ...सभ...
06/07/2015

।। मानसिंग बँकेच्या सर्व शाखांमधुन मानसिंगचा ग्राहक मेळावा ।।
सभासदांचा प्रचंड विश्वास हे मानसिंग बँकेचे खरं भांडवल ...सभासद ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी, आपल्या अडीअडचणी, आपल्या बहुमूल्य सूचना, आपलं मोलाचे मार्गदर्शन लाभाव त्याच बरोबर बँकेने विविध अत्याधुनिक सुविधांच्या बाबतीत घेतलेली झेप यांचा आढावा घेण्यासाठी आपणास आग्रहपूर्वक निमंत्रित करीत आहोत.
स्थळ : मानसिंग बँक शाखा कराड च्या शेजारी कराड.
वार : बुधवार
वेळ : सायंकाळी 5.00 वा
आपला विश्वासु
चेअरमन
सुधीर (भैया) जाधव

Address

A/p Dudhondi Tal-Palus Dist-Sangli
Palus
416308

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mansing Co Op Bank ltd Dudhondi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share