09/06/2016
# # # # जून महिन्यात करावयाची शेतीची कामे # # # #
शेतकरी मित्रहो,
मागील अंकात आपण मे महिन्यात करावयाची शेतीची कामे या बाबत माहिती घेतली होती. अशा करतो त्यानुसार आपण शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण केली असावीत. या वर्षीच्या हवामानाच्या अंदाजानुसार आणि तज्ञांच्या म्हणण्यानुसार पाऊस काळ खूप चांगला आहे म्हणून शेतकरी बंधूनी या खरीपाचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे. सदरच्या लेखात आपण जून महिन्यात शेतीमध्ये कोण कोणती कामे करणे अपेक्षित आहे याची माहिती घेवू.
ऊस–
सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आडसाली ऊसाची लागण केली जाते. लागवड करण्यापूर्वी शेताची पूर्ण तयारी करून घ्यावी. शेणखत, कंपोस्ट किंवा प्रेसमड मातीत मिसळून सरीवरंबा पद्धतीने उसाची लागवड करावी. आडसाली उस लागवडीसाठी को. ८६०३२, को.एम. ०२६५, को.व्ही.एस.आय.९८०५ या जातींची निवड करावी. बियाण्यास बीजप्रक्रिया करून लागण कारावी १०० लिटर पाण्यात १०० ग्रम बाविस्टीन मिसळून बेणे बुडवून घ्यावे. आडसाली ऊसात मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, चवळी, घेवडा इ. द्वीदल पिके घ्यावीत. तसेच पालक, शेपू, मेथी, वांगी, मिरची, कांदा इ. भाजीपाला पिके घ्यावीत.
श्री. अंकुश चोरमुले आणि श्री. विनायक शिंदे-पाटील
सोयाबीन–
सोयाबीन पेरणीसाठी सुधारित वाणांचा वापर करावा. लागवडी साठी जे एस ३३५, फुले कल्याणी किंवा फुले अग्रणी जातींची निवड करावी. पेरणीसाठी हेक्टरी ७५ किलो व टोकणीसाठी ४५ किलो बियाणे वापरावे. पेरणीसाठी ४५ X १० सें.मी. अंतर ठेवावे. हेक्टरी ५० किलो नत्र व ७५ किलो स्फुरद संपुर्ण पेरणीच्यावेळी द्यावे.बीजप्रक्रीया एक किलो बियाण्यास २.५ ग्रँम कार्बेन्डँझिम बीज प्रक्रीया करा. नंतर १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रँम प्रमाणे रायझोबियम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांची बिजप्रक्रीया करा.
खरीप ज्वारी –
खरीप ज्वारी पेरणीसाठी शिफारस केलेल्या जातीचाच वापर करावा..यामध्ये संकरीत वाण सी.एस.एच.,५, ९, १३, १४, १६,१७,१८, २३ तसेच सुधारीत वाण एस.पी.व्ही,४६२, ४७५ व ९४६, सी.एस.व्ही.१३,१५,१७,२० या जातींची निवड करावी. मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यावर ताबडतोब पेरणी करावी पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. बीजप्रक्रियेसाठी अँझोटोबँक्टर जीवाणू २५० ग्रँम प्रती १० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रीया करावी.पेरणीचेवेळी अर्धे नत्र, संपुर्ण स्फुरद व पालाश द्यावे.(नत्र, स्फुरद व पालाश – १००:५०:५० प्रती हेक्टर) पेरणीनंतर एक महिन्याने ५०किलो नत्राची मात्रा प्रतीहेक्टर द्या.
श्री. अंकुश चोरमुले आणि श्री. विनायक शिंदे-पाटील
कापूस-बागायती कापूस-
लागवडी साठी सुधारित किंवा संकरीत वाणांची निवड करावी. शक्यतो BT बियाणे निवडावे. संकरीत कापसासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, आणि ५० किलो पालाश तर सुधारित वाणासाठी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, आणि ४० किलो पालाश द्यावे. २० % नत्र आणि संपूर्ण स्फुरद, पालाश लागवडी वेळी द्यावे. उरलेले नत्र ३० व ६० दिवसांनी विभागून द्यावे. पीक तण विरहित ठेवावे. पाऊस सुरू होई पर्यन्त गरजे प्रमाणे पाणी देत राहावे. रस सोषण करणार्या किडींच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० ई.सी. १० .मि. ली.किंवा इमिडाक्लोप्रिड ३ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.मित्र किडींचा वापर करावा. बोण्ड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापसातील सूर्यफूल,हरभरा, करडई,भुईमूग या सारख्या पिकांची रोपे उपटून टाकावी.
कोरडवाहु कापूस-
ओलावा टिकवण्यासाठी कापूस पिकाची लागवड /पेरणी उताराला आडवी समपातळीत करावी. पेरणीसाठी सुधारित किंवा संकरीत वाणाची निवड करावी.
बाजरी –
पावसाची सुरवात झाल्यानंतर व जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीसाठी शिफारस केलेल्या सुधारीत व संकरीत वाणांचाच वापर करा.संकरीत वनामध्ये श्रध्दा (आर.एच.आर.बी.एच.८६०९), सबुरी (आर.एच.आर.बी.एच.८९२४, शांती, आदिशक्ती या वाणांची निवड करावी.सुधारीत वनांमध्ये – डब्ल्यू.सी.सी.७५, आय.सी.टी.पी.८२०३, धनशक्ती या वाणांची निवड करावी. ओलीताची सोय असेल अशा ठिकाणी शक्यतो संकरीत वाण पेरावे. अँझोटोबँक्टर जिवाणूची २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.शिफारशीप्रमाणे रासायनिक खाते द्यावीत.(४०:२०:२० नत्र-स्फुरद-पालाश किलो / हेक्टरी)बाजरीचे वाणानुसार हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे..पाणी देणे शक्य असल्यास फुटवे येणाच्या कालावधीत म्हणजे २० ते २५ दिवसांनी एक पाणी द्यावे.
श्री. अंकुश चोरमुले आणि श्री. विनायक शिंदे-पाटील
भुईमूग –
भुईमुगाची पेरणी सदाहरण पाने १५ जून- १५ जुलै या वेळेत करावी.पेरणीसाठी सुधारीत आणि शिफारस केलेल्या जातींची निवड करावी. (एस.बी.११, फुले प्रगती, टी.ए.जी.२४ व टी.जी.२६, जे. एल. ५०१ फुले भारती (जे.एल.७७६), फुले उन्नती, फुले व्यास, फुले उनप) पेरणीसाठी प्रकारानुसार हेक्टरी १०० ते १२० किलो बियाणे वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास कार्बेन्डाझीम २ ग्रँम प्रती किलो बिजप्रक्रीया करावी. त्यानंतर बियाण्यावर रायझोबियम व स्फुरद जिवाणूची प्रक्रीया करावी. (२५० ग्रँम प्रत्येकी प्रती १०किलोस. रासायनिक खतामध्ये हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद किंवा १०० किलो डायअमोनियम फॉस्फेट संपुर्ण पेरणीच्या वेळी द्यावे + ४०० किलो जिप्सम (अर्धा पेरणीच्यावेळी व अर्धा आऱ्या सुटताना द्यावे)
तूर –
मान्सूनचा पाऊस झाल्यावर वापसा येताच तुरीची पेरणी करावी. पेरणीसाठी बी.डी.एन.१,२,आय.सी.पी.एल.८७११९,आय.सी.पी.एल.८७,बी.एस.एम.आर.८५३, .के.टी.८८११, विपूला (टी-९२३०),एन-२९०-२१, फुले राजेश्वेरी, या वाणांची निवड करावी. आय.सी.पी.एल.८७ च्या पेरणीसाठी हेक्टरी १८ ते २० किलो बियाणे लागते व इतर जातींसाठी १२-१५ किलो लागते. बियाण्यास भुईमुगाप्रमाणेच बीजप्रक्रीया करावी. हेक्टरी १२५ किलो DAP पेरणीच्या वेळी द्यावे. बाजरी अधिक तूर, सूर्यफूल अधिक तूर आंतर पिक घेणे फायदेशीर आहे. (१:२ प्रमाण)
उडीद, मूग, कुळीथ, मटकी, चवळी, वाटाणा जमिनीत पुरेशी ओल आल्याबरोबर करावी.. पेरणीचेवेळी खताची मात्रा हेक्टरी २५ किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद द्यावे. तसेंच प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रँम कार्बेन्डाझीम व तदनंतर स्फुरद व रायझोबियम जीवाणू प्रत्येकी २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी. बियाण्याची मात्रा शिफारशीप्रमाणे वापरा.
श्री. अंकुश चोरमुले आणि श्री. विनायक शिंदे-पाटील
सुर्यफुल– पेरणीसाठी सुधारीत व शिफारस केलेल्या वाणांची निवड करून जमिनीत पुरेशी ओल असल्यावर पेरणी करावी. त्याकरीता सुधारित फुले भास्कर , मॉर्डेन, एस.एस.५६, भानू तसेच संकरीत जातीमध्ये फुले रविराज,के.बी.एस.एच.४४ या वाणाची निवड कारावी..पेरणीसाठी हेक्टरी ८ते १० किलो बियाणे वापरावे. पेरणीअंतर मध्यम जमिनीत ४५ X ३० सें.मी. व भारी जमिनीत ६० X ३० सें.मी. ठेवावे . पेरणीपुर्वी १ किलो बियाण्यास ५ ग्रँम मेटँलँक्झील (३५ टक्के अँप्रॉन) बिजप्रक्रीया करा. शेवटी प्रतिकिलो बियाण्यास २५ ग्रँम अँझोटोबँक्टर व २५ ग्रँम स्फुरद जिवाणूची प्रक्रीया करा.बागायती पिकासाठी पेरणीच्यावेळी हेक्टरी ३० किलो नत्र, २५ किलो स्फुरद व २५ किलो पालाश व पेरणीनंतर एक महिन्याने ३० किलो नत्र द्यावे.
थोडक्यात पण महत्वाचे....
फळपिके –
फळपिकांची काढणी झाल्यानंतर पिकांचे अवशेष शेताच्या बाहेर काढावेत.. रोगग्रस्त, किडग्रस्त फांद्या कापून चाटून टाकाव्यात. जमिनीची नांगरट करावी त्यामुळे रोग व किडीच्या सुप्तवास्ता प्रखर सूर्यप्रकाशात येवून मारून जातात. नियंत्रणासाठी मदत होते.आंबा, चिक्कू, पेरू, डाळींब, नारळ तसेंच कोरडवाहू फळे यांची नवीन लागवड शिफारस केलेल्या अंतरावर पाऊस सूरू होताच करावी. भाजीपाला पिकांची लागवड करावयाची असल्यास जून च्या पहिल्या आठवड्यात रोपे तरी करावीत आणि जून च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लाजाद करून घ्यावी.
वर दिलेल्या सर्व बाबींचा विचार करून खरिफ पिकांचे नियोजन करा. या वर्षी पाऊस चांगला असल्याने उत्पादन चांगले मिळू शकते. पुन्हा एकदा आपणा सर्वाना खरिफ हंगामासाठी आभाळभर शुभेच्छा...