23/03/2020
कोरोना मुळे घ्यायची काळजी , भविष्यातल्या अडचणी व त्यावरील उपाय !!
१) शासन व डॉक्टर्स ज्या ज्या गोष्टी करू नका असे सांगत आहेत , त्या करू नयेत !
२) बाहेरचे अन्न खाऊ नये !
३) ताजे व गरम अन्न खावे !
४) शेक हॅन्ड न करता , दोन्ही हात जोडून नमस्कार करावा !
५) पाणी भरपूर प्या , पुरेशी विश्रांती घ्या !
६) गर्दीत जाणे येणे टाळा !
७) कोमट पाणी प्या !
८) दिसभरातून कमीत कमी 45 मिनिटे चाला !
९) योगासने व प्राणायाम करा !
१०) काळजी घ्या पण भिऊ नका !
११) बातम्या पहा पण त्याचा negative परिणाम होऊ देऊ नका !
१२) परिस्थिती आटोक्यात येई पर्यंत पाहुणे होऊन जाऊ नका आणि पाहुण्यांना येऊ देऊ नका !
( हो स्पष्टपणे नकार द्या काही फरक पडत नाही ) !
१३) थोडा जास्तीचा किराणा असू द्या !
१४) पुढील काही महिने प्रत्येकासाठीच आर्थिक टंचाईचे असणार , त्यामुळे जपून खर्च करा !
१५) खरेदीचा मोह टाळा !
१६) व्यवसाय कोणताही असो आर्थिक अडचणी येणारच , प्रॉफिट कमी होणारच !
१७) काही जणांचे जॉब सुद्धा जाऊ शकतात !
१८) काहींच्या पगारी होऊ शकणार नाहीत !
१९) एकमेकाला आधार देणे व जगविणे याला प्राधान्य द्यावे लागेल !
२०) शान , शौक अजिबात बंद करा !
२१) फक्त घरचे अन्न खा !
२२) संकट नक्कीच आहे पण हिंमत हारू नका !
२३) मुलांना अभ्यासा वरून , टक्केवारी वरून रागाऊ नका !
२४) एकमेकाला घालून पाडून बोलू नका !
२५) येणाऱ्या आर्थिक टंचाईला हसतमुखाने सामोरे जा !
२६) एक वेळेस जेवा पण आपसातील प्रेम , माया कमी होऊ देऊ नका !
२७) जातीय सलोखा ठेवा , शक्य तेवढी एकमेकाला मदत करा !
२८) भारत माझा देश आहे व सारे भारतीय माझे बांधव आहेत .....हे कुणीही व कधीही विसरू नका !
२९) डॉक्टर मंडळींचा आदर करा , त्यांच्यावर विश्वास ठेवा , त्यांच्या कामात अडथळे आणू नका !
३०) सगळे चांगले होईल अजिबात काळजी करू नका आणि कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नका !
३१) राज्य शासनाला व केंद्र शासनाला सहकार्य करा , त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा आपण नक्की या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडू !