21/05/2026
माझ्या सर्व ठेवीदार बांधवांनो,
आज मी आपल्या सर्वांसमोर अत्यंत जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे उभा आहे. गेल्या काही दिवसांपासून संस्थेबद्दल काही अफवा, चुकीच्या बातम्या आणि भीती पसरवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे. मी आपणास स्पष्टपणे सांगू इच्छितो की घाबरण्याची अजिबात गरज नाही. आपल्या सर्वांची ठेव पूर्णपणे सुरक्षित आहे.
ही संस्था गेल्या ३६ वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि विश्वासाने समाजाची सेवा करत आहे. हजारो कुटुंबांचा विश्वास आम्ही वर्षानुवर्षे जपला आहे आणि तोच विश्वास आजही आमची सर्वात मोठी ताकद आहे.
मी एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो — आमची संस्था नवीन ठेवींवर अवलंबून नाही. संस्थेकडे ठेवींपेक्षा अधिक मालमत्ता, संपत्ती आणि आर्थिक क्षमता उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीमुळे घाबरण्याचे कारण नाही.
संस्थेचा पाया मजबूत आहे, व्यवस्थापन सक्षम आहे आणि प्रत्येक ठ�