15/09/2025
*आरंभ महिला नागरी सहकारी पत संस्था ची आम सभा उत्साहात*
आरंभ महिला नागरी सहकारी पत संस्था (मर्या.) नागपुर जिल्हा या संस्थेची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या मुख्य कार्यालय संजय गांधी नगर पीपला रोड हुडकेश्वर नागपुर येथे उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे मुख्य कार्यकरी अधिकारी सुरज कावरे यांनी केले. सभेत संस्थेच्या अध्यक्षा अभिलाषा महल्ले यांनी पतसंस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला.
यामध्ये २०२४-२५ वर्षात संस्थेत एकुन १६० लक्ष रूपयांच्या ठेवी आहेत. ११२ लक्ष रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच यावर्षी संस्थेला ६५ हजार ५४७ रूपयांचा नफा झाला असून संस्था जलद कर्ज वाटप करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणत आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अभिलाषा महल्ले यांनी दिली.
आरंभ पतसंस्था च्या वार्षिक सभेस
संपूर्ण नागपूर जिल्ह्यात संस्थेचे कार्यक्षेत्र मधे विविध तालुक्यात संस्थेच्या नवीन शाखा सुरू करण्याचा मानस अध्यक्षा अभिलाषा महल्ले यांनी व्यक्त केला. तसेच या वर्षी सभासदांना ०२ टक्के दराने लाभांश देण्याचे जाहीर केले. आरंभ पतसंस्थेने महिलांसाठी विविध योजन सुरू करून त्यांना बचतीची सवय लावली आहे. या विविध योजनेत १ हजार खातेदार करायचे आणि संस्थेचा मुदत ठेवीचे ५ कोटी इतके करायचे उद्दिष्ट ठेवलेले आहे, असे संस्थेच्या अध्यक्षा अभिलाषा महल्ले म्हणाल्या.
यावेळी संस्थेचे तज्ञ संचालक तथा सहकार भारती पगारदार पत संस्था प्रकोष्ठ राज्यप्रमुख मा. नानाभाऊ महल्ले यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना, संस्थेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, कर्जवसुलीची काटेकोर अंमलबजावणी तसेच महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्थेने कार्य करावे असे सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या माजी संचालिका वैशाली कडू या प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होत्या. या सभे प्रासंगी संस्थेच्या उपाध्यक्ष मंजुषा भुरे, संचालिका अश्विनी कावरे, नलिनी महल्ले, नीलिमा मुरमारे,भारती नेवले,गायत्री खंडते, वैशाली भोतमांगे, तज्ञ संचालक इंजी. संजय खोंडे,सहायक व्यवस्थापक भूषण चौधरी, लिपिक अश्विनी डूभरे, शिपाई कल्पना नेरकर यांनी कार्यक्रम करिता परिश्रम घेतले.