Forest Rangers Association Maharashtra

Directions

Forest Rangers Association Maharashtra Maharashtra Range Forest Officer Organization

🌑जाहीर निषेध🌑प्रत‍ि. मा. प्रधान मुख्यवनसंरक्षक (वनबलप्रमुख),           महाराष्ट्र राज्य, नागपूरव‍िषय:- द‍िपाली चव्हान वन...
26/03/2021

🌑जाहीर निषेध🌑

प्रत‍ि.
मा. प्रधान मुख्यवनसंरक्षक (वनबलप्रमुख),
महाराष्ट्र राज्य, नागपूर
व‍िषय:- द‍िपाली चव्हान वनपर‍िक्षेत्र अध‍िकारी, हर‍ियाल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांचे आत्महत्येस
जबाबदार असणाऱ्या अध‍िकाऱ्यांनवर कार्यवाही करणेबाबत.
महोदय,
न‍िवेदन सादर करताना अत्यंत दु:ख होत आहे की, द‍िपाली चव्हान वनपर‍िक्षेत्र अध‍िकारी, हर‍ियाल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांनी द‍िनांक 25 मार्च 2021 रोजी श्री. व‍िनोद श‍िवकुमार उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव यांचे त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली. याबाबत द‍िवंगत द‍िपाली चव्हान यांनी 4 पानांची सुसाईट नोट सुदधा ल‍िहीलेली आहे.
द‍िपाली चव्हान या वनव‍िभागातील अत्यंत धाडसी, कर्तबगार, न‍िडर अशा वनपर‍िक्षेत्र अध‍िकारी असुन त्यांनी वन व वन्यजीवांचे संरक्षणकरीता आपले ज‍िवाची पर्वा न करता शासकीय कर्तव्य बजावले होते. तसेच द‍िवंगत द‍िपाली चव्हान या प्रेगनंट होत्या. त्यांचे पोटात छोट बाळ असतांना ऐवढे मोठे पाऊल उचलण्याकर‍िता त्यांना त्यांचे वरीष्ठ श्री. व‍िनोद श‍िवकुमार यांनी प्रवृत्त केले. संपुर्ण सुसाईट नोट चे अवलोकन केले असता असे द‍िसुन येते की, श‍िवकुमार उपवनसंरक्षक हे द‍िवंगत द‍िपाली चव्हान यांना व‍िनाकरण आर्थ‍िक व मानस‍िक त्रास देत होते व त्यांचे शारीरीक शोषन करण्याचा सुद्धा मानस द‍िसुन येत होता.
द‍िवंगत द‍िपाली चव्हान यांनी त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल श्री. श्रीन‍िवास रेड्डी अपर मुख्य वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांना वेळोवेळी अवगत केले परंतु श्री. रेड्डी साहेब यांनी त्यांचे तक्रारीची कोणतीही गंभीर दखल घेतली नाही.
तरी श्री. व‍िनोद श‍िवकुमार यांचे व‍िरुद्ध FIR क्र. 0211/2021 कलम 306 अन्वये पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. तरी सदर प्रकरणी श्री. व‍िनोद श‍िवकुमार, उपवनसंरक्षक यांना तत्काळ न‍िलंबीत करण्यात यावे तसेच त्वरीत त्यांना 7 द‍िवसाच्या आत बडतर्फ करण्यात यावे. तसेच त्यांचे व‍िरुद्ध IPC कलम 302, 354 A, 376 C अन्वये सुद्धा फौजदारी कार्यवाही करण्यात यावी. तसेच श्री. व‍िनोद श‍िवकुमार यांना पाठीशी बालणारे श्री. श्रीन‍िवास रेड्डी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व सदर प्रकरण जे कोणी वरीष्ठ वनअध‍िकारी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या जबाबदार आहे त्या सर्वांची CID मार्फत चौकशी करण्यात यावी व या प्रकरणात सर्व दोषी वनअध‍िकारी यांचे व‍िरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करुन त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल.
द‍िनांक 26/03/2021
अध्यक्ष / सरच‍िटणीस
फॉरेस्ट रेंजर्स असोस‍िएशन महाराष्ट्र

प्रत‍िलीपी:-मा. उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री व वनमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना उच‍ित कार्यवाहीस सव‍िनय सादर.
प्रत‍िलीपी:-मा. देवेन्द्रजी फडणवीस, व‍िरोधी पक्षी नेते विधानसभा, महाराष्ट्र राज्य यांना उच‍ित कार्यवाहीस सव‍िनय
सादर.
प्रत‍िलीपी:-मा. प्रधान सच‍िव, वने, महाराष्ट्र राज्य यांना उच‍ित कार्यवाहीस सव‍िनय सादर.
प्रत‍िलीपी:-मा. ज‍िल्हाध‍िकारी, अमरावती यांना उच‍ित कार्यवाहीस सव‍िनय सादर.
प्रत‍िलीपी:-मा. पोलीस अध‍िक्षक, अमरावती यांना उच‍ित कार्यवाहीस सव‍िनय सादर.

वनवणवा मानवनिर्मित संकट....जंगलात फिरणारे गुराखी व इतर लोक विडी, सिगारेट, आगकाडीचे थोटूक तसेच फेकतात. मध गोळा करणारे टें...
13/03/2021

वनवणवा मानवनिर्मित संकट....
जंगलात फिरणारे गुराखी व इतर लोक विडी, सिगारेट, आगकाडीचे थोटूक तसेच फेकतात. मध गोळा करणारे टेंभे घेऊन जातात आणि काम झाल्यावर तसेच फेकतात.
तेंदूपत्ता चांगला यावा म्हणून आग लावली जाते.
मोहफुले वेचताना जमिनीवर पडलेल्या पानांचा त्रास होतो म्हणून त्याला आग लावली जाते. गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, असा गैरसमज गुराख्यांमध्ये आहे. त्याकरिता ते गवत पेटवून देतात.
ज्या जंगलात आदिवासी आहे आणि ज्याच्या बाजूला शेती आहे त्या ठिकाणी हमखास वणव्याची परिस्थिती तयार होते.
जंगलालगत शेती असेल तर तेथेही सुपीक पिकांसाठी जमीन साफ केली जाते. त्यासाठी लावलेली आग पसरत जाऊन जंगलापर्यंत पोहोचते आणि वणवा भडकतो.
जंगलमाफिया वन विभागामार्फत होणारी कायदेशीर कार्यवाहीमुळे देखील मुद्दाम आगी लावतात, वणव्यानंतर मोकळी होणारी वनजमीन हाही एक आडफायदा असतोच.

अशाप्रकारे वनांमध्ये #आग लावणे हा भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1)(ब),(क) नुसार दंडनीय गुन्हा आहे.

World Wildlife Day 2021“Forests and Livelihoods: Sustaining People and Planet,”
03/03/2021

World Wildlife Day 2021

“Forests and Livelihoods: Sustaining People and Planet,”




The TENTH annual World Pangolin Day will be celebrated on 20 February 2021!
20/02/2021

The TENTH annual World Pangolin Day will be celebrated on 20 February 2021!


माझी वसुंधरा अभियान : 'पंचतत्त्वा'नुसार होणार  पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन  दि. 2 ऑक्टोबर,2020 ते  31 मार्च, 2021 या काल...
04/01/2021

माझी वसुंधरा अभियान : 'पंचतत्त्वा'नुसार होणार पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन दि. 2 ऑक्टोबर,2020 ते 31 मार्च, 2021 या कालावधीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. यामधून राज्यातील अमृत शहरे 43, नगरपरिषद 226 व नगरपंचायती 126 सहभाग नोंदविणार आहेत. आपण ही खालील लिंक व्दारे प्रमाणपत्र प्राप्त करून या अभियानात सहभाग घेऊन वसुंधरेच्या ऋणाची उतराई करूयात.


https://majhivasundhara.in/en

ज्ञानगंगा अभयारण्यबुलडाण्यापासून आठ किलोमीटरवर तर खामगावपासून २० किलोमीटरवर ज्ञानगंगा नदीशेजारी वसलेल्या २०५.२१० चौरस कि...
08/12/2020

ज्ञानगंगा अभयारण्य
बुलडाण्यापासून आठ किलोमीटरवर तर खामगावपासून २० किलोमीटरवर ज्ञानगंगा नदीशेजारी वसलेल्या २०५.२१० चौरस किलोमीटरच्या क्षेत्राला ९ मे १९९७ रोजी वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळाला. अभयारण्यात वाघ,अस्वल, रानगवे, बिबटय़ा, हरिण, काळवीट, रानमांजर, जंगली कुत्रे, तरस, लांडगा, रानडुक्कर, नीलगाय, चौिशगा, माकड, वटवाघूळ, यासारखे वन्यजीव मुक्तपणे संचार करतात.

खंडणी मागणे हे कायदेशीर गुन्हा असून भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 34, 384, 385 अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो.https://youtu...
08/12/2020

खंडणी मागणे हे कायदेशीर गुन्हा असून भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 34, 384, 385 अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो.

https://youtu.be/evCT0OI34rw

03/12/2020

मानव-बिबट्या संघर्ष सहजरित्या टाळता येऊ शकतो...
आजकाल बिबट्या आपल्या गावात शहरात शेतात सहज दिसू लागला आहे.त्यासाठी कोणती खबरदारी व दक्षता घ्यावी या संदर्भात महाराष्ट्र वन विभागाने केलेली चित्रफीत खास आपल्या साठी..🐆🐆🐆
https://youtu.be/lncTFXJFY00

May Millions Of Lamps illuminate Your Life With Endless Joy, Prosperity, Health & Wealth Forever.Let’s pledge to go gree...
15/11/2020

May Millions Of Lamps illuminate Your Life With Endless Joy, Prosperity, Health & Wealth Forever.
Let’s pledge to go green and stop acting mean.Nature wants an eco-friendly Diwali.

Wishing You And Your Family.
Happy & Safe Diwali !!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Address

Nagpur
440006

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Forest Rangers Association Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share