Grownick Investments

Grownick Investments Information Related to Mutual Fund Investments

Wish you all a very Happy Holi!
24/03/2024

Wish you all a very Happy Holi!

02/01/2024

ELSS (Equity Linked Saving Schemes)

बऱ्याचदा म्युच्युअल फंडची चौकशी करताना एक प्रश्न विचारला जातो,

"म्युच्युअल फंडातली गुंतवणूक income tax saving साठी वापरता येईल का?"

हो!!! पण सगळेच म्युच्युअल फंड टॅक्स सेव्हिंगसाठी नसतात. टॅक्स सेव्हिंगसाठी वापरता येणाऱ्या म्युच्युअल फंड्सला ELSS (Equity Linked Saving Scheme) म्हणतात...या फंडमध्ये गुंतवलेले पैसे इन्कम टॅक्सच्या 80C मध्ये दाखवून वजावट मिळवता येते.

इन्कम टॅक्सच्या 80C अंतर्गत जी दिड लाख रुपयांची वजावट मिळते त्यासाठी विविध बचत योजना उपलब्ध आहेत. PPF, LIC, Kisan Vikas Patra, ULIP हे सगळे पर्याय यासाठी उपलब्ध आहेत. पण फक्त इन्व्हेस्टमेंट प्रूफ सबमिट करण्यासाठी घाईघाईने वरील पैकी कुठल्याही पर्यायात गुंतवणूक करण्याआधी म्युच्युअल फंडच्या ELSS या पर्यायाचा जरूर विचार करा. ELSS मध्ये केलेली गुंतवणूकसुद्धा 80C मध्ये दाखवता येते.

ELSS हे Diversified Mutual Fund सारखे असतात. ते Large, Mid आणि Small अशा सर्व प्रकारच्या कंपनी मध्ये गुंतवणूक करतात. ELSS मध्ये हायब्रीड फंडपेक्षा जास्त व सेक्टर फंडपेक्षा कमी धोका असतो. व्यवसायात निश्चित परतावा नसतो. म्हणून ELSS मध्येही निश्चित परतावा नसतो. मागील काळातील म्युच्युअल फंडचा परतावा पाहून आपण काही अंदाज लावू शकतो. पण मागील परतावा भविष्यात मिळेल का नाही याची शाश्वती नसते. परतावा जास्त, कमी किंवा सारखाही असू शकतो. मागील काही दशकांमध्ये ELSS च्या काही फंडने चांगला परतावा दिला आहे. त्याचे उदाहरण आपण इथे पाहू शकता. SBI Magnum Tax Gain 93 हा फंड २२ वर्षात ४० पट झाला. तर Birla Sunlife Tax Relief 96 हा फंड 20 वर्षात १०० पट झालाय.

साधारणपणे इतर म्युच्युअल फंड्सला एक वर्षाचा lock in period असतो. पण ELSS फंड्सला तीन वर्षे lock in period असतो.

ELSS मध्ये गुंतवणुकीचे दोन पर्याय आहेत.

१. LUMPSUM – एकाच वेळी गुंतवणूक करणे.

२. SIP – नियमित गुंतवणूक करणे.

SIP यात तुम्ही मासिक गुंतवणूक करू शकता.

SIP मधून मासिक गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्ष्यात घ्या. लॉक इन पिरियड ३ वर्षांचा आहे. म्हणजे ३ वर्ष पैसे काढता येणार नाहीत. तर SIP मध्ये ३ वर्षांचा काळ खालील प्रकारे पकडण्यात येईल.

नोव्हेंबर २०१७ साठी नोव्हेंबर २०२०

डिसेंबर २०१७ साठी नोव्हेंबर २०२०

जानेवारी २०१८ साठी जानेवारी २०२१

याचाच अर्थ असा आहे कि, SIP मध्ये जी मासिक गुंतवणूक करता, त्या तारखेपासून तुम्हाला ३ वर्ष म्हणजेच ३६ महिने वाट पहावी लागेल.

ELSS मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे--

१. ELSS चा लॉक इन पिरेड फक्त 3 वर्षे आहे. इतर कुठल्याही बचत योजनेपेक्षा हा पिरेड सगळ्यात कमी आहे.PPF मध्ये पंधरा वर्षे तर ULIP मध्ये पाच वर्षे लॉकइन पिरियड आहे.

2. वरील सगळ्या योजना बघितल्यात तर त्यातून जास्तीत जास्त 8-9% रिटर्न्स मिळतात. ELSS ने गेल्या दहा वर्षात किमान 12% रिटर्न्स दिलेले आहेत.

अगदी साधं उदाहरण देतो,
दरवर्षी एक लाख याप्रमाणे पंधरा वर्षात पंधरा लाख जर PPF मध्ये गुंतवले तर 7.1% या रेट ने मॅच्युरिटी व्हॅल्यू 27 लाख रुपये होईल..

हेच पैसे असेच ELSS मध्ये गुंतवले तर अगदी कमीत कमी म्हणजे 12% या रेट ने मॅच्युरिटी व्हॅल्यू 41.75 लाख रुपये होईल. ह्यावर पंधरा वर्षाने 10% इन्कम टॅक्स जरी कापला तरी तो साधारण 2.5 लाख रुपये असेल. म्हणजे नेट मॅट्यूरिटी व्हॅल्यू 39 लाख रुपये असेल.

त्यामुळेच घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा ELSS पर्यायाचा विचार जरूर करावा!

अधिक माहितीसाठी संपर्क करा

7350948300
GrowNICK Investments

(तळटीप : ज्यांनी ह्यावर्षी income tax चे New Tax Regime निवडलं असेल त्यांनी ELSS किंवा अन्य कुठल्याही बचत योजनेत गुंतवणूक करुन उपयोग नाही. वरील माहिती ही त्याचं लोकांना लागू आहे ज्यांनी old tax regime कायम ठेवला आहे.
अजूनही Tax regime निवडला नसल्यास आपआपल्या Tax Consultant चा सल्ला घेऊन निवडून घ्यावा!)

07/07/2023



पंधरा पंधरा पंधरा हा म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील एक सिद्धांत आहे. पंधरा हजाराची एसआयपी पंधरा वर्षे केली आणि या गुंतवणुकीने १५ टक्के वार्षिक नफा कमविला तर २७ लाखांच्या गुंतवणुकीवर १५ वर्षाच्या शेवटी १.०१ कोटीची रक्कम जमा होईल. ह्यात जर काही टक्क्यांची Step Up SIP केली तर आणखी जास्त रक्कम जमा होईल.

पण पंधरा टक्के रिटर्न्स मिळतीलच ह्याची लेखी गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. कारण ह्यामागे मार्केट रिस्क असते.जर गेल्या 10 वर्षातले एव्हरेज रिटर्न्स बघितले तर ते खालीलप्रमाणे आहेत..

Last 10 years
Category average returns
Large cap-- 14%
Mid cap --21%
Small cap -- 27%

रिस्क घेणे न घेणे आपल्यावर अवलंबून. पण आपण गुंतवणूक नाही केली तरी मार्केट आपल्या चालीने सुरूच राहणार आहे.

रिस्क न घेणे ही सगळ्यात मोठी रिस्क ठरू शकते!

म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी संपर्क करा..

7350948300
GrowNICK Investments

28/06/2023



Step up SIP

SIP म्हणजे Systematic Investment Plan हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. दर महिन्याला ठराविक रक्कम आपण SIP द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतो. आज आपण Step up SIP म्हणजे काय हे समजून घेऊ.

बरेच गुंतवणूकदार नियमितपणे SIP करत असतात. पण SIP ची रक्कम हळूहळू वाढवत नेली तर त्याचा अधिक फायदा होतो. ह्यासाठी Step up SIP सुविधेचा उपयोग करता येतो.उदाहरणार्थ जर आपण दर महिना पाच हजार रुपये SIP करत असू. तर पुढच्या वर्षी त्यात पाच-दहा टक्के वाढ करायची. म्हणजे आपली SIP रक्कम 5500 रुपये होईल. पुढल्या वर्षी आणखी दहा टक्के वाढ करायची. अर्थात हे सगळं आपल्या क्षमतेनुसार करायचं. पाच-दहा टक्के step up केल्यास आपल्यावर फार आर्थिक भार येत नाही. पण त्याचे दीर्घाकालीन फायदे खूप होतात.

दहा वर्षे SIP आणि दहा वर्षे Step up SIP ह्यात काय फरक पडतो ते पहा..

1. SIP 5000 per month for 10 years. Returns assumed -- 12% CAGR

Amount invested in 10 years -- 6,00,000
Portfolio Value after 10 years -- 11,61,695

2. SIP 5000 per month (with 10% step up every year ( for 10 years). Returns assumed --- 12% CAGR

Amount invested in 5 years -- 9,56,245
Portfolio Value after 10 years -- 16,87,163

फार आर्थिक भार न घेता आपण पण जास्त परतवा मिळवू शकतो हे वरील उदाहरणात दिसते.

Step up SIP सुरु करणे फार सोपे आहे. आजकाल प्रत्येकच म्युच्युअल फंड कंपनी हा पर्याय देते आहे.

ह्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा..

7350948300
GrowNICK Investments

24/06/2023




HDFC ने HDFC Non Cyclical Consumption Fund हा नविन फंड (NFO) लाँच केला आहे.

नावावरून विचित्र वाटत असला तरी हा सरळसरळ एक थीमॅटीक मल्टीकॅप फंड आहे. थीमॅटीक अश्यासाठी की हा FMCG, consumer durables, consumer services (Healthcare and other) अश्या सर्व consumption based कंपन्यामध्ये गुंतवणूक करणार आहे. Consumption ही ह्या फंडची थीम आहे. आणि मल्टीकॅप अश्यासाठी की हा फंड consumption ह्या क्षेत्रातल्या लार्ज, मिड आणि स्मॉलकॅप अश्या तीनही कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे.

भारताचे per capita income आता 2000 डॉलरच्या वर पोहोचले आहे. साधारणपणे हा टप्पा पार केल्यावर प्रत्येकचं अर्थव्यवस्थेमध्ये consumer products and services चा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. ज्याचा फायदा त्या त्या कंपन्यांना होतो. पर्यायाने तो शेयरहोल्डर्सलाही होतो.

साधारण सात ते दहा वर्ष गुंतवणूक करू शकणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडमध्ये गुंतवणूक करावी.

SIP दर महिना किमान पाचशे रुपये तर Lumpsum investment किमान पाच हजार रुपयांपासून करता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

7350948300
GrowNICK Investments

25/05/2023

*आता नको, मग नको*

गेल्याच आठवड्यात एकीचा फोन आला. आर्थिक नियोजनाबद्दल बोलायचंय म्हणाली. आमच्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये काम करते आणि त्यानंच माझा फोन नंबर दिल्याचं तिनं सांगितलं. गप्पा झाल्या, भेटायचं कधी ते ठरलं, पण त्यापुढे तिनं जे सांगितलं ते ऐकून मी विचारात पडले. ती म्हणाली दीड वर्षापासून आता फोन करू, मग फोन करू म्हणत होते आणि काहीना काही कारणानं राहून जात होता. दुसरी एक मैत्रीण महिन्याआड स्वतः फोन करून ‘हे सगळं फार महत्त्वाचं आहे ग. मी तुला पुढल्या आठवड्यात नक्की भेटायला येईन’ असं आश्वासन गेलं वर्षभर देतेय. गेली ६-७ वर्षं या क्षेत्रात काम करून एक गोष्ट जी प्रकर्षानं जाणवली आहे ती म्हणजे बहुतेक सर्वच लोक ‘आर्थिक नियोजन’ हा विषय आला की चालढकल करतात. त्यासाठी कारणं अनेक आहेत.

चालढकल करणं (procrastination) ही एक सवय आहे. आपण आयुष्यात अनेक गोष्टींची चालढकल करत असतो. परीक्षेचा अभ्यास आदल्या रात्री जागून करणं, इन्शुरन्स पॉलिसीच्या शेवटच्या दिवशी नूतनीकरणासाठी पळापळ करणं, ३१ जुलैला टॅक्स रिटर्न भरायला बसणं किंवा दरवर्षी २०-२२ मार्चनंतर करबचतीच्या गुंतवणुकीचे पर्याय शोधायला सुरुवात करणं, ही सगळी त्याचीच उदाहरणं.

कुठलीही गुंतवणूक किंवा आर्थिक नियोजन करताना वेळ हा घटक फार महत्त्वाचा असतो. आपण गुंतवणुकीला वाढण्यासाठी जेवढा जास्त वेळ देऊ शकतो, तेवढा जास्त परतावा त्यातून मिळू शकतो. म्हणजेच लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात केल्यास उद्दिष्टपूर्ती सहजसाध्य होते.

आर्थिक नियोजनाची चालढकल आपल्या कुटुंबासाठी फार खर्चीक ठरू शकते. एका सोप्या उदाहरणातून हे स्पष्ट होईल. समजा, गार्गी आणि मैत्रेयी नावाच्या दोन समवयस्क मैत्रिणी वयाच्या २५ व्या वर्षी एकाच दिवशी नोकरीला लागल्या. गार्गीनं पहिल्या पगारापासून दरमहा ५,००० रुपये बचत करायला सुरुवात केली आणि दरवर्षी ६०,००० रुपयांप्रमाणे पुढील १० वर्षांत सहा लाख रुपये गुंतवले. त्यापुढे तिनं नवीन गुंतवणूक करणं थांबवलं. याउलट मैत्रेयीनं पहिली १० वर्षं चालढकल केली आणि वयाच्या ३५ व्या वर्षांपासून दरमहा ५,००० रुपये गुंतवायला सुरुवात केली. गार्गीप्रमाणेच तिनंही पुढील १० वर्षांत सहा लाख रुपये गुंतवले आणि पुढची गुंतवणूक थांबवली. वयाच्या साठीला सेवानिवृत्तीच्या वेळी त्या दोघींच्या गुंतवणूक परताव्यात किती फरक पडला असेल? दोघींनाही गुंतवणुकीवर वार्षिक ८ टक्क्यांनी परतावा मिळत गेला, असं धरल्यास गार्गीच्या खात्यात ६३ लाख रुपये जमा झाले असतील तर, मैत्रेयीच्या खात्यात फक्त २९ लाख रुपये म्हणजेच बाकीचे घटक कायम ठेवता, १० वर्षांच्या चालढकलीमुळे मैत्रेयीचं ५० टक्क्यांहून जास्त नुकसान होईल.

आपलं मोठं नुकसान होऊ शकतं, हे कळूनही आपल्याकडून चालढकल होत असते. कळतंय पण वळत नाही म्हणतात ना तेच हे! गंमत म्हणजे याचं मानसशास्त्रीय कारण काय या विषयावर अनेक तज्ज्ञांनी संशोधन केलं आहे. त्यातून असं लक्षात आलं, की आपला मेंदू सर्व कामांची वेळेनुसार दोनच कप्प्यांत वर्गवारी करत असतो- ‘आता’ आणि ‘नंतर’. म्हणजे सोमवारी, पुढल्या आठवड्यात, पुढल्या महिन्यात वगैरे करायची सगळीच कामं ‘नंतर’ कप्प्यात जातात. ‘आता’ करायच्या कामांच्या तुलनेत ‘नंतर’ म्हणजेच भविष्यात कधीतरी करायच्या कामांचं फारसं दडपण आपला मेंदू घेत नाही. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला जराशीदेखील कठीण, कष्टप्रद, गुंतागुंतीची वाटते तिला आपला मेंदू ‘नंतर’ कप्प्यात टाकून देतो. त्यामुळेच आपलं ‘जिमला जायचंय? १ तारखेपासून नक्की, ‘डाएटिंग सुरू करायचंय, पुढल्या आठवड्यापासून करू’, ‘वार्षिक चेकअपसाठी डेन्टिस्टकडे जायचा दिवस आला, जाऊ पुढच्या शनिवारी’ असं सारखं होत असतं.

‘नंतर’ कप्प्यातली कामं महत्त्वाची आहेत आणि आपण ती करायची आहेत, असं आपण स्वतःला बजावत राहतो, पण त्यातली बहुतांश कामं अनिवार्य होईपर्यंत त्याच कप्प्यात पडून राहतात. आर्थिक नियोजन, गुंतवणूक, जमाखर्च आणि त्यासाठीची आकडेमोड या गोष्टी बऱ्याच लोकांनी कुठेतरी मनात कठीण, क्लिष्ट, अवघड आहेत, असं ठरवून टाकलेल्या असतात. त्यामुळे त्या ‘नंतर’ कप्प्यातून ‘आता’ कप्प्यात कधीच येत नाहीत. दुसऱ्या असंख्य सोप्या, सवयीच्या, आरामाच्या, आवडीच्या गोष्टी आपण करत राहतो आणि ‘आर्थिक नियोजन ना? नक्की बघू पुढच्या महिन्यात’ असं स्वतःलाच बजावत राहतो.

या चालढकलीच्या समस्येतून बाहेर पडायचं असेल, तर आपल्या मनाला थोडंसं फसवायची गरज आहे. ‘३ इडियट्स’मधला आमीर खान ऊर्फ रॅन्चो नाही का सांगायचा ‘आपलं मन घाबरट असतं. त्याला शांत ठेवण्यासाठी फसवावं लागतं. कितीही कठीण प्रसंग आला तरी तुमच्या मनाला बजावत राहा All is well!’ तसंच काहीसं! तुम्ही तुमच्या मनाला सांगा ‘आज फक्त दहा मिनिटं- फक्त दहाच मिनिटं- आर्थिक नियोजनासाठी घालवू’. तुम्ही ‘फक्त १० मिनिटं’ म्हटलंत की तुमचा मेंदू हे क्लिष्ट, कठीण वाटणारं काम ‘नंतर’ कप्प्यातून ‘आता’ कप्प्यात आणायला तयार होईल. हे तुम्ही साधलंत तर निम्मी फत्ते झालीच म्हणून समजा. ताबडतोब कागद-पेन घ्या किंवा संगणक सुरू करा आणि आपल्या आर्थिक नियोजनाबद्दल मनात येणारे विचार, प्रश्न, शंका, अपेक्षा, कल्पना हे नुसतं लिहून काढायला सुरुवात करा. किंवा फोन उचला आणि एखाद्या अनुभवी व्यक्तीशी बोला. एकदा सुरू केलंत, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल, की आधी वाटलं होतं, तेवढ्या काही या गोष्टी क्लिष्ट वा कंटाळवाण्या नाहीत.

या लेखमालेत डिसेंबरमधील काही लेखांत आर्थिक उद्दिष्टं कशी निश्चित करावीत, त्यासाठी गुंतवणूक किती करावी यासाठीची सुलभ अंदाजकोष्टकं दिली होती. आकडेमोडीशिवाय उत्तरं शोधण्यासाठी त्यांचा उपयोग करा. तुमच्या अनेक प्रश्नांना इंटरनेटवर उत्तरं सापडू शकतात ती बघा आणि तरीही ज्या शंका असतील, त्यांचं निरसन अनुभवी व्यक्तींकडून करून घेता येईल. एक अगडबंब वाटणारी गोष्ट कृतिशील छोट्या छोट्या भागात विभागली जाताच सहजसाध्य वाटू लागेल.

आर्थिक नियोजनाबाबत सततची चालढकल हे मानसिक अस्वस्थतेचं कारण ठरू शकतं. आपण कमावतो आहोत ते पुरेसं आहे का, पुरेशी बचत करत आहोत का, खर्च कमी करायची गरज आहे का, योग्य गुंतवणूक करतो आहोत की नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला नियोजनामुळे मिळू शकतात आणि भविष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी योग्य वेळी पुरेसा निधी उपलब्ध होणार आहे याची खात्री आपल्याला मनःशांती मिळवून देते.

पैसा हे एक साधन आहे. त्याच्या सुयोग्य नियोजनानं आपण आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करून आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो. त्यासाठी गरज आहे ती थोड्या मानसिक शिस्तीची.

चला तर मग! संत कबीरांचा उपदेश *‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’* आर्थिक नियोजनालादेखील लागू करुया आणि मनाच्या ‘नंतर’ कप्प्यात राहून गेलेला हा विषय ‘आता’ कप्प्यात आणुया!

*© प्राजक्ता कशेळकर*

09/05/2023




Quant Bussiness Cycle Fund!

कुठल्याही बिझनेसचे चार टप्पे असतात..

1. Expansion

या टप्प्यात बिझनेस वाढत असतो. कंपनी नविन नविन प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेस लाँच करत असते. त्यासाठी गुंतवणूकसुद्धा करत असते. आणि कंपनीचा रेव्हेन्यू आणि पर्यायाने नफा वाढत असतो.

2. Peak

या टप्प्यात बिझनेस त्याच्या अत्त्यूच्च पातळीवर पोहोचला असतो. जिथं तो काहीकाळ रेंगाळतो. याकाळात कंपनीचा रेव्हेन्यू आणि नफा सर्वात जास्त होतो.

3. Contraction

या टप्प्यात बिझनेस हळूहळू कमी व्हायला लागतो. ह्याला तशी बरीच कारणं आहेत. मार्केटमध्ये वाढलेली कॉम्पिटीशन किंवा मार्केट saturation मुळे हे घडते.

4. Slump

या टप्प्यात बिझनेस खूप कमी झालेला असतो.

Quant ने लॉन्च केलेला Business Cycle Fund या संकल्पनेवर आधारित आहे. हा फंड मार्केटमध्ये expansion फेजमध्ये असलेल्या कंपन्यात गुंतवणूक करतो. आणि Peak फेजमध्ये असताना त्यातून हळूहळू बाहेर पडतो. अगदी थोडक्यात सांगायचं तर मार्केटच्या "बहत्या गंगेत" हाथ धुवून घेणारा हा फंड आहे.

गेल्यावर्षी ICICI,Tata आणि HDFC ह्यांनी हा असाच फंड लॉन्च केला होता. पैकी दोन फन्ड्सचा वर्षभरातला परफॉर्मन्स चांगला आहे. पण एक वर्ष हा तसा खूप कमी कालावधी आहे.

हा फंड High Risk प्रकारात मोडतो.

दीर्घकाळ गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कमीतकमी गुंतवणूक रक्कम ही पाच हजार आहे.

या किंवा दुसऱ्या कुठल्याही फंडमध्ये गुंतवणूक करायची असल्यास संपर्क करा..

GrowNICK Investments
7350948300

10/03/2023



फेब्रुवारी महिन्यात इक्वीटी म्युच्युअल फंड्समध्ये 15685 कोटी इतकी गुंतवणूक झाली आहे.

जानेवारी महिन्याच्या तुलनेत ही गुंतवणूक 3100 कोटी रुपयांनी जास्त आहे. तर डिसेंबर महिन्याच्या तुलनेत तब्बल 8400 कोटींपेक्षाही जास्त आहे. म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त!!

रिटेल गुंतवणूकदार बाजारात ज्या निकराने लढा देत आहेत त्यामुळे शेयर बाजारावरील मंदीचे मळभ लवकरच निघून जाईल अशी आशा करूया!!

7350948300
GrowNICK Investments

05/03/2023



म्युच्युअल फंड्स म्हणजे काय!
त्याचे किती प्रकार आहेत!
त्यात गुंतवणूक का करावी आणि कशी करावी!

या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज दुपारी तीन ते चार यावेळी एक ऑनलाईन सेशन घेतो आहे. सेशन खाली दिलेल्या Google Meet वर असेल.

https://meet.google.com/qih-dpzg-dvp

इच्छुक लोकांनी दुपारी तीन वाजता जॉईन व्हावे.

7350948300
GrowNICK Investments

 "त्या म्युच्युअल फंडापेक्षा आपली FD बरी.."किंवा"फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा म्युच्युअल फंड कितीतरी जास्त रिटर्न्स देतात"ह्या...
01/03/2023



"त्या म्युच्युअल फंडापेक्षा आपली FD बरी.."

किंवा

"फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा म्युच्युअल फंड कितीतरी जास्त रिटर्न्स देतात"

ह्या दोन्ही वाक्यात जी तुलना केलेली आहे ती सचिन श्रेष्ठ की विराट श्रेष्ठ या तुलनेइतकीच अस्थानी किंवा वायफळ आहे! हे दोघेही क्रिकेट खेळतात ह्या पलीकडे त्यांच्यात काहीही संबंध नाही! तसंच म्युच्युअल फंड आणि FD हे दोन्ही गुंतवणूकीचे मार्ग आहेत. यापलीकडे त्यांच्यात तुलना करण्याचं काहीच कारण नाही.

गुंतवणूक, परतावा या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेली गुंतवणूकदाराची मानसिकता सगळ्यात महत्वाची आहे.

FD सारख्या सुरक्षित प्रकारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी त्यात मिळणारा कमीजास्त परतावा हा मनापासून स्वीकारलेला असतो. त्यांच्या गरजा त्यांनी त्याप्रमाणेच सेट केलेल्या असतात. आणि प्रसंगी तडजोड करण्याची त्यांची तयारी असते. अश्या लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला लावणे मला व्यक्तिशः पटत नाही. एकदा FD केल्यावर ती मॅच्युअर होण्याच्या दिवशीच बँकेत पाऊल ठेवणारे लोकं, म्युच्युअल फंडात होणारे रोजचे बदल बऱ्याचदा पचवू शकत नाही. ह्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होऊ शकतो. आपली तब्येत हे सर्वात मोठं ऍसेट आहे. त्यातली गुंतवणूक काढून घेऊ नये!

याउलट, ज्या लोकांना रिस्क घ्यायला हरकत नसते किंवा आवडते, त्यांनी FD या प्रकाराकडे जाऊ नये. कारण पैसा पाच वर्ष नुसताच पडला आहे ही धारणाच त्यांना अस्वस्थ करते. या लोकांना पैश्यात रोज होणारा बदल, त्याचे कारण, त्यावर चर्चा आणि सरतेशेवटी मिळालेला चांगला परतावा ह्यात जबरदस्त इंटरेस्ट असतो. अश्या लोकांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी.

आपली प्रकृती ओळखून गुंतवणूक करावी. किंवा आपली प्रकृती ओळखता येत नसल्यास, गुंतवणूकीची प्रकृती ओळखून आपल्याला रिलेटेबल असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करावी.

तूर्तास एवढंच...

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी संपर्क करा..

7350948300
GrowNICK Investments

22/02/2023





SBI या भारतातल्या सगळ्यात मोठ्या म्युच्युअल फंड कंपनीने SBI Dividend Yield Fund हा NFO लॉन्च केला आहे. हा फंड मार्केटमधल्या चांगला डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या ओळखून त्यामध्ये गुंतवणूक करणार आहे.

याआधी इतर कंपन्याच्या Dividend Yield फंड्सनी गेल्या तीन वर्षात साधारण 17-20 टक्के परतावा दिला आहे. ICICI Dividend Yield फंडने सर्वाधिक 26 टक्के परतावा दिला आहे.

एक लक्षात घ्या, चांगला dividend देणाऱ्या बहुतांश कंपन्या या उत्तम कामगिरी करणाऱ्याच असतात. पण अर्थातच उत्तम कामगिरीसाठी तेवढाच एक क्रायटेरिया नसतो.

तीन ते पाच वर्ष हा कालावधी लक्षात घेता, Dividend Yield फंड हा एक diversified गुंतवणूकीचा पर्याय देणारा चांगला फंड आहे.

फंडचा NAV दहा रुपये आहे.
SIP, minimum 500 रुपयापासून सुरु करता येईल.
Lumpsum गुंतवणूक minimum 5000 रुपयापासून करता येईल.

गुंतवणूक सुरु करण्यासाठी संपर्क करा..

7350948300
GrowNICK Investments

19/02/2023

आज दुपारी 3 ते 4 या वेळात Basics of Mutual Fund या विषयावर ऑनलाईन सेशन घेणार आहे.

ईच्छुक लोकांनी खालील लिंक वापरून जॉईन व्हावे

To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/xoh-vmnz-ynw

Or open Meet and enter this code: xoh-vmnz-ynw

Address

Nagpur
440022

Telephone

+917350948300

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grownick Investments posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Grownick Investments:

Share