Sunjoy Shinde Investment Advisor

Sunjoy Shinde Investment Advisor Follow me for child education planning , retirement planning, to set your financial goals also guide for health insurance. I am helping people since
20 years

27/07/2019

*''बदलना', तय है हर चीज़ का इस संसार में...*

*बस थोड़ा इंतजार करो*
*किसी का 'दिल' बदलेगा,*
*तो किसी के 'दिन' बदलेंगे ..*

26/07/2019
25/07/2019

🇮🇳 *आयुर्विम्याची ✋🏻 पंचसुत्रे*🇮🇳(Insurance)

१. *आयुर्विमा कशासाठी* ❓
२. *आयुर्विमा कोणासाठी*❓
३. *आयुर्विमा किती*❓
४. *आयुर्विमा कधी*❓
५. *आयुर्विमा विकत घेण्याची शास्त्रीय कारणे*❓

१. *आयुर्विमा कशासाठी ❓*
👉🏻 _आयुर्विमा हा एक "नुकसानभरपाई" चा करार असतो... "कशाची नुकसानभरपाई "? तर "भविष्यातील उत्पन्नाची नुकसानभरपाई". . विम्याच्या शास्त्रात उत्पन्नाचे दोन भाग पाडले आहेत. "पहिला म्हणजे मिळालेले उत्पन्न व दुसरा म्हणजे भविष्यातले उत्पन्न"... माणूस गरीब असो वा श्रीमंत, आपल्या मौल्यवान वस्तूचे नुकसान होणे त्याला मान्य नसते. आणि त्याची जर नुकसानभरपाई जर मिळत असेल तर त्याला हवीच असते. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात भविष्यातले उत्पन्न हे सर्वात मौल्यवान आहे..._

ज्याला आपण ‘मूल्य’ मानतो...
*उदा.*- _आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, नातेसंबंध, विकास, ती सर्व "मूल्ये" जगण्याचे, जपण्याचे, वाढवण्याचे एक महत्वाचे साधन आपले उत्पन्न होय. माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला आपल्या संपत्तीची व उत्पन्नाची निरंतरता अथवा सातत्य (Perpetuality) हवे असते. आणि उत्पन्न हे प्रत्येकासाठीच मौल्यावान आहे. अशा भविष्यातल्या उत्पन्नाचे नुकसान अकाली मृत्यूमुळे होते आणि त्याची नुकसानभरपाई मिळण्याचे एकमेव साधन म्हणजे आयुर्विमा...._

त्यामुळेच म्हटले जाते *“आयुर्विम्याला पर्याय नाही”*...🙏🏻

२. *आयुर्विमा कोणासाठी❓*
👉🏻 _आपण पाहिलं की आयुर्विम्याद्वारा आपल्या भविष्यातल्या उत्पन्नाच्या नुकसान भरपाई ची व्यवस्था केली जाते. प्रत्येकजण आपल्या उत्पन्नाचा "जास्तीतजास्त भाग आपल्या कुटुंबासाठीच खर्च करत असतो" व "कमीत कमी भाग स्वताच्या जगण्यासाठी/ पालनपोषण यासाठी वापरत असतो".... साहजिकच उत्पन्नाचे नुकसान म्हणजे कुटुंबियाच्या चरितार्थाचे व भविष्याचे नुकसान ठरते... म्हणून *आयुर्विम्याचा खराखुरा व अंतिम हेतू* हा "तुमच्या कुटुंबियांचे भविष्य व चरितार्थ सु-रक्षित करणे हाच आहे"...._

३. *आयुर्विमा किती❓*
👉🏻 _*एकदा हे स्पष्ट झाले की आयुर्विमा का ? आणि कोणासाठी ?* की त्यानंतर हे ठरवणे सोपे होते की तो *किती घ्यायचा?*.._
_आयुर्विम्याचे शास्त्र असे सांगते की कर्त्या माणसाच्या आयुष्यभराच्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या – जसे की, *"दर महिन्याचा घरखर्च, मुलांची पूर्ण शिक्षणं, व्यावसायिक पदार्पण, लग्न वगैरे चा खर्च, तसेच इतर आर्थिक देणी जसे व्यवसाय कर्ज, घर कर्ज, कार कर्ज," वगैरे,* --- ह्या सर्वांच्या एकत्रित बेरजेइतका असायला 👍🏻 हवा... कारण हे सर्व खर्च आपल्या भविष्यातल्या उत्पन्नातूनच पार पडणार असतात.... आयुर्विमायचा अशा शास्त्रीय पद्धतीने विचार केलेला आपल्या कुटुंबियांसाठी अत्यावश्यक ठरतो...._

४. *आयुर्विमा कधी घ्यायचा❓*
👉🏻 _*आयुर्विमा का घ्यायचा, कोणासाठी, व किती घ्यायचा याची उत्तरे मिळाल्यावर साहजिकच पुढचा प्रश्न उपस्थित होतो की कधी घ्यायचा ?*_
_याचे उत्तर मिळण्यासाठी वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे ठरते... वस्तुस्थिती ही आहे की आपल्या "प्रत्येकाला आपली स्वताची जन्मतारीख माहित आहे, परंतू म्रुत्यु तारीख माहित नाही "! ! ! *कटू सत्य हे आहे की प्रत्येकाचा मृत्युं केव्हा ना केव्हा तरी निश्चित आहे*, परंतु वेळ मात्र निश्चित नाही.... कोणालाही त्याचा म्रुत्यु, आधी कल्पना देवून, पूर्वसूचना देवून, पूर्व परवानगीने, असा येत नाही. इतर सर्व अडचणी, वेळ आल्यावर काही ना काही उपाय करून सोडवता येतात परंतु कर्त्याच्या अकाली मृत्यूमुळे होणारी कुटुंबियांची कायमस्वरूपी अडचण वेळ आल्यावर सोडवता येत नाही त्यामुळे *"आयुर्विमा कधी घ्यायचा याचे उत्तर एकाच आहे ते म्हणजे "जिवंत असताना"*..._

५. *_जागतिक 🌍स्तरावर आयुर्विमा घेण्याची ६ शास्त्रीय करणे आहेत..._* 👇🏻👇🏻
1. _Economic LIfe Value...._
2. _Life Cycle Capital Needs...._
3. _Mortgage Cancellation...._
4. _Corporate Insurance..._
5. _Wealth Protection Management..._
6. _Ensuring Noble Motives and CSRs..._

*_सर्वसाधारण व्यक्तींसाठी आयुर्विमा घेण्याचे निकष खालीलप्रमाणे असतात..._*👇🏻👇🏻
_आपल्या माघारी खालीपैकी कोणकोणत्या *कौटुंबिक गरजा पूर्ण व्हायलाच हव्यात* असे आपल्याला वाटते ?_

अ. _सरासरी *वार्षिक घरखर्च*...._
ब. _मुलांच्या उच्चशिक्षणाचा ( *Graduation / Post Graduation* ) खर्च..._
क. _मुलांच्या व्यावसायिक पदार्पणाचा खर्च...._
ड. _तुमच्या जोडीदाराची ( *पती / पत्नी* ) व तुमची म्हातारपणाची तरतूद..._
इ. _*“उर्वरित कर्ज”* परतफेड करण्याची तरतूद..._

*_"विमा व आर्थिक सलाहगार"..._*
*संजय शिंदे****
9702211221
7304633668

*माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारण असते " एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असत आणि दुसरं म्हणजे ...
22/07/2019

*माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारण असते " एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असत आणि दुसरं म्हणजे ते वेळच्या आधी हवं असतं "!!*

🌹🌹🌹🌹🌹🌹

Follow me for child education planning , retirement planning, to set your financial goals also guide for health insurance. I am helping people since
20 years

Address

1 F, 1712 Swapnaporti. S, New Hind Mill Mhada, Ghodpdev, Near Cotton Green Station Mumbai
Mumbai
400033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunjoy Shinde Investment Advisor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category