22/04/2026
खालील फोटो आहेत,विक्रमगड तालुक्यातील आपल्या अभ्यासिकेचे. सर्वमिळून आपण 70 ठिकाणी अभ्यासिका चालवितो. प्रत्येक ठिकाणी रोज अभ्यासिका घेणारी एक कार्यकर्ती आहेच. शिवाय तीन पर्यवेक्षक आपण नेमले आहेत. बालशिक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य त्यांना पुरविण्यात आले आहे. त्या माध्यमातून त्यांचा शैक्षणिक स्तर वाढविण्याचा आपला प्रयत्न आहे.
शासनानेही सर्व साहित्य अगदी बालवाडीपासून पुरविलेले आहे. पण फक्त पगारासाठी शिक्षकाचे काम करणारे पगारदार नोकर व दुर्गम भागातील पालकांची कमालीची उदासीनता यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे हे मात्र खरे. या दोन्ही बाबतीत आपण काहीच करु शकत नाही. आपण जेथे काम करतो त्या गावात प्रामाणिकपणे ,सर्वंकष कार्य करणे हेच आपल्या हाती आहे.
आपल्या प्रत्येक कार्यक्रमातून हा विद्यार्थी आपल्या देशाचे भवितव्य घडविणारे नागरिक व्हावे असाच आपला प्रयत्न असतो.
शबरी सेवा समिती.