20/08/2022
रतन टाटा यांनी GoodFellows नावाच्या ॲपला आर्थिक पाठिंबा जाहीर केला ही न्यूज तुम्ही नक्कीच पहिली असेल. जी म्हातारी लोक एकटे राहतात त्यांना मदतीची गरज असते. त्यांच्यासाठी या ॲप ची निर्मिती करण्यात आली आहे.
जगात सध्या एकटे राहणे हे खूप गंभीर मुद्दा म्हणून समोर येत आहे. स्वीडन मध्ये जवळपास ५०% च्या वर तर जर्मनी आणि फिनलंड मध्ये हे प्रमाण जवळपास ४०% आणि अमेरिकेत १/३ म्हणजे जवळपास ३०% म्हातारी लोक घरात एकटी राहतात (माहिती - हील.कॉम) प्रगत देशात सर्वात जास्त लोक एकटे पणानी जगतात.
सध्या भारतात घरात एकटे राहणारी लोक ही लोकसंखेच्या ५% एवढी आहेत. इथून १०-२० वर्षांनी तुम्हाला काय वाटतं तुमच्या म्हातारपणी तुमच्या बरोबर तुमची पुढची पिढी रहात असेल?
मुलांचे शिक्षण आणि लग्न यात संपूर्ण संपत्ती वाया घालवू नका कारण पुढची पिढी ही प्रॅक्टिकल आहे. आपलं भक्कम रिटायरमेंट प्लानिंग करा. तुमच्या रिटारमेंट मध्ये तुमच्याकडे बक्कळ पैसे असतील तर सगळे तुमच्याशी Good fellows म्हणून राहतील नाहीतर ॲप आजच डाऊलोड करून ठेवा. 😄
- जय पालशेतकर ☺️🙏
पालशेतकरस् फिन्यांसियल सोलूशन
www.Palshetkarsfs.com
(Image - Internet)