21/02/2016
आपल्या कुटुंबाचा संकटांपासून, जोखमींपासून बचाव करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची माणसाची सहजप्रवृत्ती असते. जेव्हा समोर धोके असतात तेव्हा आपण हे नैसर्गिकरित्या करून मोकळे होतो; मात्र कुटुंबातील कमावत्या सदस्याचे अचानक निधन झाले तर आपल्या कुटुंबाला ज्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल त्यापासून आपल्या जिवलगांचे संरक्षण कसे करायचे याचा विचार मात्र आपण फारच कमी वेळा करतो.
'मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना पुरेसे आर्थिक संरक्षण दिले आहे का?', असा प्रश्न आपसूकच येतो.
समजा आपण तरुण आणि अविवाहित असू आणि आपल्यावर आपले पालक अवलंबून असतील किंवा आपण मुले असलेले विवाहित व्यक्ती असू तेव्हा आपल्यावर काही निश्चित अशा आíथक जबाबदाऱ्या असतातच. यामध्ये कुटुंबाच्या गरजा भागवणे, मासिक हप्ता भरणे, भविष्यातील स्वप्नांतील घरासाठी नियोजन करणे, मुलांच्या उच्च शिक्षणाची तजवीज करणे, लग्न आदींचा समावेश असतो.
आपल्यापकी प्रत्येकजण या उद्दिष्टांसाठी बचत करत असतो.
मात्र, कुटुंबातील कमावती व्यक्तीच जर निधन पावली तर हे सगळे नियोजन विस्कटून जाते. याच कारणासाठी प्रत्येक माणूस संरक्षित असणे गरजेचे आहे. 'इन्शुरन्स' हा कुटुंबाला आर्थिक संरक्षण पुरवण्याचा असाच एक किफायतशीर मार्ग आहे.
आपल्याला आपली किती किंमत आहे ती माहित करून घेण्याची गरज आहे.
उदा.
समजा अ या व्यक्तीचे आताचे वय ३० वर्षे आहे आणि एका महिन्याचे उत्पन्न / पगार ₹ १०,०००/- एका वर्षाचे झाले ₹१,२०,०००/-.
अ हि व्यक्ती अजून वयाच्या ६० वर्षापर्यंत काम करणार आहे, म्हणजे अजून ३० वर्षे. या उरलेल्या ३० वर्षात ₹ ३६,००,०००/- (₹ १,२०,००० x ३०) घरी आणणार आहे. म्हणजेच अ या व्यक्तीची आजची किंमत ₹ ३६,००,०००/- आहे.
बहुतेक लोक बोलतात कि त्यांची पॉलिसी आहे पण ती किती रकमेची आहे तर ते त्याना माहित नसते, बरेचदा ती पॉलिसी एक लाख, दोन लाख अशीच असते.
तेव्हा वरील उदा. वरून तुम्ही तुमची आजची किंमत किती ते काढू शकता.
आपणास माझी अशी विनंती आहे कि आपली किंमत आपण ओळखून योग्य ते विमा संरक्षण घ्यावे.9