MIDC Consultant

MIDC Consultant Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MIDC Consultant, Insurance Agent, Mumbai.

म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ प्रोबेस कंपनीतील स्फोटाच्या भयावह घटनेनंतर जिल्ह्यातील इतर एमआयडीसी क्षेत्रातील रहिवासी संकुला...
01/06/2016

म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ

प्रोबेस कंपनीतील स्फोटाच्या भयावह घटनेनंतर जिल्ह्यातील इतर एमआयडीसी क्षेत्रातील रहिवासी संकुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक प्रकर्षाने समोर आला आहे. नियमांकडे पाठ फ‌रिवून अंबरनाथ-बदलापूरमध्ये वेगाने एमआयडीसी परिसरात रहिवासी संकुलांचे मजले उभे राहत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणांच्या समन्वयाचा अभाव आणि निष्काळजीचा फटका भविष्यात या दोन्ही शहरांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नेहमी एखाद्या मोठ्या घटनेनंतर किंवा निर्दोष नागरिकांचा बळी गेल्यानंतरच जागे होण्याची प्रशासन आणि सरकारची सवय असल्याने डोंबिवली येथील प्रोबेस कंपनीच्या घटनेनंतर एमआयडीसी परिसरातील जिल्ह्यातील इतर रहिवासी संकुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील विविध शहरांत असलेल्या एमआयडीसीतील घातक केमिकलचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असला, तसेच एखादी घटना घडल्यावर कारवाईचा कांगावा केला जात असला तरी एका मर्यादित वेळेपुरता त्याचा पाठपुरावा केला जातो. मात्र कायमस्वरुपी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुठलीही ठोस उपाययोजना राबवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
Maharashtra Times: एमआयडीसीतील विकासकामांना धोका कायम
http://mtonline.in/U-9RAY/dga via : http://app.mtmobile.in

प्रोबेस कंपनीतील स्फोटाच्या भयावह घटनेनंतर जिल्ह्यातील इतर एमआयडीसी क्षेत्रातील रहिवासी संकुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक प्रकर्षाने समोर आला आहे. नियमांकडे पाठ फ‌रिवून अंबरनाथ-बदलापूरमध्ये वेगाने एमआयडीसी परिसरात रहिवासी संकुलांचे मजले उभे राहत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणांच्या समन्वयाचा अभाव आणि…

उद्योजकांना पर्वणी! आवश्य भेट द्या! http://www.makeinindia.com/mumbai-week
03/02/2016

उद्योजकांना पर्वणी! आवश्य भेट द्या!
http://www.makeinindia.com/mumbai-week

Showcasing the potential of design, innovation and sustainability across India's manufacturing sectors in the coming decade. A week that will spark a renewed sense of pride in India's manufacturing – and take corporate and public participation to the next level.

देशातील उद्योजकांकडे दुर्लक्षदिनांक: भारतीय सौर ५ आश्विन शके १९३७, २७ सप्टेंबर, २०१५"पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मेक इन इंडि...
27/09/2015

देशातील उद्योजकांकडे दुर्लक्ष

दिनांक: भारतीय सौर ५ आश्विन शके १९३७,
२७ सप्टेंबर, २०१५

"पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मेक इन इंडिया'च्या नावाने जगभरातील उद्योजकांना आकर्षित करीत असताना देशातील उद्योगांकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या दिड वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी देशातील उद्योजकांना काय दिले, असा परखड सवाल उद्योगपती राहूल बजाज यांनी शनिवारी नागपूर येथे केला."
(मटा बातमी, २७.९.१५)

फक्त पंतप्रधानच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना सुद्धा माझा हाच सवाल आहे.
हे दोघेही 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' घालत आहेत. भारतीय कंपन्यांना तर सोडाच पण भारतातीलच परदेशी कंपन्यांना सुद्धा उद्योग विस्तारासाठी हे जागा देऊ शकत नाहीत. मग आणखी परदेशी कंपन्यांना का हे उरावर बसवत आहेत. त्या परदेशी कंपन्या काय वेड्या आहेत भारतात यायला. त्यांना माहिती नसेल का की जागेचीे इथे किती मारामार आहे?

मुंब‍ई महानगर प्रदेशातील एमआयडीसीच्या एकाही म्हणजे मरोळ, ठाणे, नवीमुंब‍ई, तळोजा, तारापूर, पातळगंगा, डोंबिवली, कल्याण-भिवंडी, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ, बदलापुर या औद्योगिक क्षेत्रात जागा शिल्लक नाही. पुढेही होऊ शकत नाही. कारण शेतकरी जागाच देत नाहीत. अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रासाठी १२०० एकर जागा घेण्याचे एमआयडीसीने ठरवले होते. पाटबंधारे विभागाने काही विरोध केला. काही शेतकर्‍यांनी. जागा ताब्यात आली फक्त दोनशे एकर. त्यातही काही शेतकऱ्यांनी पैसे घेतले आणि जमिनी ताब्यात दिल्या तर काहींनी पैसेही घेतले नाहीत आणि जमीनी सुद्धा अडकवून ठेवल्या. ताब्यात आलेल्या जमिनी पैकी १००-१२५ एकरचे वरिष्ठ पातळीवर वाटप झाले. परंतु अर्धे पैसे भरुन उद्योजक अडकले. दोन वर्षे होत आली तरीही जमीनी उद्योजकांच्या ताब्यात नाही आल्या. शेतकरी विरोध करत आहेत. जागेवर उभे सुद्धा राहू देत नाहीत उद्योजकांना.

हीच परिस्थिती पुणे विभागातील पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजणगाव या औ. क्षेत्रांची आहे. नासिक विभागात सुद्धा तसेच.

वरील कोणत्याही विभागातील औद्योगिक क्षेत्रासाठी अर्जच स्विकारले जात नाहीत. कारण जागाच नाही. देणार कुठून?

मागच्या पाच वर्षांपासून अतिरिक्त अंबरनाथ क्षेत्रासाठी पाचेक हजार लोकांनी अर्ज केले, परंतु जागा शिल्लक नाही असे सांगून त्यांच्या अर्जांना केराची टोपली दाखवली गेली. एमआयडीसीकडे १५० एकर जमीन ताब्यात आली होती. ती लगेच वाटप झाली. आजही लोकांना जागा हवी आहे. पण जागा नाही.

पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रात कित्येक परदेशी कंपन्यांना त्यांचा जुना उद्योग वाढवण्यासाठी जागेची आवश्यकता आहे, परंतु देता येत नाही कारण जागेची कमतरता. आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु तेथे ७ हजार अर्ज प्रलंबित आहेत. यात देशी तसेच परदेशी अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्या आहेत.

एकवेळ पंतप्रधानांचे मी समजू शकतो की ते इतर राज्यांसाठी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत असतील. त्यांच्या गुजरातमध्येच करोडो एकर जमीन देता येईल. परंतु उद्योगकांना महाराष्ट्रात जागा हवी आहे, असे नसते तर आनंदीबेन पटेल यांना महाराष्ट्रात येऊन उद्योजकांकडे झोळी पसरावी लागली नसती. "आम्ही मुंबई अहमदाबाद बुलेटट्रेन आणत आहोत. उद्योग गुजरात मध्ये काढा आणि बुलेटट्रेनने मुंबईला झोपायला या कारण मुंबई स्वप्ननगरी आहे. इथे स्वप्न पहा आणि गुजरातला प्रत्यक्षात आणा" अशी मखलाशी सुद्धा करावी लागली नसती.
पंतप्रधान आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे आपण समजू शकतो, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणाला फसवत आहेत? कुठे जागा देणार आहेत? त्यांना वाटत असेल की ज्या उद्योजकांनी जागा घेऊन वर्षोनवर्षे त्यांचा वापर केला नाही त्या परत घेऊन त्या देऊ तर ते कोणत्या तरी नंदनवनात वावरत आहेत असे खेदाने म्हणावे लागते. कारण कोणीही उद्योजक अशा जमीनी ताब्यात देणार नाही. कोर्टात जाईल. निकाल जेव्हा लागेल तेव्हा सत्ताधाऱ्यांचाच निकाल लागलेला असेल.
महाराष्ट्रातील जागेची उपलब्धता याबद्दल माझे जर काही खोटे वाटत असेलतर कृपया www.midcindia.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करुन पाहावा. सद्यस्थिती आपल्या लक्षात येईल. हातच्या कंकणाला आरसा कशाला?

रामदास पवार
-अंबरनाथ

MT: उद्योजकांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Ignore-the-Prime-Minister-of-the-country-industrialists/articleshow/49121462.cms?utm_source=MT&utm_medium=copyclip&utm_campaign=onpagesharing via

   Maharashtra is a leader in twenty out of twenty six sectors in the country and possess a colossal potential for development in varied sectors due to the wide spread of vital resources across different regions in the state. As a result the state houses several investment regions.

'एमआयडीसीत १५ दिवसांत जमीन'दिनांक: ८ नोव्हेंबर, २०१४ आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये अशी बातमी आली आहे की,'एमआयडीसीत १५ दि...
08/11/2014

'एमआयडीसीत १५ दिवसांत जमीन'
दिनांक: ८ नोव्हेंबर, २०१४

आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये अशी बातमी आली आहे की,
'एमआयडीसीत १५ दिवसांत जमीन' देणार!
नवे उद्योगमंत्री माननीय प्रकाश मेहता यांनी सांगितले आहे की उद्योजकांना आता जास्त वाट पहावी लागणार नाही आणि भूखंड वाटपाची प्रक्रिया आता गतिमान होईल.
कॉंग्रेसचे लोक कधीकधी बरोबर बोलतात असे वाटते. ते म्हणतात भाजप सरकार आमच्याच योजना पुढे नेत आहेत.

आता ह्याच बाबतीत बघा. १५ दिवसांत भूखंड देणे हा नियम १५ वर्षांपासून महाराष्ट्रात आहे. परंतु हा नियम तंतोतंत कधीही अंमलात आलेला नाही. तीन वर्षांपूर्वी एमआयडीसीच्या अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात भुखंडा साठी ५०० च्या जवळपास अर्ज होते. ते MIDC ने जागा नाही म्हणून दोन वर्षांपूर्वी नाकारले. म्हणजे त्यांना दीडदोन वर्षांनी नकार कळवले.
लोकांनी पुन्हा अर्ज केले. मोठ्या कंपन्यांना जागा दिल्या. बाकीचे तसेच लटकले.
आताची स्थिती अशी आहे की मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजे पूर्ण ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पुणे जिल्हा या सर्व जिल्ह्यात कुठेही जागा शिल्लक नाही.
मग कुठून जागा देणार आहेत मंत्रिसाहेब?
त्यांनाच माहीत!

बातमीची लिंक:

एमआयडीसीत १५ दिवसांत जमीन http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/MIDC/articleshow/45077200.cms

राज्यातील उद्योग उभारणीची प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शी बनवण्यात येत असल्याचा दावा करीत, ‘एमआयडीसी’त भूखंड मिळवण्यासाठी उद्योजकांना वाट पाहण्याची गरज नसून १५ दिवसांत जमीन वाटप केले जाईल, अशी घोषणा नवनियुक्त उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी केली.

This is an Era of Information and Technology. Get every information of India and Governments
12/10/2011

This is an Era of Information and Technology. Get every information of India and Governments

Union Government State Government Legislature Judiciary International

If you want to apply for any thing to MIDC go to SINGLE  WINDOW CLEARANCE.
09/10/2011

If you want to apply for any thing to MIDC go to SINGLE WINDOW CLEARANCE.

Tender for Providing Canteen Service. | Supply of Fire Safety Uniforms for the fire service personnel | MahaSME - Get Connected To The Global Business Markets

09/10/2011

My first Sharing is website of MIDC. Now and onwards it is necessary to apply for a plot on line. Existing Plot Holders also have to register their plot on the website and for any further applications, transfers, NOC's, Mortgage Consent, Approval of Plans, Obtaining Building Completion Certificate and many more.....

Address

Mumbai
421501

Telephone

09324513983

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MIDC Consultant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MIDC Consultant:

Share