28/02/2025
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत.. व स्पुर्तीस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयआयटी मुंबई क्रेडिट सोसायटीच्या वतीने महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम शासकीय तिथीप्रमाणे बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी संस्थेच्या कार्यालयात दुपारी १२ वाजता करण्यात आला.
ह्यावेळी संस्थेचे माननीय सभासद श्री. पांडुरंग प्रभावळे आणी श्री. सुनील घुमगावकर ह्यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
तसेच माननीय सभासद श्री. सुभाष पवार आणी श्री. सागर सिन्नरकर ह्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणी सर्व संचालकांनी फुले आणी पुष्पहार अर्पण केला.