MKS Realty

MKS Realty Real Estate Investment Consultation Firm

08/03/2023

तुम्ही 1995 ते 2000 मधली बोरिवली पाहिली आहे का? मुलं शाळेच्या पिकनिक साठी यायचे गोरेगाव आणि बोरिवली मध्ये.

2005 मधलं मिरा रोड - पाहिलं आहे का? कशासाठी ओळख होती सांगायला नको - पण आठवतंय का?

2010 मधलं विरार - अगदी 2014, 15 पर्यंत विरार मध्ये राहण्याची हिम्मत होत नव्हती बऱ्याच जणांची. विरार मधल्या पिकनिक आता कुठे कमी झाल्या - कारण आता विरार ची लोकसंख्या येवढी जास्त आहे की त्यांच्याच शनिवार रविवारच्या पिकनिकची जागा माणसांनी गच्च भरलेली असते.

ज्याला आपण जंगल म्हणत, आपल्याला काहीतरी कळत असं म्हणत मोठमोठ्या बाता मारल्या - त्या कवडीमोलाने मिळत असलेल्या प्रॉपर्टी आज आपली पिढी खरेदी करू शकत नाहीये. पुढच्या पिढीसाठी हे अजून कठीण होत जाणार.

मागची 7-8 वर्ष प्रॉपर्टी च्या किमती वाढल्या नाहीत - 2012 पर्यंत पसा भरून वाहणारी रिअल इस्टेट अचानक बंद पडलेल्या इंजिनासारखी झाली.

पण, ज्यांनी लाँग टर्म चां विचार करून घर खरेदी केलं, ते सगळे खुश आहेत - घर हे पुढच्या पिढीसाठी करण्याची गुंतवणूक आहे - जसं आपले आजी आजोबांनी झाडं लावली अगदी तसच.

एकतर Long Term किंवा Flip - तिसरा कोणताही पर्याय फायदेशीर नसतो. भ्रमात जगणाऱ्या बऱ्याच मंडळींशी मागच्या काही महिन्यात बोलणं झालं - ज्या वस्तूची किंमत एक करोड आहे, ती 25, 30, 35 लाखात कशी आणि का मिळेल?

बँक ऑक्शन मध्ये 15 ते 20% पर्यंत किंमत कमी होते - त्यापेक्षा जास्त ची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

बोईसर म्हणजे 10 वर्षापूर्वीच मिरा रोड - आज काहीही interesting दिसत नाही
- आज सगळीकडे फक्त कन्स्ट्रक्शन दिसत

पण ठाणे, मिरा रोड, विरार आणि "बोईसर, पालघर" मध्ये एक fundamental फरक आहे - जो आज डोळ्यांनी दिसणं शक्य नाही.

तो फरक म्हणजे, इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट - आज बोईसर मध्ये एक लाख लोक रोज नोकरीसाठी येतात.

त्यांना घर हवंच ना?

बुलेट ट्रेन च्या बाबतीत आपलं राजकीय मत काहीही असेल - हो, मराठी माणसाची बोलताना राजकीय मत इतर कोणत्याही विषयापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं - हे दुर्दैवी असलं तरी खरं आहे.

असो, आपल्याला बुलेट ट्रेन हवी असली किंवा नको असली - तरी, ती तर येणार आणि सोबत व्यवसायाच्या, उद्योगाच्या मोठमोठ्या संधी बोईसर, पालघर, उमरोली या भागात घेऊन येणार.

अहमदाबाद, सुरत, वापी, उमरगाव नंतर बोईसर - काहीतरी लपलेलं दिसतंय का ह्या वाक्यात - Read Between the lines.

तुमचं हक्काचं घर घेताना चार पैसे वाचले तर चांगलंच आहे ना?गंमत अशी आहे की,   मध्ये चार पैसे नाही काही लाख वाचतात.आता बदला...
10/02/2023

तुमचं हक्काचं घर घेताना चार पैसे वाचले तर चांगलंच आहे ना?

गंमत अशी आहे की, मध्ये चार पैसे नाही काही लाख वाचतात.

आता बदलापूरचं उदाहरण घेतलं तर तिथे 1RK 16 ते 18 लाखात मिळतो आणि 1BHK फ्लॅट 21 ते 28 लाख पर्यंत किंमत आहे.

स्टॅम्प ड्युटी, सोसायटी, GST आणि इतर खर्च आहेतच.

तेच फ्लॅट आपल्याला बँक कडून 1RK फक्त 11 ते 12 लाख आणि 1BHK फ्लॅट 15 ते 17 लाख या किमतीत मिळू शकतात.

कोणताही फ्लॅट कुठेही घेतलात तरी पैशाची मोठी बचत होईल हे नक्की.

एक काम हमखास करू शकता, ते म्हणजे कुठेही घर घेण्याआधी एकदा आमच्याशी संपर्क साधा.

संपर्क क्रमांक: 9321568984

10/02/2023

WELCOME to the World of Profitable Property Flipping.

We are specialist Real Estate Investment Consultation Firm.

Address

F 68, Sai Krupa Mall, Dahisar Station West
Mumbai
400068

Alerts

Be the first to know and let us send you an email when MKS Realty posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MKS Realty:

Share