Affluent Capital

Affluent Capital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Affluent Capital, Investing Service, Hill Road, Bandra West, Mumbai.

मी माझ्या telegram चॅनलवर सांगितलेल्या stocks चा या  महिन्याचा performance. या महिन्यात मार्केट प्रचंड volatile होतं आणि...
24/08/2024

मी माझ्या telegram चॅनलवर सांगितलेल्या stocks चा या महिन्याचा performance. या महिन्यात मार्केट प्रचंड volatile होतं आणि जोरदार correct झालं , त्यामूळे त्या काळात घेतलेले stocks चालले नाहीत. या महिन्यात 21 stocks सांगितले त्यात 8 मध्ये loss आणि 13 मध्ये प्रॉफिट आहे. Win ratio आहे 62% आणि सगळ्यात जास्त profit 55% च आहे. सगळ्या stocks चा प्रॉफिट आणि loss काढला तर प्रत्येक trade मध्ये average 7% profit आहे.ज्यात जास्त लॉस आहे ते longterm चे shares आहेत जे केंव्हा ना केंव्हा प्रॉफिट देऊनच जातील. (लिंक कमेंटमध्ये )

"Wishing you a prosperous Diwali filled with wealth and success! May your investments shine bright like the festival of ...
12/11/2023

"Wishing you a prosperous Diwali filled with wealth and success! May your investments shine bright like the festival of lights. "

30/07/2023

सगळ्यांनी ITR file केला असेल, कुठून कुठून tax वाचवता येतो का बघत असाल. तर तुमच्यासाठी tax saving चा सगळ्यात best option सांगतो.
सामान्यपणे आपण tax saving साठी पॉलिसी घेणं, Ppf, government security bonds/certificates FD वैगेरे करतो. पण यात जे returns मिळतात ते average 5-7% पर्यंतच मिळतात. यात risk बिलकुल नाही पण हे returns कधीच inflation beat नाही करू शकत.कारण दरवर्षी 7% returns मिळाले तरी महागाई 8-10% वाढतेय , म्हणजे tax वाचवायचा म्हणून यात टाकले तरीही inflation ते खाऊन टाकतं . वरून या schemes मध्ये lockin period किमान 5 वर्ष ते रिटायरमेंट पर्यंत असतो. म्हणजे एखाद्यावेळी अचानक गरज पडली तर पैसे काढणं अवघड.
मग यासाठी best option म्हणजे ELSS tax saving funds . यात average काढलं तर किमान 15% CAGR returns मिळतात वरून 80C under 1.5 लाखांची tax savings करता येते. ( आधी LTCG tax नव्हता, पण 2022 पासून सरकारने यावरही 10% LTCG लावलाय) . याचा lockin period पण 3 वर्षांचा आहे .
यात तुम्ही lumpsum पैसे टाकू शकता किंवा even SIP करू शकता. ( मी स्वतः lumpsum करतो) . यात invest करायची best स्ट्रॅटेजि म्हणजे दरवर्षी एका same महिन्यात 1.5 लाख रुपये वेगवेगळ्या 4-5 फंडात टाकायचे( diversified risk) म्हणजे त्या वर्षीपासून पुढचे 3 वर्ष ते lockin राहतात. अस फक्त सलग 3 वर्ष करायच . मग तिसऱ्या वर्षी पुन्हा पहिल्या वर्षी टाकलेले वापस काढायचे आणि reinvest करायचे. जर 15% ने returns मिळाले प्रत्येक वर्षी तर 5 वर्षात आपला पैसा दुप्पट होतो आणि tax पण वाचतो. SIP मध्ये करण्यात फक्त एक problem आहे म्हन्जे lockin period वाढतो , पण मार्केटचं knowledge नसेल तर SIP करणं चांगलं. यातही टाकताना कधीही growth funds निवडायचे म्हणजे compounding चा फायदा मिळतो . check first comment .

01/03/2023

लोक trading मध्ये पैसे का गमावतात ?
तर याच उत्तर खूप साधं आहे, तुम्ही कोणताही trade घेता तेंव्हा त्याची probability हि फक्त 50% असते. मग तुम्ही कोणतीही स्ट्रॅटेजि वापरा किंवा कोणतेही इंडिकेटर लावा. कारण शेवटी मार्केटमध्ये काय चढउतार होईल ते सांगणं कोणालाही शक्य नाही.
पण मग खूप लोक आपण पाहतो जे ट्रेडिंगमधून उत्तम कमाई करतात. तर इथे मुख्य मुद्दा येतो psychology चा. जेंव्हा trade profitable जातो तेंव्हा मोठं profit काढायचं आणि जेंव्हा trade loss मध्ये जातो तेंव्हा कमीत कमी loss मध्ये त्यामधून बाहेर पडायचं. पण हे करणं प्रत्येकाला शक्य होत नाही कारण आपलं मानसशात्रच त्यापद्धतीने विकसित झालेलं असत, कि आपण मोठा loss carry करतो आणि छोट्या प्रॉफीटमधून बाहेर पडतो. त्यामुळे इथे काहीही स्ट्रॅटेजि वापरली तरीही losses होतात. आणि probability आपल्या against जाते.
पण जर आपण आधीच probability च्या सोबत असलो आणि तेही 65% पेक्षा जास्त म्हणजे लॉस होण्याचे चान्स 35% पेक्षा कमी आहेत, आणि आपण आपली risk आधीच manage केली तर आपल्याला loss होणारच नाही आणि आपण consistently मार्केटमधून पैसे कमावू शकू.
आता ह्या 65% पेक्षा जास्त probablity चे trade कसे घ्यायचे. तर याचं simple एकच उत्तर आहे, options writing .
जेंव्हा आपण ऑपशन्स buy करतो तेंव्हा त्यात profit होण्याची शक्यता फक्त 33% असते आणि जवळपास 90% ऑपशन्स expiry ला zero होतात. आणि जर आपण हे options विकले तर आपली 66% पेक्षा जास्त probablity आहे कि आपण profitable राहू.
पण options trading बाकीच्या तुलनेत थोडी किचकट आहे, कारण यात बाकीचे खूप factors विचारात घेऊन trade घ्यावा लागतो. पण जर तुम्हाला शिकण्याच्या उद्देशाने जर मी कोणते trade intraday आणि positional घेतो जाणून घायचे असेल तर मी खाली कमेंटमध्ये माझ्या telegram चॅनेलची लिंक देतो, तिथे जॉईन व्हा. तिथे मी regularly माझे trade update करेल.

15/02/2023

आपण कोण्या कंपनीचे stocks खरेदी करतो तेंव्हा आपण तितक्या हिश्श्याचे कंपनीचे मालक बनतो.तर अश्या काही कंपनी आहेत ज्या त्यांच्या मालकांना फक्त डिवीडेंटच देत नाहीत तर त्यांच्या products आणि services वर खूप मोठं discount पण देतात.
पाहुयात ह्या कोणत्या कंपनी आहेत आणि त्या त्यांच्या shareholders ना काय offer करतात :
1) TITAN
Titan आपल्या shareholders ना प्रत्येक वर्षी 10% ते 30% पर्यंत discount coupons देते.आणि याचा share सुद्धा दरवर्षी 25% CAGR ने वाढतोय. तर डबल धमाका 😅

2) Indian Hotels
हि पण टाटा ग्रुपची taj, vivanta हॉटेल chain चालवणारी कंपनी दरवर्षी आपल्या shareholders ना stay, dining, spa वरती 25% discount देते . जे तुम्ही जगातल्या कोण्याही TAJ hotel मध्ये avail करू शकता.आणि याचाही share दरवर्षी 19% CAGR ने वाढतोय.

3) Bata India :
दरवर्षी 15% CAGR ने वाढणाऱ्या share सोबतच 3% चा dividend आणि प्रत्येक वर्षी 20% चे discount coupn हा share देतो.

4) Relaxo :
भारतातली सगळ्यात मोठी footwear company असलेली relaxo 12% CAGR growth सोबतच 20% divided payout देते, आणि त्यांच्या shareholders ना products वरती 30% discount coupons देते.
5) Raymonds
Raymond’s त्यांच्या shareholders ना showroom मध्ये केलेल्या खरेदीवर 15% discount coupons
देते .

6) Trident
Luxary bedsheets, bath accessories बनवणारी Trident त्यांच्या stockholders ना sites वरती किंवा showrom च्या खरेदीवर 25% discount coupons offer करते.

या कंपनी सोडून अजून काही कंपनी आहेत जश्या apollo hospitls, bombay dyeing, Hawkins cooker पण त्या प्रत्येक वर्षी देत नाहीत.
हे discount coupons आपल्याला आपल्या dmat acc ला link असलेल्या email वरती दरवर्षी /periodically येतात.आणि यासाठी तुमच्याकडे त्या कंपनीचा एक share जरी असला तरीही या offers तुम्हाला मिळतील. आणि हे सगळे stocks fundamentally strong आणि जवळपास industry leading आहेत.
(Disclaimer: This is not investment advice)

13/02/2023

सगळ्यांनी shark tank बघितलंच असेल. त्यातले खूप businesses बघून आपल्यालाही वाटत असेल कि आपणही अश्या कंपन्यात invest केलं पाहिजे. किंवा खूप दुसऱ्याही अश्या startups मध्ये आपल्याला invest करायची इच्छा असेल पण त्यातले businesses अजून stock market मध्ये listed नाहीयेत.
आता अश्या businesses मध्ये invest करण्याचे options आता आपल्याला उपलब्ध आहेत. अश्या कंपन्यांचे shares घेण्याचे 3 मुख्य पर्याय आहेत. एक म्हणजे सरळ अश्या startups मध्ये venture capitalists , angel investor म्हणून invest करणे. दुसरं म्हणजे pre ipo कंपन्या, ज्यांनी ipo file केलाय किंवा in process आहेत. त्यांचे shares depositaries मधून promoters transfee करतात, त्यासाठी एकतर सरळ प्रोमोटर ला विचारू शकता किंवा काही financial institutions आहेत ज्या या deals करून देतात.
पण या खूप किचकट गोष्टी आहेत. आता यात काही कंपन्या उतरल्यात ज्या तुम्हाला सरळ option देतायेत अश्या कंपन्यांमध्ये invest कारण्यासाठी. त्यातल्या 3 मेजर कंपन्या आहेत
1) tradeunlisted. com
2) unlistedzone. com
3) unlisteddeal. com
ज्या तुम्हाला कंपन्यांचे promoters कडे असलेले shares, ESOPs म्हणजे startup कंपन्या त्यांच्या employ ला जे shares देतात ते shares आणि जे angle investors किंवा venture capitalist कडे असलेले shares यात deals करून देतात.
यातले खूप businesses growing असतात, आणि कंपनी मार्केटमध्ये list झाली तर multibagger returns पण मिळू शकतात. पण startup मध्ये invest करणं खूप जास्त risky असतं , त्यामुळे यात invest करताना खूप काळजी घेऊन, detailed analysis करूनच घ्या. तुम्हाला त्या sites वर किंवा दुसरीकडूनही कंपन्यांचे financials and other fundamentals उपलब्ध आहेत.
(This is not investment advice)

25/07/2022

खूप जणांना stock market मध्ये invest करायची भीती / uncertainty वाटत असते, stocks कशे pick करायचे, किंवा stocks मधली investment इतकी reliable वाटत नाही पण ते प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला उत्सुक असतात, ती जास्त safe वाटते.. किंवा पोर्टफोलिओ diversified ठेवायचा असतो, जस स्टॉकमध्ये थोडे, प्रॉपर्टीत थोडे.
आणि काही जणांना प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं पण तितके पैसे नसतात .तर त्यांच्यासाठी (Real Estate Investment Trust ) हा खूप चांगला investment option आहे. REIT म्हणजे काय तर हि एक ट्रस्ट कंपनी आहे जी investors कढून पैसे घेऊन खूप मोठ्या आणि महाग properties मध्ये इन्व्हेस्ट करते आणि त्या properties lease/rent वर देऊन त्याच जे income येतं ते investors मध्ये वाटते.
हि कंपनी मोठ्या commercial properties ,मोठे corporate hospitals, data centres, IT companies , complexes यामध्ये पैसे गुंतवते आणि ह्या जागा किरायाने देऊन जो रेंट मिळतो तो आपल्या shareholders मध्ये वाटते. आणि जस जस property च valuation वाढतं तस त्याचे लाभ आपल्याला मिळतात . आणि जेंव्हा आपल्याला हे विकून बाहेर पडायचं आहे तर लगेच बाहेरही पडू शकतो.
याचा अजूनेक फायदा म्हणजे आपल्याला स्वतःहून प्रॉपर्टी घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी खूप कुटाणे करत बसावं लागत, registry, stamp duty, maintenance, taxes इत्यादी गोष्टी असतात. इथे हे सगळं कंपनी स्वतः सांभाळते. आपल्याला स्वतःहून properties विकायला जायचं म्हणलं तर इतकी liquidity नसते बाजारात (म्हणजे समोरचा लगेच घेणार ) . इथे तुम्ही one click मध्ये विकू शकता. आणि यात तुम्ही अगदी 10000 रुपायापासूनसुद्धा invest करू शकता.
यातल्या खूप trust कंपनी share market मध्येपण Listed आहेत आणि NSE वर trade होतात. तिथूनही तुम्ही सहजपणे buy sell करू शकता, आणि rental income प्लस dividend from property appreciation मिळवू शकता. आणि याचे काही mutual funds सुद्धा आहेत जे equity सोबत यामध्येही invest करतात.
ज्यांना safer investment alternatives हवेत त्यांच्यासाठी हा खूप better option आहे.
Affluent Capital

Happy Diwali 🪔
03/11/2021

Happy Diwali 🪔

02/11/2021


सध्याच्या boom मार्केटमध्ये धडाधड नवीन startups चे नवनवीन IPO येतायेत.आणि ते प्रचंड पटीत oversubscribe होऊन प्रचंड पैसा मार्केटमध्ये येतोय. यातल्या 99% कंपन्या 10-12 वर्षाहून जास्त काळ business करूनसुद्धा अजून साधं रुपयाच्या profit मध्ये नाहीत. फक्त future profit projection च्या जीवावर लोक पैसा ओतत आहेत. या कंपन्या लिस्ट करण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं म्हणजे angel investors किंवा venture capitalistsना कंपनीतून stake विकून बाहेर पडायचा सोपा मार्ग .
जोपर्यंत जमिनीवर profit दिसत नाही तोपर्यंत कंपनीकडे पाहायचं सुद्धा नाही हा basic old school फंडा पाळतो मी, बिलकुल रिक्स नै लेने का बाबा...
पण Nykaa हि New age business मधली one of the most profitable startup आहे, जी थोड्याच दिवसात लिस्ट होईल. Future मध्ये असच profitable राहण्याची अपेक्षा आहे, कारण niche business आहे आहे listed businesses मध्ये तर एकमेव . म्हणून scarcity तर राहणारच, so चांगले returns मिळू शकतात longer term मध्ये .
(Disclaimer: This is not investment advice , just for educational purpose. Stock investment involves high risk)

Address

Hill Road, Bandra West
Mumbai
400050

Alerts

Be the first to know and let us send you an email when Affluent Capital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share