31/03/2026
आजच्या काळात मेडिक्लेम, जीवन विमा आणि कारचा विमा या चैनीच्या नाही.. तर अत्यंत अत्यावश्यक गरजा झाल्या आहेत. अचानक आलेलं आजारपण किंवा अपघात, एका क्षणात लाखोंचा खर्च उभा करू शकतो. अशा वेळी वर्षानुवर्षांची बचत संपवण्यापेक्षा आधीच विमा घेतलेला असणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे.
मेडिक्लेम आरोग्याचं संरक्षण करतो, जीवन विमा अचानक कमवत्या व्यक्ती चे निधन झाले तर आपल्या परिवाराला आर्थिक सुरक्षा देतो,वाहन विमा आपल्याला आर्थिक जबाबदारीपासून वाचवतो. एकवेळ काही खर्च पुढे ढकलता येतील, पण विमा मात्र प्राधान्याने केला पाहिजे, कारण.. सुरक्षितता हीच खऱ्या अर्थाने आपली संपत्ती आहे.
बाजारात असलेल्या विविध विमा कंपन्या आपल्या कारचा किंवा आपल्या स्वतःचा विमा किंवा मेडिक्लेम पॉलिसी तात्काळ काढुन देतात. आता.. हे सगळं काही खूप सोपं झालं आहे. काही मिनिटांत आपल्याला विमा पॉलिसी मिळते, प्रिमियमही कमी दिसतो. पण प्रश्न फक्त पॉलिसी काढण्याचा नसतो, तर प्रश्न असतो.. वेळ आली तर आपल्या पाठीशी कोण उभं राहणार.?
जवळचा मित्र, ओळखीचा सल्लागार किंवा विश्वासू एजंट यांच्याकडून विमा घेतला, तर आपण केलेला व्यवहार हा फक्त कागदापुरता मर्यादित राहत नाही. तर त्यात मित्रत्व असतं, एक नातं असतं, एक वेगळीच जबाबदारी असते. विमा पॉलिसी घेताना आपण समोरासमोर बसून चर्चा करतो.. कव्हर किती घ्यायचं, अटी काय आहेत, क्लेमची प्रक्रिया कशी आहे.? आणि चुकून.. अशी वेळ कोणावर येऊ नये पण.. क्लेमच्या वेळी जर अडचण आली, कागदपत्रांची धावपळ करावी लागली, कंपनीशी समन्वय साधावा लागला, तेव्हा फोन नेमका कोणाला करायचा.? हा फार मोठा प्रश्न पडतो. कॉल सेंटरला, की आणखी कोणाला, की.. आपण केलेल्या ई-मेलवर उत्तर येण्याची वाट पाहायची.?
याविरुद्ध.. मित्र किंवा स्थानिक एजंटकडून विमा पॉलिसी घेतली, तर किमान एवढं नक्की असतं.. अडचणीच्या वेळी " मी आहे " असं म्हणणारं एक व्यक्तिमत्त्व आपल्या सोबत असतं. तो आपली कागदपत्रं तपासतो, मार्गदर्शन करतो, आणि गरज पडली तर स्वतः धावपळही करतो. खरं तर.. विमा म्हणजे फक्त व्यवहार नाही, तर तो विश्वासाचा करार आहे.
ऑनलाइन प्लॅटफॉर्म वाईटच असतात असं माझं म्हणणं नाहीये.. ते नक्कीच सोयीचे पर्याय आहेत, ते आपल्याला विविध पर्याय देतात, तुलना करून निर्णय घेण्याची संधी देतात. पण ज्यांना वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष साथ महत्त्वाची वाटते, त्यांच्यासाठी.. जवळच्या विश्वासू व्यक्तीकडून विमा घेणं अधिक सुरक्षित आणि मानसिकदृष्ट्या समाधानकारक ठरू शकतं.
शेवटी निर्णय आपलाच असतो. पण पॉलिसी घेताना एक गोष्ट लक्षात ठेवावी.. क्लेमच्या दिवशी आपल्याला " सिस्टम " नको असते, आपल्याला हक्काचा " माणूस " हवा असतो.!!
आपलाच विश्वासू - गजेंद्र गोल्डे (Sbi Life सल्लागार ) Mo- 9767552332/9765792432
🙏🙏🙏🙏