02/05/2026
आज दिनांक 2 मे 2026 शनिवार रोजी देवगिरी अर्बन चा एक दिवसीय प्रशिक्षण सोहळा व स्नेह मिलन सोहळा पार पडला. यामध्ये श्री विशाल काटे सर यांची शाखा व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली तर श्री गणेश सोळंके सर यांची सहाय्यक शाखा व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली. श्री किरण जाधव सर यांची वसुली अधिकारी म्हणून निवड करण्यात आली तसेच श्री भीमाशंकर सोळंके यांची सहाय्यक वसुली अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. या वार्षिक स्नेह मिलन सोहळ्यात संस्थेच्या पुढील आर्थिक वर्षाची वाटचाल व ४० कोटी व्यवसायचे ध्येय धोरणे निश्चित करण्यात आली. या एक दिवसीय कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संस्थेचे उपाध्यक्ष माननीय उमेश मानधने सर यांनी मोलाचे मार्गदर्शन करत ध्येयधोरणे पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.