15/06/2018
*गाभणकाळातील शेळ्यांचा आहार व करडांची काळजी -*
1) चांगल्या वजनाची, सशक्त करडं
जन्मण्यासाठी शेळीच्या गाभणकाळातच तिचे
योग्य व्यवस्थापन करावे. गाभण शेळ्यांना सहज
पचणारा चारा, योग्य प्रमाणात पशुखाद्य
द्यावे. या चुचुआहारातील पोषणमूल्यांचा वापर
गर्भाच्या वाढीसाठी; तसेच शेळीच्या
शरीरातील पोषणूल्यांचा साठा
वाढविण्यासाठी होईल.
2) जसजसे व्यायण्याची तारीख जवळजवळ येईल
तसतसे चाऱ्याव्यतिरिक्त पोषणमूल्यांच्या
पुरवठ्यासाठी अधिक खुराकाचा पुरवठा
करावा.
3) गाभण शेळीस गाभणकाळाच्या 90
दिवसांनंतर जादा खुराक देण्याची गरज असते.
गाभणकाळात जर उत्तम प्रतीचा चारा व
खुराक दिला गेला l
7) चिक पाजून झाल्यानंतर त्या करडाचे तोंड
कापडाने पुसून घ्यावे किंवा पाण्याने धुऊन
घ्यावे. कारण चिकटपणामुळे माश्या बसतात,
मुंग्यांचा प्रादुर्भाव होतो.
8) नवजात करडाचे पोट लहान असल्यामुळे
त्यांना थोड्या थोड्या अंतराने सतत दूध देणे
गरजेचे असते. दूध दिवसातून कमीत कमी चार वेळा
द्यावे. नवजात करडांना जर दिवसभर त्यांच्या
आईसोबत ठेवल्यास करडं गरजेनुसार दूध पिऊ
शकतात.
9) नवजात करडास पाच दिवसांनंतर करडाच्या
वजनाच्या 100 टक्के इतके दूध पाजावे किंवा
करडास व्यवस्थित पचन होऊन त्या प्रमाणात
दूध पाजावे. करडाच्या आईस दूध नसेल तर दुसऱ्या
शेळीचे दूध पाजवावे. शेळीचे दूध उपलब्ध नसेल तर
गायीचे दूध उपयुक्त ठरते.
10) दुसऱ्या आठवड्यापासून करडे दूध
प्यायल्यानंतर आईजवळ थांबत नाही. दूर जाऊन
विश्रांती घेतात किंवा खेळतात, बागडतात.
त्यामुळे त्यांच्या शरीरांची हालचाल वाढते.
परंतु, गरजेच्या प्रमाणात शेळीचे दूध उत्पादनात
वाढ होत नाही.
11) शेळीचे दूध उत्पादन कमी असेल तर करडाच्या
वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो आणि
त्यांची तीव्रता जुळ्या/ तिळ्या करडांच्या
बाबतीत अधिक जाणवते. अशावेळी
उच्चप्रतीचा प्रथिनांचे प्रमाण 20 ते 22 टक्के
असलेल्या खुराक करडांना द्यावा. त्यामुळे करडे
खाण्याचा प्रयत्न करतात.
12) करडांना पहिल्या आठवड्यात वेगळे पाणी
पिण्यासाठी देण्याची आवश्यकता नसते.
त्यानंतर मात्र लहान भांड्यामध्ये पाणी
गरजेनुसार द्यावे.
चाऱ्याचे नियोजन -
1) करडे वयाच्या 1 ते 2 आठवड्यांपासून चारा
चघळण्यास सुरवात करतात. करडांना
सुरवातीला उत्तम प्रतीचे वाळलेले गवत किंवा
द्विदल वर्गातील हिरव्या वैरण (लसूणघास,
शेवरी, सुबाभूळ) द्यावी. वैरणीच्या लहान
पेंढ्या बांधून भिंतीजवळ करडाच्या तोंडाला
पोहोचतील अशा उंचीवर अधांतरी लटकून
ठेवाव्यात. असा चारा करडं आवडीनं खाऊ
लागतात. गरजेनुसार त्याचे प्रमाण हळूहळू
वाढवावे. त्यामुळे कोटीपोटातील उपयुक्त
जीवाणूंची वाढ व विकास होतो.
2) करडांना आईपासून आठ आठवड्यांनी वेगळे
करावे. त्यांना उत्तम प्रतीच्या चाऱ्याबरोबरच
थोड्या प्रमाणात पशुखाद्य देण्यास सुरवात
करावी.
3) लहान करडांना एकदम जास्त प्रमाणात
हिरवा चारा कोवळे गवत खाण्यास देऊ नये.
यामुळे हगवण तर लागेलच परंतु करडांना
आंत्रविषार होण्याची भीती असते. यासाठी
फक्त जास्त कोवळा चारा खाण्यास देऊ नये.
4) करडू 25 दिवसांचे असल्यापासून थोडा
थोडा (50 ग्रॅम) खुराक द्यावा. खुराकातील
प्रथिने मिळाल्यामुळे करडांची वाढ झपाट्याने
होण्यास मदत होईल. करडांना चांगल्या
प्रतीचा चारा आहारात दिल्यास (लसूणघास,
बरसीम) करडांची वाढ झपाट्याने होते.
खुराकावरील खर्च कमी करता येतो.
5) करडांच्या वाढत्या वयाबरोबर दैनंदिन
आहारातील खुराकाचे प्रमाण 50 टक्केपर्यंत
वाढवावे. सर्वसाधारणपणे दोन महिन्यांपर्यंत
करडाचे 8 किलो किंवा मूळ वजनाच्या चारपट
वजन मिळू शकते. 6) करडांच्या वाढीचा वेग
पहिल्या दोन महिन्यांत शेळीच्या दूध
उत्पादनाच्या समप्रमाणात असतो.
त्यानंतरच्या काळात करडांचे दूध हळूहळू बंद करून
खुराक व वैरणीवर जोपासना करावी.
7) पौष्टिक आहार व व्यवस्थापनावर वयाच्या
तीन महिन्यांपर्यंत करडाचे वजन 15 किलो
अपेक्षित आहे.
8) पहिल्या तीन महिन्यांतील करडांची वाढ
पूर्णपणे आहारावर अवलंबून असते. त्यामुळे
मृत्यूच्या प्रमाणात घट करण्यासाठी व जलद
वाढीसाठी आहार व्यवस्थापनाची अधिक
काळजी घेणे गरजेचे आहे.
9) वयाच्या एक वर्षापर्यंत अपेक्षित असलेल्या
वजनापैकी 65 टक्के वजन पहिल्या तीन
महिन्यांत मिळते. त्यापैकी सर्वाधिक 43 टक्के
वजन पहिल्या, 28 टक्के दुसऱ्या, 29 टक्के
तिसऱ्या महिन्यात मिळते.
करडांचे संगोपन करताना ...
1) स्वतःच्या करंडाचा अस्वीकार करण्याचे
प्रमाण पहिल्यांदा व्यायलेल्या शेळ्यांमध्ये
अधिक प्रमाणात दिसते. टाकून दिलेले किंवा
आई मेलेल्या करडांचे संगोपन करून वाढवणे थोडे
कठीण काम आहे. कारण अनाथ करडांचा दुसऱ्या
शेळ्या स्वीकार करत नाहीत.
2) यासाठी ज्या शेळीचे करडू गेले आहे, अशा
शेळीच्या अंगावर अनाथ करडाला पाजावे.
पाजतेवेळी डोळ्यावर पट्टी बांधावी.
3) शेळी तिच्या करडाला तिच्या वासावरून
ओळखते. त्यामुळे अनाथ करडाच्या अंगावर व
शेळीच्या नाकावर थोडे तिचेच दूध काढून
चोळावे म्हणजे शेळी अनाथ करडाचाछ स्वीकार
करते.
4) हे शक्य नसेल तर दुसऱ्या शेळीचे, गाईचे दूध
काढून पाजावे.