Jadhav Tax Consultancy

Jadhav Tax Consultancy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jadhav Tax Consultancy, Bank/Financial Institution, C/o. Jadhav Commerce academy, Near Dayanand College, Khadgaon Road, Latur.

12/02/2013

पॅनकार्डधारकांनो सावधान; नोटीस मिळेल

पॅनकार्डधारकांना आता अधिक सर्तक राहावे लागणार आहे. कारण केव्हाही कारणे दाखवा नोटीस हातात पडू शकेल. करसंकलन वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न वाढवले आहे. त्यामुळे पॅनकार्डधारकांना नोटीस बजावण्याचे धोरण सरकार अबलंबिले आहे.

करसंकलन वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्नाचा एक भाग म्हणून पॅनकार्डधारकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. ज्यांनी विवरणपत्र सादर केलेले नाही अशा ३५,१७० पॅनकार्डधारकांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली आहे. यामध्ये कर विवरण न सादर केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पाठविलेल्या नोटीसीमध्ये दिला आहे.

देशात सुमारे १२ लाख पॅनकार्डधारकांनी आपले विवरणपत्र सादर केलेले नाह. ही माहिती प्राप्तिकर खात्याने दिली आहे. १२ लाख पॅनकार्डधारकांशिवाय आणखी पॅनकार्डधारकांना यापुढे नोटीस बजावण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेय.

कर भरण्यासाठी पात्र असणा-या पॅनकार्डधारकांचा तपास करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या आधारे संबंधित कर विवरण सादर न करणा-यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येत आहे. यामध्ये महत्त्वाच्या प्रकरणांवर प्राप्तिकर कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

मोठी सोने खरेदी करताय, पॅन द्यायची तयारी ठेवा..सोने आयात रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या समितीची शिफारसयापुढे तुम्ही मोठ...
08/02/2013

मोठी सोने खरेदी करताय, पॅन द्यायची तयारी ठेवा..

सोने आयात रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या समितीची शिफारस

यापुढे तुम्ही मोठय़ा रकमेची सोनेखरेदी करीत असाल किंवा सोन्याच्या बदल्यात कर्ज उचलत असाल तर 'पॅन' देणे बंधनकारक ठरणार आहे. कच्च्या तेलाच्या आयातीनंतर देशाच्या विदेशी चलन गंगाजळीवरील सर्वात मोठे संकट ठरलेल्या सोने आयातीला कमी करण्याच्या दृष्टीने याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सोने आयातीच्या विषयावरील रिझव्‍‌र्ह बँकेकडून स्थापित कार्यदलाचे अध्यक्ष के. यू. बी. राव यांनी नव्या शिफारशी सुचविल्या आहेत. बँकांमार्फत होणाऱ्या सोने खरेदी दरम्यान तसेच बिगर बँकिंग वित्तसंस्थेद्वारा दिल्या जाणाऱ्या तारण कर्जाच्या वेळी ग्राहकांकडून पॅन घेणे बंधनकारक करण्याची त्यांची शिफारस आहे. याचबरोबर मोठय़ा रकमेतील सोने खरेदीसाठी धनादेशानेच वेतन अदा करण्याविषयी तसेच सोन्याचा परताव्याशी निगडित बचत खाते सुरू करण्याविषयीही सुचविण्यात आले आहे.
चालू खात्यातील वाढत्या तुटीबाबत केंद्र सरकारबरोबरच रिझव्‍‌र्ह बँकेनेही चिंता व्यक्त केली आहे. याला अनुसरूनच आता सोने खरेदीदार किंवा कर्जदारांना जरब म्हणून पॅन देणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेच्या समितीने दिला आहे. डेप्युटी गव्हर्नरपदावरून नुकतेच निवृत्त झालेले सुबीर गोकर्ण यांनीही पुण्यातील 'बँकॉन' परिषदेत सोने आयातील आळा घालण्यासाठी सोन्याशी निगडित बँकिंग उत्पादने अस्तित्वात आणण्याची आवश्यकता मांडली होती.
बँकांच्या विविध शाखांमधून सध्या सोन्याची विविध वजनाची नाणी वितरित केली जातात. तर बिगर बँकिंग वित्तसंस्थ्यांच्या माध्यमातून सोने तारण ठेवून मोठय़ा प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो. सध्या ५ लाख रुपयांवरील दागिने खरेदीसाठी बंधनकारक असलेले पॅन आता बिगर बँकिंग वित्तसंस्थांना या रकमेच्या वित्त पुरवठय़ासाठीही बंधनकारक करण्यात यावे, असेही या समितीने सुचविले आहे.

04/02/2013

तीन लाखांपर्यंत आयकर नाही? - http://bit.ly/X0RAFt

एकिकडे आगामी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून श्रीमंतांवर अधिक करभार लावण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी सामान्य करदात्यांना या अर्थसंकल्पातून एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यानुसार, आयकराच्या सध्याच्या र्मयादेत वाढ करून तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

Address

C/o. Jadhav Commerce Academy, Near Dayanand College, Khadgaon Road
Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jadhav Tax Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share