Manjra Mahila urban co opprative credit society Ltd Latur

  • Home
  • India
  • Latur
  • Manjra Mahila urban co opprative credit society Ltd Latur

Manjra Mahila urban co opprative credit society Ltd Latur Manjara mahila urban co- operative credit society Latur

27/08/2026

✨ मांजरा समृद्धी योजना – SIP ✨

आपल्या बचतीला विश्वासाची आणि समृद्धीची खास संधी! 💰🌱

📌 १२ व २४ महिन्यांच्या आकर्षक SIP योजना
📌 नियमित बचत • सुरक्षित भविष्य
📌 महिलांसाठी खास योजना
📌 आकर्षक परतावा

आजची छोटी बचत… उद्याची मोठी समृद्धी! 🌟

📞 संपर्क : 70389 13389

📍 मांजरा महिला अर्बन, लातूर

विश्वास… पारदर्शकता… सुरक्षितता… समृद्धी!

#मांजरामहिलाअर्बन #मांजरासमृद्धीयोजना #मासिकबचत #समृद्धी #महिलांसाठीखासयोजना #लातूर #बचत #आर्थिकसक्षमीकरण #विश्वास #पारदर्शकता #सुरक्षितता

✨ मांजरा समृद्धी योजना – SIP ✨आपल्या बचतीला विश्वासाची आणि समृद्धीची खास संधी! 💰🌱📌 १२ व २४ महिन्यांच्या आकर्षक SIP योजना...
27/08/2026

✨ मांजरा समृद्धी योजना – SIP ✨

आपल्या बचतीला विश्वासाची आणि समृद्धीची खास संधी! 💰🌱

📌 १२ व २४ महिन्यांच्या आकर्षक SIP योजना
📌 नियमित बचत • सुरक्षित भविष्य
📌 महिलांसाठी खास योजना
📌 आकर्षक परतावा

आजची छोटी बचत… उद्याची मोठी समृद्धी! 🌟

📞 संपर्क : 70389 13389

📍 मांजरा महिला अर्बन, लातूर

विश्वास… पारदर्शकता… सुरक्षितता… समृद्धी!




#मांजरामहिलाअर्बन #मांजरासमृद्धीयोजना #मासिकबचत #समृद्धी #महिलांसाठीखासयोजना #लातूर #बचत #आर्थिकसक्षमीकरण #विश्वास #पारदर्शकता #सुरक्षितता

25/08/2026
✨🌿  मांजरा महिला अर्बनचा सहावा वर्धापनदिन उत्साहात; ‘वर्धापन समृद्धी योजने’चा शुभारंभ ✨🌿सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार...
23/08/2026

✨🌿 मांजरा महिला अर्बनचा सहावा वर्धापनदिन उत्साहात; ‘वर्धापन समृद्धी योजने’चा शुभारंभ ✨🌿

सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक आणि शुभचिंतक यांच्या विश्वास व सहकार्याच्या बळावर मांजरा महिला अर्बनने यशस्वी सहा वर्षे पूर्ण केली. या आनंददायी सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. 🌸

लातूर : मांजरा महिला अर्बनच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेच्या वतीने ‘वर्धापन समृद्धी योजना’ जाहीर करण्यात आली असून, या योजनेंतर्गत १०० दिवसांसाठी ९ टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या योजनेत विशेष लाभाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेविका रागिणी यादव, शोभा पाटील, संगीता मिरचे, स्थायी समिती सदस्या स्वाती घोरपडे, छाया बंडगर तसेच माजी नगरसेविका श्वेता लोंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुजाता अजनीकर पीपल्स महिला चेयरमैन ,भालचंद्र सोनकांबळे, रंगनाथ बंडगर , शहर जिल्हाध्यक्ष प्रविण कांबळे, विक्रम करमाळे, अक्षय सुरवसे, प्राप्ती वाघमारे, विनायक जंगले, पांडुरंग भिसे, जे. जी. बिराजदार, एम. एल. जाधव सर, श्रीशैल्य कोरे सर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून संस्थेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका ताई सुरवसे व सचिव रोहिणी धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक प्राप्ती वाघमारे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राहुल सुरवसे यांच्यासह पद्मनाभ अर्बनचे चेअरमन आकाश बी. एस., प्रियंका सुदे, विद्या बांगर, सावरगावकर, पद्मावती कोट्टलवार, बाळासाहेब मोहिते, अज्ञान वारकरी, अभिजीत कांबळे, सूरज उदारे, प्रतीक्षा चालवाड, समीना सय्यद, अनिता गोडपाटले, आदर्श कांबळे, बालाजी दरेकर, सोहेल पठाण ,महादेवी बी एस, राहुल सुरवासे,कमलाकर सुरवासे,अक्षय बी एस , आदींची उपस्थिती होती.

मांजरा महिला अर्बनने गेल्या सहा वर्षांच्या वाटचालीत ग्राहक, सभासद व खातेदारांचा विश्वास संपादन केला असून, आर्थिक क्षेत्रासोबतच महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्थेच्या वतीने विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत. ‘वर्धापन समृद्धी योजना’ ही त्याच दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सहाव्या वर्धापनदिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या ९ टक्के व्याजदराच्या योजनेला सभासद, खातेदार व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास संस्थेचे सभासद, खातेदार, हितचिंतक, महिला ग्राहक तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




#मांजरा_महिला_अर्बन #सहावा_वर्धापनदिन #वर्धापन_समृद्धी_योजना #९टक्के_व्याज #१००दिवस #महिला_सक्षमीकरण #आर्थिक_सक्षमीकरण #विश्वासाची_सहा_वर्षे SurwaseManjra Mahila urban co opprative credit society Ltd LaturManjra UrbanPriyanka SurwaseManjra Mahila Urban आर्थिक साक्षर Manjara Mahila Urban

🩸🩸मांजरा महिला अर्बनच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात 🩸🩸लातूर : मांजरा महिला अर्बनच्या सहाव्या वर्ध...
23/08/2026

🩸🩸मांजरा महिला अर्बनच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात 🩸🩸

लातूर : मांजरा महिला अर्बनच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वर्धापनदिनाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारखा विधायक उपक्रम राबविण्यात आला.

गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच समाजामध्ये रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिक, सभासद, खातेदार, हितचिंतक तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी मांजरा महिला अर्बनच्या चेअरमन प्रियंका ताई सुरवसे, सचिव रोहिणी धायगुडे, संचालक प्राप्ती वाघमारे, संचालक आकाश बी.एस,राजेश भुतडा, तसेच रोहिणी बिराजदार, माने माधव ,अनिकेत भालेराव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान शिबिरासाठी संजीवनी ब्लड बँकेच्या टीमने विशेष सहकार्य केले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

मांजरा महिला अर्बनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमांना सातत्याने प्राधान्य दिले जात आहे. सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून ‘सेवा हीच खरी सामाजिक बांधिलकी’ हा संदेश देण्यात आला.

वर्धापनदिनानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. संस्थेच्या सामाजिक कार्यासोबतच आर्थिक क्षेत्रातील पुढील वाटचालीस उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.


रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश ❤️🩸

मांजरा महिला अर्बनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वर्धापन दिनाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता ‘रक्तदान – महादान’ या सामाजिक भावनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏

आपल्या एका रक्तदानामुळे एखाद्याचे जीवन वाचू शकते…
हीच सामाजिक जाणीव आणि सेवाभावाची परंपरा पुढे नेण्याचा आमचा संकल्प! ❤️

या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदाते, हितचिंतक, शुभचिंतक, आयोजक व संजीवनी ब्लड बँक टीमचे मनःपूर्वक आभार.

मांजरा महिला अर्बन — विश्वास, सेवा आणि प्रगतीचा सहावा यशस्वी टप्पा! 🌸

#वर्धापनदिन #रक्तदान #रक्तदानमहादान #महिलाशक्ती #सेवाभाव #सामाजिकबांधिलकी #आपलीमांजरामहिलाअर्बन

🌟 आपल्या बचतीला मिळू दे समृद्धीची नवी दिशा! 🌟💰 मांजरा समृद्धी योजना 💰आपल्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त खास योजना!✨ १०० द...
21/08/2026

🌟 आपल्या बचतीला मिळू दे समृद्धीची नवी दिशा! 🌟

💰 मांजरा समृद्धी योजना 💰
आपल्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त खास योजना!

✨ १०० दिवसांसाठी ९% व्याजदर ✨

आजची बचत म्हणजे उद्याची सुरक्षितता…
आणि विश्वासाने केलेली गुंतवणूक म्हणजे भविष्यातील समृद्धी! 💫

🤝 मांजरा महिला अर्बन सोबत आपल्या बचतीला द्या विश्वासाची आणि सुरक्षिततेची साथ.

📌 योजनेची वैशिष्ट्ये:
🔸 १०० दिवसांची मुदत
🔸 आकर्षक ९% व्याजदर*
🔸 विश्वासार्ह आर्थिक सेवा
🔸 सुरक्षित व नियोजित बचतीची संधी

📍 मांजरा महिला अर्बन
को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूर
📌 बजाज शोरूमच्या समोर, बार्शी रोड, एमआयडीसी कॉर्नर, लातूर – ४१३५१२

*अटी व शर्ती लागू.

#मांजरा_महिला_अर्बन #मांजरा_समृद्धी_योजना #९टक्के_व्याजदर #100दिवस #६वा_वर्धापनदिन #बचत #गुंतवणूक #समृद्धी #आर्थिक_सुरक्षितता #विश्वासाची_६वर्षे

लाभली आपली साथ… त्यामुळेच यशस्वी प्रवास! 🌸🟠 मांजरा महिला अर्बनचा ६ वा वर्धापन दिन 🟠📅 शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६⏰ वेळ : सक...
21/08/2026

लाभली आपली साथ… त्यामुळेच यशस्वी प्रवास! 🌸

🟠 मांजरा महिला अर्बनचा ६ वा वर्धापन दिन 🟠

📅 शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत

विश्वास, सहकार्य आणि आपल्या प्रेमाच्या साथीने मांजरा महिला अर्बन आज यशस्वी वाटचालीचे ६ वे वर्ष पूर्ण करत आहे. 💐

या आनंददायी सोहळ्यानिमित्त सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक, शेतकरी बांधव, व्यापारी, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

आपली उपस्थिती आणि शुभेच्छा हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बळ आहे.
या आनंदसोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. 🙏💐

सस्नेह निमंत्रण! 🌷

👉 विनीत : चेअरमन, संचालक मंडळ व मांजरा महिला अर्बन परिवार




#मांजरा_महिला_अर्बन #६वा_वर्धापनदिन #वर्धापनदिन #शुभेच्छा #हितचिंतक #सभासद #ठेवीदार #खातेदार #मित्रपरिवार@

❤️🩸 लातूरकरांनो… चला, एका थेंबातून कोणाचं तरी आयुष्य वाचवूया! 🩸❤️🎉 मांजरा महिला अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,...
17/08/2026

❤️🩸 लातूरकरांनो… चला, एका थेंबातून कोणाचं तरी आयुष्य वाचवूया! 🩸❤️

🎉 मांजरा महिला अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूर
यांच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन!

🩸 रक्तदान करा… जीवन वाचवा!
कारण तुमच्या रक्ताचा एक थेंब एखाद्या कुटुंबासाठी आशेचा किरण ठरू शकतो. 🙏

📅 दिनांक : २० ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी १० ते दुपारी ४
📍 स्थळ : संस्कार वर्धिनी शाळेसमोर, बाशी रोड, लातूर

🎁 प्रत्येक रक्तदात्याला ₹१ लाखांचे अपघाती विमा संरक्षण विभागामार्फत मोफत काढण्यात येईल.

🔥 लातूरमध्ये सर्वाधिक रक्तदाते सहभागी करून घेण्याचा संकल्प!
तुम्ही एकटे येऊ नका…
👉 आपले मित्र, कुटुंबीय, सहकारी आणि मित्रमंडळींना सोबत घेऊन या!

आज तुमच्याकडे रक्तदान करण्याची संधी आहे…
उद्या कदाचित तुमच्या रक्ताची कोणाला तरी गरज असेल. ❤️

🙌 चला लातूरकरांनो, रक्तदानाची एक नवी चळवळ उभी करूया!
🩸 रक्तदान हेच श्रेष्ठ दान — चला, समाजासाठी योगदान देऊया!

📞 अधिक माहितीसाठी:
02382 299181 | 70389 13389 | 93229 18282

#रक्तदान #रक्तदानशिबिर #लातूर #मांजरामहिलाअर्बन #रक्तदानहेचश्रेष्ठदान

Address

Sanskar Vardhini School Samor Barshi Road
Latur

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912382299181

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manjra Mahila urban co opprative credit society Ltd Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Manjra Mahila urban co opprative credit society Ltd Latur:

Shortcuts

Share