20/02/2021
#बँकांचे_खाजगीकरण
सरकारी बँकांचे खाजगीकरण झाले म्हणजे आपल्याला छान सर्व्हिस मिळेल, सरकारी बँकात कर्मचारी मुजोरच होते, बर झाल खाजगीकरण झाल अस वाटणाऱ्या लोकांची बौद्धिक कुवत केवळ पायाजवळ पाहण्याची असते. नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे या छापाची हि लोक.
लोकांना बँकेत पैसे ठेवणे आणि काढणे एवढीच बँकिंग असते हाच मुळात एक गोड गैरसमज असतो.खरतर हि सेव्हिंग किंवा पगाराची खाती म्हणजे बँकिंग व्यवहारात दर्यामे खसखस एवढीच असतात. पण यांचाच दंगा आणि कालवा जास्त.
बँका लोकांकडून भांडवल गोळा करतात, बँकेत लोक ठेवी ठेवतात, या ठेवींवर बँका व्याज देतात आणि हे पैसे लोकांना बँका कर्जाऊ देतात. लोक कर्जाची परतफेड करतात आणि बँकांचे व्यवहार चालतात. कर्जाचा व्याजदर आणि ठेवींचा व्याजदर यामधली तफावत हाच बँकांचा नफा.
बँका अजूनही बरच काही करतात.सरकारच्या वेगवेगळ्या योजना, महामंडळ, यांच्या कर्जाच्या योजना सामान्य लोकांसाठी राबवल्या जातात तिथे या बँका नोडल एजन्सी म्हणून काम करतात.तिथे सरकारी योजनांची उद्दिष्ट पूर्ण करायला, सरकारच्या हमीनुसार लोकांना कर्जे वाटली जातात. छोट्या चहा टपरी पासून लघु उद्योगांना भांडवलाची पूर्तता, खेळत भांडवल या सगळ्या बाबी सरकारी बँका पुरवतात.
खाजगीकरण झाल्यावर या बँकांच्या शाखा खाजगी पद्धतीने चालतील आणि तुम्हाला उर्वरित सरकारी बँकांमध्ये योजनांसाठी खेटे घालावे लागतील.
लोकसंख्या तीच मात्र सरकारी बँका मर्यादित झाल्या कि साहजिकच लोकांची गर्दी तिथेच होईल आणि लोकांना सेवा मिळू शकणार नाहीत, लाभार्थी वंचित राहतील.
कर्जे घेणारी सामान्य माणस आपली पत जपायला, अब्रूला घाबरतात, ती बहुतांशी कर्जाची परतफेड नीट करतात, बुडवणारे वेगळेच असतात.
खाजगी बँकांना दहा दहा हजार रुपयांसाठी तेवढेच कागद रंगवण्याचा उद्योग आणि एकाच मोठ्या उद्योगाला एक कोटी कर्ज द्यायला तेवढाच उद्योग, साहजिकच खाजगी बँकांचा व्यवसाय आणि उद्दिष्ट वेगळी राहतील.
बँकांच्या कर्जपुरवठा या महत्वाच्या बाबीतून सामान्य माणस बेदखल होतील.
सरकारी बॅंकांच खाजगीकरण म्हणजे फक्त नोकऱ्यांच्या संधी कमी होणे किंवा सेव्हिंग खात्यांना सेवा मिळण्याचा दर्जा बदलणे एवढाच अर्थ नाहीये.
सूक्ष्म,लघु उद्योग, छोटे व्यवसायिक भांडवल पुरवठ्यापासून वंचित राहणे हा मोठा धोका आहे आणि हा सगळा मध्यमवर्ग आहे , म्हणजेच तुम्ही आम्ही आहोत.
खाजगीकरण नेमक कुणाच्या मुळावर उठणार आहे याचा अंदाजच नसलेली आणि हे संकट किती विक्राळ आहे हे न कळणारी लोकच सवत रंडकी व्हायची घाई करताहेत एवढच.
- आनंद शिदोले
#बँकांचे_खाजगीकरण
#सबका_नंबर_आयेगा
िक_जायेगा