Financial Consultancy

Financial Consultancy Invest Early.......
Invest Regularly.............

ऑपशन ट्रेडिंग,इन्ट्राडे ट्रेडिंग, डिलेव्हरी ट्रेडिंग  त्याच बरोबर मार्केट च्या रोजच्या रोज लेव्हल हव्या असतील तर आपला टे...
06/05/2021

ऑपशन ट्रेडिंग,इन्ट्राडे ट्रेडिंग, डिलेव्हरी ट्रेडिंग त्याच बरोबर मार्केट च्या रोजच्या रोज लेव्हल हव्या असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
धन्यवाद

टेलिग्राम ग्रुपची लिंक

02/03/2017

सहा ते सात महिन्यात आयआरसीटीसीचा आयपीओ शक्य

रेल्वेने सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या कंपन्यांच्या शेअर बाजारातील नोंदणीसाठी तयारी सुरू केली आहे. आयआरसीटीसीचा आयपीओ येत्या सहा ते सात महिन्यात येण्याची शक्यता आहे. मात्र सेवाकर शुल्क रद्द केल्याचा फटका आयआरसीटीसीला बसणार असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेशीसंबंधित सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी करण्यात येईल अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर आता रेल्वेने आयआरसीटीसी, आयआरएफसी आणि इरकॉन या तीन कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रेल्वेचे ऑनलाईन तिकीट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सेवा कर शुल्क माफ करण्याची घोषणा देखील करण्यात आली. त्यामुळे आयआरसीटीसीच्या उत्पन्नात घसरण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता आयआरसीटीसीला नुकसान भरपाई किंवा अनुदान देण्याची शक्यता आहे.

आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन सध्या रेल्वेचे तिकीट ऑनलाईन खरेदीवर स्लीपर क्लाससाठी 20 रुपये आणि एसी क्लाससाठी 40 रुपयांचा सेवा कर आकारला जात होता. तिकिट रद्द करण्यासाठीदेखील सेवा कर भरावा लागत होता. अनेकांना नोटाबंदीनंतर रोख रकमेच्या अभावामुळे ऑनलाईन बुकिंगचा पर्याय निवडत सेवा कराचा भार सहन करावा लागला होता. मात्र, आता अर्थसंकल्पात हे शुल्क माफ करण्याची घोषणा करण्यात आल्याने याचा फटका आयआरसीटीसी बसला आहे.

आयआरसीटीसीकडून रेल्वेतील कॅटरिंग कामकाज बघितले जाते तर आयआरएफसी रेल्वेचे अर्थविषयक कामकाज सांभळ आणि इरकॉन रेल्वेसाठी ट्रॅक बांधकामाचे काम करते. या तीनही कंपन्यांमध्ये आयआरसीटीसीची आर्थिक स्थिती चांगली असून कंपनीची रु.550 कोटींची वार्षिक उलाढाल आहे.

19/07/2016

‘अॅडव्हान्स्ड एन्झाइम’चा आयपीओ 20 जुलैपासून खरेदीसाठी खुला

'अॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज्'च्या सुमारे 410 कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीला(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) येत्या 20 जुलैपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी कंपनीने प्रतिशेअर 880-896 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी 16 शेअर्सची खरेदी करणे बंधनकारक आहे. प्रारंभिक हिस्साविक्रीसाठी कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक मिळून 46,02,651 शेअर्सची विक्री करणार आहेत. अॅडव्हान्स्ड एन्झाइमच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. गुंतवणूकदारांना शेअर खरेदीसाठी पुढील दोन दिवस अर्थात 22 जुलैपर्यंत अर्ज करता येईल.

कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दोन कोटी रुपयांचे शेअर्स राखीव ठेवले आहेत. याशिवाय, 50 टक्के शेअर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी तर किमान 15 टक्के शेअर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात येईल.
मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सची नोंदणी करण्यात येणार आहे. आयपीओतून मिळालेले भांडवल उपकंपनी अॅडव्हान्स्ड एन्झाइम्स युएसएमध्ये गुंतवणूक, कर्जाची परतफेड आणि जनरल कॉर्पोरेट कारणांसाठी वापरला जाणार आहे. अॅडव्हान्स्ड एन्झाइमतर्फे ही प्रोप्रायटरी एन्झाइम उत्पादनांचे संशोधन व विकास, उत्पादन तसेच मार्केटिंग केले जाते.

20/04/2016

थायरोकेअर टेक्नॉलॉजीचा आयपीओ 27 एप्रिलपासून खुला

थायरोकेअर टेक्नॉलॉजीजच्या प्राथमिक समभाग विक्रीला(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग- आयपीओ) 27 एप्रिल रोजी सुरुवात होत आहे. गुंतवणूकदारांना 29 एप्रिलपर्यंत आयपीओच्या खरेदीसाठी अर्ज करता येणार आहे.

रोगनिदानकौशल्याचे(डायग्नॉस्टिक्स) तंत्रज्ञान विकसित करणारी थायरोकेअर टेक्नॉलॉजीज् आयपीओद्वारे 1.07 कोटी शेअर्सची विक्री करणार आहे. कंपनीचे विद्यमान भागधारकांसह प्रमुख भागधारक ए वेलुमणी एचयुएफ आणि आनंद वेलुमणी आपल्या शेअर्सची विक्री करणार आहेत. जेएम फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटीज्, एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेस आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज कंपनीचा आयपीओ इश्यू व्यवस्थापित करणार आहेत.
गेल्यावर्षी आरोग्य क्षेत्रातील अनेक कंपन्या शेअर बाजारात दाखल झाल्या. यात डॉ. लाल पॅथलॅब्स, नारायण ह्रदयालय व हेल्थकेअर ग्लोबलचा समावेश आहे. शिवाय, न्यू दिल्ली सेंटर फॉर साईट कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे अर्ज केला आहे.

20/04/2016

‘एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ’च्या आयपीओची तयारी सुरू

एचडीएफसीची आयुर्विमा क्षेत्रातील उपकंपनी 'एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ' लवकरच प्राथमिक समभाग विक्री(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) करण्याची शक्यता आहे. कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी एचडीएफसीच्या संचालक मंडळाची मंजुरी मिळाली आहे. शिवाय, आयपीओच्यावेळी एचडीएफसी कंपनीतील 10 टक्के हिस्सेदारी विकणार आहे.

एचडीएफसी लाईफच्या आयपीओविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. परंतु एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ आयपीओद्वारे किमान 2,000 कोटींचे भांडवल उभारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ ही शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी देशातील पहिली खासगी आयुर्विमा कंपनी ठरणार आहे. त्यासाठी आयआरडीएआय आणि भांडवली बाजार नियामक सेबीसह अनेक नियामक मंडळांची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

एचडीएफसीने आयुर्विमा कंपनीचे निकाल जाहीर केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात एचडीएफसी लाईफला 818 कोटींचा करोत्तर नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात 4.2 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच काळात कंपनीला 786 कोटी रुपये नफा झाला होता. कंपनीच्या एकुण हप्ता संकलनात 10 टक्के वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 16,313 कोटी रुपयांचा हप्ता गोळा केला होता. शिवाय, कंपनीने आपल्या शेअरधारकांना 216 कोटींटा लाभांश दिला.

14/03/2016

सेन्सेक्समधील टॉप 8 कंपन्यांच्या भांडवलात रु. 21,296 कोटींची भर

गेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ठरविणाऱ्या टॉप 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकत्रितपणे 21,296 कोटी रुपयांची भर पडली आहे. एचडीएफसी व आयटीसीच्या भांडवलात सर्वाधिक वाढ झाली आहे. इन्फोसिस व कोल इंडिया लिमिटेड वगळता इतर सर्व कंपन्यांच्या भांडवलात वाढ झाली आहे. शुक्रवारी सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे 72 व 25 अंशांच्या वाढीसह बंद झाले. मागील आठवड्यात बाजारात परदेशी गुंतवणूकीचा वेग स्थिर होता.

बाजारमूल्य वाढलेल्या कंपन्या, बाजारमूल्यातील वाढ व नवे बाजारमूल्य (कोटी रुपये)

कंपनी ------------------- बाजारमूल्यातील वाढ ---------- नवे बाजारमूल्य
एचडीएफसी------------------ 4,777.47 -------------------1,83,004.82
आयटीसी--------------------- 4,100.76------------------ 2,58,187.17
ओएनजीसी------------------. 3,507.75------------------- 1,75,473.10
रिलायन्स------------------- 3,012.13 ------------------- 3,29,082.12
सन फार्मा-------------------- 2,539.03 -------------------- 2,08,838.67
एचडीएफसी बँक ------------1,870.26 ----------------- 2,59,928.45
टीसीएस ------------------- 1,369.45------------------- 4,66,203.25
एचयुएल----------------------119.01----------------------- 1,83,745.09

बाजारमूल्य कमी झालेल्या कंपन्या, बाजारमूल्यातील घट व नवे बाजारमूल्य (कोटी रुपये)
कंपनी ------------------- बाजारमूल्यातील घट ---------- नवे बाजारमूल्य
इन्फोसिस ------------------ 6,442.93 ------------------- 2,62,425.93
कोल इंडिया------------------- 3,884.56 --------------------2,01,523.61

14/03/2016

एचसीजी, भारत वायर रोप्सचे आयपीओ बाजारात पुढील आठवड्यात दाखल

हेल्थकेअर ग्लोबल एन्टरप्रायझेस व भारत वायर रोप्स या दोन प्रमुख कंपन्यांची शेअर बाजारात प्राथमिक समभाग विक्री(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) नियोजित आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूकीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी पुढील आठवड्यात पर्वणी आहे. जाणून घ्या दोन्ही कंपन्यांच्या आयपीओविषयी काही महत्त्वाचे मुद्दे

हेल्थकेअर ग्लोबल एन्टरप्रायझेस:-
भारतात कर्करोगावर सर्वात आधुनिक उपचार उपलब्ध करून देणारी सर्वात मोठी संस्था असल्याचा दावा करणारी हेल्थकेअर ग्लोबल 'एचसीजी' नावाने प्रसिद्ध आहे. कंपनी आयपीओद्वारे शेअर बाजारातून सुमारे 650 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची योजना करीत आहे. यावेळी कंपनीतर्फे एकुण 3.10 कोटी शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. त्यापैकी 1.16 कोटी नव्या शेअरची विक्री नियोजित आहे. विद्यमान भागधारक/प्रवर्तकांच्या 1.95 कोटी शेअरची ऑफर फॉर सेलद्वारे विक्री केली जाणार आहे. उद्योजक अझीम प्रेमजींच्या प्रेमजी इन्व्हेस्टची उपकंपनी पीआयओएफदेखील यावेळी कंपनीतील हिस्सेदारीची विक्री करणार आहे. पीआयओएफची हेल्थकेअर ग्लोबसमध्ये 21 टक्के हिस्सेदारी आहे.

'हेल्थकेअर ग्लोबल' नवीन वैद्यकीय उपकरणे, नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या खरेदीसाठी आयपीओतून मिळालेल्या भांडवलाचा वापर करणार आहे. त्याचबरोबर कर्जाची परतफेड आणि इतर दैनंदिन सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी देखील ही रक्कम वापरली जाणार आहे.

आयपीओबाबत ठळक मुद्दे:
आयपीओ विक्रीसाठी खुला होण्याची तारीख: 16 मार्च 2016
आयपीओ विक्रीसाठी बंद होण्याची तारीख: 18 मार्च 2016
किंमतपट्टा: 205 ते 218 रुपये

भारत वायर रोप्स:-
तारांपासून दोरखंड तयार करणारी कंपनी 'भारत वायर रोप्स'ने आयपीओद्वारे 70 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची योजना आखली आहे. आयपीओच्यावेळी पात्र कर्मचाऱ्यांसाठी 3.5 कोटी शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. यातून मिळालेले भांडवल कंपनी महाराष्ट्रातील चाळीसगाव येथे उत्पादन प्रकल्प सुरु करण्यासाठी व इतर जनरल कॉर्पोरेट कारणांसाठी वापरणार आहे.

आयपीओबाबत ठळक मुद्दे:
आयपीओ विक्रीसाठी खुला होण्याची तारीख: 18 मार्च 2016
आयपीओ विक्रीसाठी बंद होण्याची तारीख: 22 मार्च 2016

15/02/2016

माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आता रिझर्व्ह बॅंकही!
भारतातील सर्वोच्च बॅंकेला म्हणजेच रिझर्व्ह बॅंकेलादेखील (आरबीआय) माहिती अधिकाराचा कायदा लागू होतो, असा अत्यंत महत्त्वपूर्ण व दूरगामी परिणाम करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठाने नुकताच आरबीआय वि. जयंतीलाल मिस्त्री (एआयआर-2016, एससी पान क्रमांक 1) या याचिकेच्या निमित्ताने दिला.

आरबीआय आणि बॅंका व वित्तीय संस्था यांच्यामध्ये विश्‍वासाचे नाते असते, म्हणून आरबीआय अशा विविध बॅंका, वित्तीय संस्था यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्यांचे रिपोर्ट, स्टेटमेंट्‌स मागविते व असे रिपोर्ट माहिती अधिकाराखाली उघड करता येणार नाहीत, हा आरबीआयचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने पुढे नमूद केले की, आरबीआयचे काम हे सार्वजनिक हित जोपासणे असून, वैयक्तिक बॅंकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य नाही. त्यामुळे जरी प्रथमदर्शनी आरबीआय व इतर बॅंका यांमध्ये विश्‍वासाचे नाते आहे, असे गृहित धरले तरी कोणत्याही सरकारी किंवा खासगी बॅंका, वित्तीय संस्था यांच्या नफ्यात वाढ कशी होईल, असे बघण्याची कायदेशीर जबाबदारी आरबीआयवर नाही. आपल्या देशातील लोकांचे, तसेच गुंतवणूकदारांचे हित जपणे व देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम आरबीआयचे आहे. त्यामुळे आरबीआयच्या कारभारात पारदर्शकता असलीच पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले. सर्व बॅंका, तसेच वित्तीय संस्था यांना आरबीआयला वेळोवेळी विविध प्रकारची माहिती पुरविणे हे कायद्याने बंधनकारक आहे व त्यामुळे "विश्‍वासाचे नाते' या सबबीखाली कोणत्याही बॅंका, वित्तीय संस्था यांना अडचणीचे वाटेल म्हणून कोणतीही माहिती आरबीआयला दडवून ठेवता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे.

श्री. जयंतीलाल मिस्त्री यांनी आरबीआयकडे माहिती अधिकाराखाली विविध बॅंकांच्या संदर्भातील गैरव्यवहारांची माहिती मागितली होती. परंतु अशी माहिती ही गोपनीय स्वरूपाची असल्यामुळे देता येणार नाही, असा पवित्रा आरबीआयने घेतला. सार्वभौम असलेल्या भारतीय जनतेला जर बॅंकांच्या संदर्भातील गैरव्यवहारांची माहिती उघड केली, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल, हा आरबीआयचा युक्तिवाद बिनबुडाचाच नव्हे, तर मूर्खपणाचाही आहे, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने खरडपट्टी काढली. या निकालामुळे आरबीआयला आता विविध बॅंका, वित्तीय संस्था या संदर्भातील सर्व रिपोर्ट, तपासणी अहवाल आदींची माहिती सामान्य जनतेला देणे बंधनकारक झाले आहे. आता जर सर्व बॅंकांची प्रमुख बॅंक असलेल्या आरबीआयलाच माहिती अधिकार लागू झाला असेल, तर आपोआपच इतर बॅंका, वित्तीय संस्थांनाही तो लागू होईल का, यात दुमत असू शकते.
मात्र, या निर्णयामुळे वित्तीय गैरव्यवहार उघडकीस येतील व भविष्यातील गैरव्यवहारांना पायबंद बसेल, अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.

15/02/2016

Aster DM Healthcare Plans IPO in India
Dubai-based Aster DM Healthcare plans to come out with an initial public offering in India, where it is looking to expand substantially for which it is also scouting for acquisitions.

The company, which operates a total of 15 hospitals, 80 clinics and 200 pharmacies in the Middle East and India, has earmarked an investment of Rs 250 crore in India in 2016 on three hospital projects.

"There is a big opportunity in healthcare in India as there is a huge demand-supply gap. We are looking to expand our operations substantially," Aster DM Healthcare Chairman and Managing Director Azad Moopen told PTI.

He, however, declined to share details of the expansion citing silent period due to the company's upcoming IPO under which it is looking at listing in India this year.

At present, majority stake is held by promoter family of Azad Moopen and over 30 per cent by PE firms. Moopen declined to elaborate on the amount of fund planned to be raised from the public offer.

In India, Aster DM Healthcare currently has three hospitals in Kerala, two in Maharashtra and two in Telangana and is looking at a total of 2,700 beds in India across facilities by 2016.

This year, it will commission a 500-bed hospital in Bengaluru, Aster CMI, besides adding to its large facilities Aster Medcity in Kochi and Aster MIMS in Kozhikode.

Overall, the company is planning a 35 per cent increase in number of beds with addition of 850 beds across Bengaluru (500 beds), the UAE (two hospitals with 250 beds) and Qatar (80 beds).

"We will continue to focus on growth in West and South India. For that we are also open to acquisitions of brownfield projects," Aster DM Healthcare Executive Director and CEO (Hospitals and Clinics, GCC) Alisha Moopen said.

The idea is to acquire standalone facility with 250 beds or above if it is in states where the company is already present or a network of multiple units if it is in a new state, she added.

Address

Hanuman Ghat Bazarpeth Road Koregaon
Koregaon Bhima
415501

Telephone

9665570120

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Financial Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Financial Consultancy:

Share