श्री साईसम्राट सहकारी गृहतारण फायनांस संस्था मर्या., कोल्हापूर

  • Home
  • India
  • Kolhapur
  • श्री साईसम्राट सहकारी गृहतारण फायनांस संस्था मर्या., कोल्हापूर

श्री साईसम्राट सहकारी गृहतारण फायनांस संस्था मर्या., कोल्हापूर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री साईसम्राट सहकारी गृहतारण फायनांस संस्था मर्या., कोल्हापूर, Financial service, 356, B Ward, Mangalwar Peth, Kolhapur.

समर्पित, बहुगुणसंपन्न सर्वांचा आधारस्तंभ : आमदार मा. सतेज उर्फ बंटी डी पाटील - कोल्हापूर. आज आमचे बंधू , शुभचिंतक, विधान...
13/04/2025

समर्पित, बहुगुणसंपन्न सर्वांचा आधारस्तंभ : आमदार मा. सतेज उर्फ बंटी डी पाटील - कोल्हापूर.

आज आमचे बंधू , शुभचिंतक, विधान परिषदचे गट नेते, सन्मानीय आमदार, माजी मंत्री. श्री. सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त कोल्हापूर इथे यशवंत निवासस्थानी भेट घेवून ( नोट बुक ) वहयांनच्या रुपात शुभेच्छा दिल्या. यावेळी दरवर्षी जन्मदिनानिमित्त संकलीत झालेल्या लाखो नोट बुक्स ( वहया ) गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुन्हा पुढे भेट दिल्या जातात.

दरवर्षी आजचा दिवस कोल्हापूर जिल्हयात सतेज साहेबांचे कार्यकर्ते व मित्र परिवार सतेज उत्सव म्हणून सामाजिक हिताचे उपक्रम राबवून साजरा करतात.

त्यांच्या मनमिळाऊ, मदतशील व प्रेरणादायी स्वभावमुळे, त्यांनी सर्वत्र मोठा मित्र परिवार निर्माण केला आहे.

त्यांना पुढील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील योगदानास श्री साईसम्राट इन्स्टिट्यूट व श्री साईजीत एक्सपोर्ट्स परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांना शारीरिक, मानसिक उत्तम स्वास्थ्य लाभावे, हीच प्रार्थना !

१२ एप्रिल.

जय श्री सिता राम .. 🙏

Satej D. Patil
Ruturaj Patil

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे।रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम:।रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्य...
06/04/2025

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम:।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥

सत्यात 'राम'
न्यायात 'राम'
शांतीत 'राम'
अहिंसेत 'राम'
करुणेत 'राम'
समतेत 'राम'
एकतेत 'राम'
बंधुतेत 'राम'

एक वाणी, एक वचनी, सर्वांचे प्रभू श्री रामचंद्राना कोटी-कोटी वंदन. सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.

सदैव वंदनीय प्रभू श्री रामचंद्रानी जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी दुष्ट प्रवृत्तींना यमसदनी धाडलं. लोक गुण्यागोविंदानं, मिळून मिसळून आनंदानं राहतील, असा संसार निर्माण केला.
कायमच प्रजेचा प्रथम विचार करीत कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित केला.

चला, प्रभू श्रीरामांच्या आदर्शवत विचारांवर चालू या, एकमेकांसोबत आपुलकीनं, आत्मीयतेनं, बंधूभावानं राहू या आणि तसं वागू या.

जय सिता राम ❤️

रामजन्म सर्वांसाठी आनंदाचा प्रसंग.राजघराण्यात आनंद झाला कारण गादीला वारस मिळाला. रामजन्माचा आनंद चैत्र शुद्ध नवमीला आजही लोक अगदी उत्साहात साजरा करतात. श्री राम यांच्या आचार, विचार, तत्त्वज्ञान, परंपरा, एकोपा, ममता पुढे घेऊन जात असताना त्यांच्या चरणकमलांशी सदैव नतमस्तक राहू या !

#रामनवमी #रामनवमी2025

# Sri Saisamrat Institute Of Hotel Management and Chef Arts. ( 100 % Global Career )
# Sri Saijeet Exports.

हे राम .. 🙏

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस व...
06/12/2023

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.. 🪔🪔

पौराणिक महत्त्व असलेल्या आणि कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिवाळी पाडव्याच्...
14/11/2023

पौराणिक महत्त्व असलेल्या आणि कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिवाळी पाडव्याच्या आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मंगलमय शुभेच्छा ! 🪔🪔🪔🪔

# Lord Gautam Buddha .. ❤️

# Sri Saisamrat Institute.
# Sri Saijeet Exports.

देशातील आघाडीचे दैनिक नवभारत टाइम्स ग्रुप कडून दरवर्षी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार २०२३ शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात क...
14/09/2023

देशातील आघाडीचे दैनिक नवभारत टाइम्स ग्रुप कडून दरवर्षी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार २०२३ शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कायम अग्रेसर असणाऱ्या साईसम्राट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड शेफ आर्ट्सच्या अध्यक्षा, उद्योजिका श्रीमती सुलोचना (माई) विजयसिंह पाटील यांना सौ.तृप्ती धोडमिसे (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते व आमदार श्रीमती सुमनताई पाटील, सौ.तारा भवाळकर ज्येष्ठ साहित्यिका, मा.राजेश वरळेकर व्यवस्थापक नवराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.. यावेळी सौ.साईली धैर्यशील पाटील व संस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

खूप खूप शुभेच्छा माई....🌹🌹

शुभेच्छुक .. धैर्यशील विजयसिंह पाटील मित्र परिवार तांबवे- इस्लामपूर

श्री साईसम्राट इन्स्टिट्यूट
श्री साईजीत एक्सपोर्टस्

हरे कृष्णा..

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे  : वीर बाजीप्रभू देशपांडेवीर बाजी प्रभु देशपांडे, वीर फुलाजी देशपांडे...
13/07/2023

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे : वीर बाजीप्रभू देशपांडे

वीर बाजी प्रभु देशपांडे, वीर फुलाजी देशपांडे व वीर शिवा काशीद यांच्या 363 व्या (13जुलै) स्मृतिदिना निमित्त पन्हाळागड येथे साईसम्राट परिवारा तर्फे विनम्र अभिवादन केले .. 🌹

जगातील दऱ्याखोऱ्यांमध्ये (war in the valley) ज्या लढाया झाल्या त्यातील 300 मराठा मावळ्यांनी 5000 विजापुरी मोगल सैन्यांना थोपवून विजय मिळवलेली ही घोडखिंडीतील लढाई जगातील दोन नंबरची निखराची लढाई म्हणून इतिहासात नोंदविली गेली .

आपल्या जीवनात आपल्या ध्येयापेक्षा आपली कामगिरी व आपले प्रयत्न मोठे पाहिजेत ही शिकवण घोडखिंडी मधील महाप्रतापी वीर बाजीप्रभू देशपांडे ची लढाई शिकवून गेली..

# Sri Saisamrat Institute
# Sri Saijeet Exports

Jai Sri Krishna ❤️

*  #  आम्ही वारकरी*           आजच्या देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व श्री कृष्ण-विठ्ठल भक्तांना मंगलमय शुभेच्छा...(२९ जून)...
29/06/2023

* # आम्ही वारकरी*

आजच्या देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व श्री कृष्ण-विठ्ठल भक्तांना मंगलमय शुभेच्छा...(२९ जून)

आपले जीवनही एक वारीच आहे. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात ही वारी फिरत असते. जो जगताना परमार्थिक, सात्विक जगतो त्याचे जीवन सफल होते. ज्याला जीवनाचा अर्थ कळतो तो यशस्वी होतो. याउलट जो जगताना कृतघ्न, वरपांगी जगतो त्याचे जीवन असफल होते.त्याला जीवनचा अर्थ कळत नाही तो अयशस्वी होतो. जीवनात प्रत्येकाचा हरी ज्याच्या त्याच्याजवळ असतो.

आपल्यालाही जीवनाची वारी व्हावी असे वाटत असेल तर आपण ध्येयरसात तल्लीन होऊन, संकल्पनाचा अभंग घेऊन, सातत्य ठेवल्यास अपेक्षित लक्ष गाठता येते. वारी म्हणजे काय तर सतत चालत राहणे. येणारे अडथळे, खाचखळगे पार करणे व दुसऱ्यालाही सोबत घेऊन चालत राहणे !! आपल्या सहकाऱ्याला सोबत घेऊन धक्काबुक्की न करता, रांग न तोडता, शांतपणे दैवताचे चरणाप्रत पोहचणे, हेच तत्व वारकरी पाळत असतो. मनुष्याने वसुधैव कुटुंबकम हे तत्व अंगिकरल्यास वैश्विक संघर्ष टाळता येईल ..

दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होऊन आपले योगदान समाजातील वंचित घटकांच्या उद्धारासाठी देणे हाच भाव संतांचा आहे ; हेच पसायदान माऊलींनी मागितले आहे..

चलातर, माऊली... आपणही सत्यसंकल्पाचे वारकरी होऊन आपल्याही जीवनाची वारी सफल करूयात.....

जय हरी विठ्ठल,राम कृष्ण हरी..!

आपल्या जीवनात शांतता, आनंद ,एकोपा, विवेक व एकाग्रता प्रस्थापित होवो हीच प्रभू श्रीकृष्ण चरणी प्रार्थना... 🙏

शुभेच्छुक :-
धैर्यशील विजयसिंह पाटील मित्र परिवार तांबवे इस्लामपूर..

#श्री साईसम्राट इन्स्टिट्यूट
#श्री साईजीत एक्सपोर्ट्स

हरे कृष्णा.. ❤️

विश्वातील महान राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून जागतिक कीर्तीचे शासन निर्माण केले. छत्रपतींनी राज्याभिषेक...
08/06/2023

विश्वातील महान राजे

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून जागतिक कीर्तीचे शासन निर्माण केले. छत्रपतींनी राज्याभिषेकद्वारे घटनात्मक शासनव्यवस्थेची निर्मिती करून स्वराज्याला विश्वरूपी दर्जा प्राप्त करून दिला. किल्ले रायगडवरील ६ जून १६७४ रोजी साजरा करण्यात आलेला शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे स्वराज्याची मंगल पहाट होय. आपण शिवचरित्राचा अभ्यास करत राहू ...

३५० व्या शिवराज्याभिषेकाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹

शुभेच्छुक

धैर्यशील विजयसिंह पाटील मित्र परिवार तांबवे-इस्लामपूर..

श्री साईसम्राट इन्स्टिट्यूट
श्री साईजीत एक्सपोर्टस्

हरे कृष्णा...

14/04/2023

आज महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंती दिनानिमित्त श्री साईसम्राट इन्स्टिट्यूट, श्री साईजीत एक्स्पोर्टस व विविध उद्योगांच्या वतीने अभिवादन केले.. 🌹🌹

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या शिकवणीमुळे समाजामध्ये शिक्षण विकास व संतुलन निर्माण झाले.

शुभेच्छुक
श्री साईसम्राट इन्स्टिट्यूट
श्री साईजीत एक्सपोर्ट्स

हरे कृष्णा.. 😊

श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा.श्रीराम जन्मोत्सवाच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा..शुभेच्छुक # श्री साईसम्राट इन्स्टिट्यू...
08/04/2023

श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा.
श्रीराम जन्मोत्सवाच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा..

शुभेच्छुक

# श्री साईसम्राट इन्स्टिट्यूट ..
# श्री साईजीत एक्स्पोर्टस ..

हरे कृष्णा ! 😊

भारतातील स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभ...
10/03/2023

भारतातील स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन ! 🌹🌹

अनेकांचे आधारवड, आदरणीय आ. जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जयंत करिअर महोत्सवात हजारो विद्यार्थ्यांना, त...
21/02/2023

अनेकांचे आधारवड, आदरणीय आ. जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जयंत करिअर महोत्सवात हजारो विद्यार्थ्यांना, तरुणांना इस्लामपूर - बावची येथे साईसम्राट इन्स्टिट्यूट, साईसम्राट अर्बन बँकींग, साईसम्राट फार्मस कंपनी, साईजीत एक्सपोर्टसचे विश्वस्त, शेफ मा. सम्राटसिंह विजयसिंह पाटील यांनी उद्योजकीय मुलाखत देवुन हजारो तरुणांना प्रेरित व लक्ष्याप्रती तसेच जीवनमूल्यांविषयी उत्साहीत केले !! 🥰

हरे कृष्णा..!! 🌹🌹
Saisamrat Institute (A Global Career)
email : [email protected]

Address

356, B Ward, Mangalwar Peth
Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री साईसम्राट सहकारी गृहतारण फायनांस संस्था मर्या., कोल्हापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share