Kolhapur District Central Co-op Bank Ltd. Kolhapur

Kolhapur District Central Co-op Bank  Ltd. Kolhapur " सहकारमुलं खलुसर्वजीवनम्. "
Estb1-10-1938
Reserved Bank

महाराsssssजगडपतीगजअश्वपतीभूपतीप्रजापतीसुवर्णरत्नश्रीपतीअष्टवधानजागृतअष्टप्रधानवेष्टितन्यायालंकारमंडितशस्त्रास्त्रशास्त्र...
19/02/2025

महाराsssssज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माध्यमातून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन अदा होणार
23/01/2025

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माध्यमातून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन अदा होणार

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर नुतन  इमारत उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक 9 ऑक्टोंबर 2024 प्रधान क...
09/10/2024

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर नुतन इमारत उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक 9 ऑक्टोंबर 2024 प्रधान कार्यालय शाहूपुरी कोल्हापूर सायंकाळी चार वाजता सुरू होणारा कार्यक्रमाची लिंक सोबत जॉईन व्हा

https://youtube.com/live/zShmOxBxQv0?feature=share

30/06/2024

*केडीसीसीची पीककर्ज वसुली ९० टक्के*

*जिल्ह्याच्या एकूण पतपुरवठ्यात ८० टक्के वाटा केडीसीसीचा*

*कोल्हापूर, दि. ३०:*
केडीसीसी बँकेने पिककर्ज वसुलीची परंपरा कायम राखली आहे. ३० जून २०२४ अखेर पीककर्ज वसुली ९० टक्क्यांवर आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण पतपुरवठ्यामध्ये ८० टक्के वाटा एकट्या केडीसीसी बँकेचा आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील एकूण १९०६ विकास संस्थांच्या माध्यमातून दोन लाख, ५३ हजार शेतकऱ्यांना गेल्यावर्षी म्हणजेच सन २०२३-२४ या पीक हंगामामध्ये ३० जून २०२४ अखेर २५३७ कोटी वसूलपात्र पीककर्ज रकमेपोटी एकूण २२८३ कोटी पीककर्ज वसूल झाले.

याबाबत माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे म्हणाले, गेल्या वर्षीपेक्षा पीक कर्ज वसुलीमध्ये वाढ झाली आहे. ही पीककर्ज वसुली ९५ टक्क्यांपर्यंत झाली असती. दरम्यान; गडहिंग्लज आणि हातकणंगले हे दोन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले. तसेच; जिल्ह्यामध्ये अपात्र कर्जमाफीमधील संस्था यामुळे ही वसुलीची टक्केवारी कमी झाली.

असे असूनदेखील शेतकरी, विकास सेवा संस्थाचे पदाधिकारी, सचिव, साखर कारखाने, सर्व बाजार समित्या यांनी बँकेला वसुलीसाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच; बँकेच्या संचालक मंडळांनेही मे व जूनमध्ये आपापल्या तालुक्यातील सेवा संस्थांच्या आढावा सभा घेऊन वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यामुळे या पिक हंगामातसुद्धा बँकेची चांगल्या वसुलीची परंपरा कायम राहिली.
त्यामुळे; महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसनसाहेब मुश्रीफ यांनी शेतकरी, विकास सेवा संस्थाचे पदाधिकारी, सचिव, साखर कारखाने, सर्व बाजार समित्या, बँकेचे कर्मचारी व अधिकारी, संचालक मंडळ सदस्य यांचे आभार व्यक्त केले.
===========

भावपूर्ण श्रद्धांजली
23/05/2024

भावपूर्ण श्रद्धांजली

09/04/2024

आज 9 एप्रिल 2024 शुभ मुहूर्त चैत्र गुढी पाडवा
सकाळी 10:30 ते 1:00 वाजेपर्यंत रोख रक्कम स्वरूपातील ठेवी स्वीकारण्यासाठी जिल्हा बँकेच्या सर्व शाखा सुरू राहतील

उज्वल यशाचे भागीदार सर्व सहकारी संस्था, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, ग्राहक, कर्मचारी यांच्या पुढाकाराने धवल यश प्राप्त झाल...
02/04/2024

उज्वल यशाचे भागीदार सर्व सहकारी संस्था, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, ग्राहक, कर्मचारी यांच्या पुढाकाराने धवल यश प्राप्त झाले. बँकेवर दृढ विश्वास आहेच तो वृध्दींगत जाहला.
कोल्हापूर जिल्ह्याचा मान सन्मान अभिमान कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याची अर्थ वाहिनी ,अर्थ माऊली, श्री महालक्ष्मी केडीसीसी बँके जिल्हाचा मान बिंदु...
86 वर्षाचा जाज्वल्य सहकाराचा इतिहास, शतका कडे दमदार वाटचाल... || सहकारमुलं खलू सर्वजीवन्मं ||

20/08/2023
*केडीसीसी बँकेचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून सन्मानचिन्ह देऊन गौरव......*                 महामं...
04/03/2023

*केडीसीसी बँकेचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून सन्मानचिन्ह देऊन गौरव......*

महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते गौरव.......

मराठा समाजाच्या १,२७८ जणांना रोजगार, उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी ११९ कोटींचा वित्तपुरवठा

कोल्हापूर, दि. ४:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत मराठा समाजाच्या हजारो तरुणांना रोजगार, उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी कर्ज पुरवठा केला आहे. बँकेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते बँकेला सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराराणी सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत बँकेचा हा सन्मान करण्यात आला. बँकेच्यावतीने व्यक्तिगत कर्ज विभागाचे व्यवस्थापक एस. के. बावधनकर व रघुनाथ जांभळे या अधिकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला.

याबाबत अधिक माहिती अशी, बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या पाठबळाने बँक यशोशिखरावर पोहोचलेली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाअखेरपर्य॓त केडीसीसी बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत एकूण १,२७८ जणांना ११९ कोटींचा वित्तपुरवठा केलेला आहे. जिल्ह्यातील इतर बँकांच्या तुलनेत जिल्हा बँक ही सबंध कोल्हापूर जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शासकीय योजना राबविण्यामध्ये नेहमीच आघाडीवर असते. बँकेला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद अशा विविध योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. बँकेने चालू पीक हंगामात फेब्रुवारी २०२३ या महिना अखेरपर्यंत एकूण १,६०० कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केलेला आहे. त्यामध्ये खरीप हंगामासाठीचे उद्दिष्ट इष्टांकापेक्षा ११५ टक्के जास्त आहे. या पद्धतीने शेतीसह ग्रामीण भागाशी निगडित सर्वच कर्जपुरवठ्यांमध्ये इष्टांकांची पूर्तता नेहमीच इतर बँकांपेक्षा जास्त करून या बँकेने जिल्ह्याला सबंध राज्यामध्ये अग्रेसर ठेवले आहे. तसेच, केंद्र सरकारच्या आयकर खात्याकडून कोल्हापूर विभागातील नॉन कॉर्पोरेट विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना बँकेमार्फत अनेक सेवा सुविधा दिल्या जातात. या सभासद संस्थांना दहा टक्के लाभांश दिला जातो. बँक लवकरच ९,००० कोटी रुपये ठेवींचे उद्दिष्ट व २०० कोटी रुपये नफ्याचे उद्दिष्ट साध्य करणार आहे.................

*कोल्हापूर: केडीसीसी बँकेने अण्णासाहेब पाटील महामंडळांतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते बँकेला सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.*
===================

ध्येयपूर्ती पुनर्गुंतवणूक ठेव योजना इफेक्ट व्याजदर 8.26% किमान गुंतवणूक रुपये 10,000/- पुढे 1000/-च्या पटीत्तयोजनेच्या क...
03/03/2023

ध्येयपूर्ती पुनर्गुंतवणूक ठेव योजना
इफेक्ट व्याजदर 8.26%
किमान गुंतवणूक
रुपये 10,000/- पुढे 1000/-च्या पटीत्त
योजनेच्या कालावधी 31 मार्च 2023 पर्यंत
वाढिव व्याजदराचा लाभ घ्या

केडीसीसी बँकेत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदानाचे वाटप....          महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०...
20/10/2022

केडीसीसी बँकेत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदानाचे वाटप....

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०१९

पहिल्या टप्प्यात एक लाख, १३ हजार शेतकऱ्यांना मिळाले ४०९ कोटी प्रोत्साहनपर लाभ अनुदान....

कोल्हापूर, दि.२०:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा बँकेशी सलग्न असलेल्या एकूण तीन लाख, एक हजार, २८० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात एक लाख, १३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर ४०९ कोटी प्रोत्साहनपर लाभ अनुदान जमा झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, याआधीच्या महाविकास आघाडी सरकारने थकीत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ आणली होती. यामध्ये जिल्हा बँकेशी संलग्न एकूण ३१,१३८ शेतकऱ्यांना १५७ कोटी रुपये कर्जमुक्ती मिळाली होती. त्याचवेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नियमितपणे कर्जफेड करणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान देण्याचे घोषित केले होते. दरम्यान; कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे ते देता आले नव्हते.

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्यावतीने शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर लाभ अनुदान जाहीर केले होते. अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्पीय भाषण करताना अजितदादा पवार यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच एक जुलै २०२२ रोजी कृषी दिनाच्या औचित्यावर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणा करून तेवढ्या रक्कमेची पुरवणी मागणीही मंजूर करून घेतली होती. दरम्यान; ३० जून २०२२ रोजी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यामुळे हे अनुदान देता आले नव्हते. त्याच पुरवणी मागणीचे पैसे आता या शासनाकडून दिले जात आहेत.

संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार येऊन चार महिने झाले आहेत. हे अनुदान आज वाटप होत असल्याबद्दल या सरकारचे स्वागतच आहे. आलेले हे अनुदान ५० टक्केच शेतकऱ्यांना दिले आहे. उर्वरित ५० टक्के शेतकऱ्यांनाही तात्काळ अनुदान मिळाल्याशिवाय त्यांचीही दिवाळी गोड होणार नाही. त्यामुळे, त्यांच्या खात्यावरही दिवाळीपूर्वी तात्काळ पैसे जमा व्हावेत, ही नम्र विनंती.

यावेळी बँकेचे संचालक आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, सौ. श्रुतिका काटकर आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली...............

कोल्हापूर- केडीसीसी बँकेच्या केंद्र कार्यालयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करताना आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, संचालक व अधिकारी.
==========

Address

Bus Route
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 10:30am - 5:30pm
Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 10:30am - 5:30pm
Saturday 10:30am - 5:30pm

Telephone

02312531641

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapur District Central Co-op Bank Ltd. Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kolhapur District Central Co-op Bank Ltd. Kolhapur:

Share