26/08/2026
*आज (२६ ऑगस्ट) 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' / पैगंबर जयंती*
रबिउल अव्वलच्या महिन्यात मिलादुन्नबीच्या दिवशी इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला. त्यामुळे पैगंबर यांची जयंती ‘ईद-ए-मिलाद’ म्हणून सणाप्रमाणे साजरी केली जाते. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामचे प्रवर्तक म्हणून त्यांनी जगाला शांती, प्रेम, समानता, दया आणि बंधुत्वाचा संदेश दिला.
पैगंबरांच्या शिकवणीचे स्मरण करून ते जीवनात उतरवणे आणि समाजाला योग्य दिशा देणे, एकता टिकवणे आणि गरजूंची मदत करणे या उद्देशाने हा दिवस उत्साहात, आनंदात संपूर्ण जगात साजरा केला जातो. या दिवशी मुस्लीम बांधव मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करतात, कुराण पठण करतात, पैगंबरांच्या जीवनावरील प्रवचनं ऐकतात, मिरवणुका काढतात. घर व मशिदींची सजावट करतात. दानधर्म करून शांतीचा संदेश देत हा सण भक्तिभावाने साजरा केला जातो.
मुस्लीम बांधवांना ‘ईद-ए-मिलाद’निमित्त शुभेच्छा आणि हजरत पैगंबरांना विनम्र अभिवादन...
' िलाद #ईदच्या_शुभेच्छा