Krishna Urban Co-Operative Bank Ltd Kaij

Krishna Urban Co-Operative Bank Ltd Kaij Bank

13/01/2025
दि. महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँकस् असोसिएशन, मुंबई तर्फे उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक म्हणून दिला जाणारा पद्मभुषण कै. ...
22/12/2024

दि. महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँकस् असोसिएशन, मुंबई तर्फे उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक म्हणून दिला जाणारा पद्मभुषण कै. वसंत दादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार वितरण करत असतांना मा. सुनिलजी प्रभु व मा. विश्वासजी ठाकुर अध्यक्ष, एम.एस.सी. बँक्स् असो. यांच्या हस्ते स्विकारतांना बँकेचे चेअरमन विजयकांत (भैय्या) मुंडे, व्हा. चेअरमन चंद्रकांत कुलकर्णी, संचालक तुळशीराम तोंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुदेव मुंडे, बालाप्रसादजी भुतडा, बालासाहेब कापरे व इतर मान्यवर..
सन 1997 मध्ये स्थापन झालेल्या आपल्या बँकेने रौप्य महोत्सव साजरा करत सभासदांच्या दैनंदिन आर्थिक गरजा प्राधान्याने भागवल्या आहेत. ग्रामीण भागातील गरजू लोकांना आणि शेतकरी बांधवांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देत सहकार क्षेत्रात अनोखा आदर्श निर्माण केला आहे, त्याचबरोबर बँकेच्या वतीने गंभीर आजारी असणार्या बँकेच्या सभासदांना आर्थिक मदत देण्यात येते. बँकेच्या कार्यक्षेत्रातील गरीब आणि गरजू सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी बँक आर्थिक मदत करत सामाजिक क्षेत्रातही आपण करत असलेले काम उल्लेखनीय आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करून यशस्वी विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात येतो. अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्य करून कलावंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप आपण देत असता. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल गौरविले जाते. बँकेच्या वतीने बचत गटांचे मेळावे घेऊन बँक खाते सुरू करणे, बचत गटांच्या व्यवसाय वाढीसाठी कर्ज देणे अशा प्रकारचे मार्गदर्शन केले जाते. परिसरातील बेरोजगार युवक-युवती यांना व्यवसायातील नवीन संधी याबाबत मेळाव्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येते. बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने बँकेच्या सभासदांना ठेवींवर व्याजदर वाढविण्यात आला आणि कर्जावरील व्याज कमी करण्यात आल्याने बँकेचे सभासद, ठेवीदार आणि हितचिंतक यांनी समाधान व्यक्त केले. बँकेला सन 2020, 2021 आणि 2022 अशी सलग तीन वर्षेबँको ब्ल्यू रिबन पुरस्कार मिळाले आहेत.

Address

Kanadi Road
Kaij

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishna Urban Co-Operative Bank Ltd Kaij posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krishna Urban Co-Operative Bank Ltd Kaij:

Share

Category