कागल तालुका पत संस्था फेडरेशन संघ कागल

  • Home
  • India
  • Kagal
  • कागल तालुका पत संस्था फेडरेशन संघ कागल

कागल तालुका पत संस्था फेडरेशन संघ कागल it's federation of all cooperative patsanstha in kagal taluka

सहकार मंत्र्यांना दिले निवेदन
06/03/2025

सहकार मंत्र्यांना दिले निवेदन

राज्य शासनाच्या जाचक अटी विरोधात तालुक्यातील पतसंस्थांचा उस्फूर्तपणे बंदकागल तालुका पतसंस्था फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सह...
03/02/2025

राज्य शासनाच्या जाचक अटी विरोधात तालुक्यातील पतसंस्थांचा उस्फूर्तपणे बंद

कागल तालुका पतसंस्था फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निबंधक यांना निवेदन

कागल : स्थिरीकरण व तरलेता सहाय्य निधी (अंशदान) या निधीस संघाच्या सभासद असलेल्या सहकारी पतसंस्थांचा विरोध, ठेव विमा संरक्षण देणे, पालक अधिकारी यांच्या नेमणुकीस विरोध, लेखापरिक्षण अहवाला बाबत आपल्या कार्यालयाकडुन विचारणा होत असते ते तात्काळ थांबविण्यात यावी, मल्टीस्टेट पतसंस्थाच्या व्याजदरा संदर्भात चर्चा या विविध विषयाबाबत कागल तालुका पतसंस्था फेडरेशनच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांकडून सहकारी संस्था कागल सहाय्यक निबंधक समीर जांभोटकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सम्राट सणगर, बाळासो ढवण, चंद्रकांत गवळी, बिपिन माने, राजेंद्र मगर, अनिल सणगर, विजय पाटील, सुनील कांबळे, शिवाजी पाटील, अण्णासो मगदूम, सुदर्शन हुंडेकर, संजय मगदूम, सुरेश कांबळे आदीसह तालुक्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच राज्य शासनाच्या जाचक अटी विरोधात कागल तालुक्यातील पतसंस्थांनी आज दि.३१ जानेवारी रोजी उस्फूर्तपणे बंद पाळला.

निवेदनानुसार, वरील विषयांसदर्भात यापुर्वी कागल तालुका पतसंस्था फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सर्व पतसंस्था यांनी दि. २७ जानेवारी २०२० व त्यानंतर सुध्दा अंशदान न देणे तसेच नव्याने उपस्थित झालेले विषयांना विरोध दर्शविलेला आहे. तसेच स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी या बाबत या निधीच्या वापराबाबत कोणतीही स्पष्टता होत नाही. त्यामुळे या स्थिरीकरण व तरलेता सहाय्य निधी (अंशदान) या निधीस संघाच्या सभासद असलेल्या सहकारी पतसंस्थांनी विरोधच दर्शविलेला आहे. त्याचप्रमाणे संस्थेच्या सभासद ठेवींना रू.५ लाख पर्यंतच्या ठेवींना नागरी सहकारी बँका शेड्यूल्ड बँकाप्रमाणे ठेव विमा महामंडळाप्रमाणे विमा संरक्षण मिळावे.

सध्या पतसंस्थांचे कामकाज सहकार विभागाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे अतिशय चांगल्या पध्दतीने सुरू आहे. पालक अधिकारी यांच्या कामकाजाच्या कार्यकक्षा शासनाने संस्थांच्या पर्यंत पोहाचविलेल्या नाहीत. त्यामुळे पालक अधिकारी यांच्या नेमणुकीस पतसंस्थांचा विरोध आहे.

संस्थांचे लेखापरीक्षण ३१.०३.२०२४ पर्यंत पूर्ण झालेले असुन सदरचे लेखापरिक्षण अहवाल हे विशेष लेखापरिक्षक यांच्या कार्यालयाकडे दाखल केलेले असुन याची एक प्रत आपल्या कार्यालायाकडे परंपरेने येत आहे. तरी सुध्दा लेखापरिक्षण अहवाला बाबत आपल्या कार्यालयाकडुन विचारणा होत असते ते तात्काळ थांबविण्यात यावी.

नागरी बिगरशेती पतसंस्थांच्या व्याजदरां बाबत शासन मर्यादीत व्याजदरा बाबत आग्रही आहे. याबाबत पतसंस्थांनी सकारात्मक विचार केलेला आहे. परंतु नागरी पतसंस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये मल्टीस्टेट पतसंस्था आपला व्यवसाय करीत असल्याने त्यांनी ठेवीदारांसाठी दिलेले व्याजदर हे नागरी बिगरशेती पतसंस्थांच्या व्यवसायासाठी मारक ठरत आहेत. तरी याबाबत सहकार विभाग व आपल्या वतीने ही बाब शासनाच्या निर्दशनास आणुन दयावी. तसेच तालुक्यात अशा संस्थांची शाखा उघडते वेळी त्या त्या गावातील संस्थांच्या कडून नाहरकत पत्र घेणे बाबत शासनाला सुचित करणेत यावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करणेत आले.

राज्य शासनाच्या जाचक अटी विरोधात आज दि.३१ जानेवारी रोजी तालुक्यातील पतसंस्थांनी उस्फूर्तपणे बंद पाळला.

06/10/2023
कागल तालुका पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा खेळीमेळीतकागल : येथील कागल तालुका पतसंस्थांचा सहकारी संघ फेडरेशनची वार्षिक सर...
01/10/2023

कागल तालुका पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा खेळीमेळीत
कागल : येथील कागल तालुका पतसंस्थांचा सहकारी संघ फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सम्राट सणगर होते.
सभेच्या सुरवातीस फेडरेशनचे संस्थापक कै. दिलीपराव सणगर व अहवाल सालात दिवंगत सभासद आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक करताना अध्यक्ष सम्राट सणगर म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात पतसंस्था सभासद संख्या वाढली आहे त्यामुळे वार्षिक वर्गणीत वाढ झाली आहे. आर्थिक वर्षात संघास ४० हजार रुपये नफा झाला आहे. तसेच सभासदांना सहकार कायद्याची पुस्तके देण्यसाठी १० हजार रुपयेंची तरतूद करण्यात आली आहे. तालुक्यातील पतसंस्थांच्या अडीअडचणी समस्या शासन स्तरावर मांडण्यात फेडरेशन यशस्वी झाले आहे. तसेच पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचारी यांना नवनवीन सहकार कायदे, नियम, शासकीय परिपत्रके यांचे ज्ञान व्हावे या उद्देशाने दरवर्षी फेडरेशन सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करत असते याचा लाभ तालुक्यातील पतसंस्थानी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अहवाल वाचन कार्यकारी अधिकारी प्रियदर्शन पाटील यांनी केले.
याप्रसंगी उपाध्यक्ष बाळासो ढवण, संचालक चंद्रकांत गवळी, तानाजी पाटील, पांडुरंग पांढरे, आण्णासो थोरवत, महेश मगदूम, प्रकाश पाटील, शंकर भराडे, व्यवस्थापक मारुती शेंडे, प्र. कार्यकारी अधिकारी अमन सयद आदींसह तालुक्यातील विविध पतसंस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कागल तालुका पतसंस्थाचा सहकारी संघ ली कागल ची २० वी सर्वसाधारण सभा संपन्न यावेळी मी, श्रीनाथ समूहाचे अध्यक्ष चंद्रकांत गव...
28/09/2022

कागल तालुका पतसंस्थाचा सहकारी संघ ली कागल ची २० वी सर्वसाधारण सभा संपन्न यावेळी मी, श्रीनाथ समूहाचे अध्यक्ष चंद्रकांत गवळी, दुधगंगा पतसंस्था मौ सांगाव चे जेष्ठ संचालक पांडुरंग पांढरे, श्रीमंत जयसिंगराव पतसंस्था सिद्धनेर्ली चे सचिव तानाजी पाटील, व्हा चेअरमन बाळासो ढवण(कुरुकली), रामभाऊ गोते(आनुर), शंकर भराडे(करंजीवणे) व सभासद आदी उपस्थित

01/09/2021

बदलते बँकिंग

18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
30/03/2021

18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Address

Bazar Peth
Kagal
416216

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 3pm

Telephone

+912325243788

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कागल तालुका पत संस्था फेडरेशन संघ कागल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share