16/09/2019
प्रॉपर्टी खरेदी करताय सावधान या गोष्टी माहित आहेत का....👉👉👉
आपल्यापैकी बरेच लोक प्रॉपर्टी खरेदी करत असतात.कोण घरासाठी जागा बघते, कोण व्यवसायासाठी तर कोणी इन्व्हेस्टमेंट म्हणून,पण बऱ्यापैकी लोक प्रथमच प्रॉपर्टी व जमीन खरेदी करत असतात. हे सगळं करत असताना ज्यांना याबद्दल माहिती नाही असे लोक कोणी संबंधित व्यक्ती मार्फत किंवा एखाद्या एजंटांमार्फत ती प्रॉपर्टी पाहत असतो व पसंत असल्यास खरेदी करत असतो. पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ही तुम्हाला जर बदलत्या नियम व सरकारी कायदे यांची माहिती नसेल, आणि जी व्यक्ती तुम्हाला यात मदत करत असेल, त्यालाही या नियमाबद्दल किंवा नवीन झालेल्या सरकारी कायद्याबद्दल माहिती नसेल तर मात्र खरेदी केलेली प्रॉपर्टी बऱ्याच वेळेस डोकेदुखी बनून राहते. एक तर यात आपले बऱ्यापैकी पैसे भांडवल अडकलेले असते. या मध्ये जर तुम्ही ब्रोकर मार्फत तुमचा व्यव्हार करताय त्यालाच हे नवीन कायदे माहीत नसले किंवा माहीत असून ही ब्रोकर हा व्यव्हार मोडायला नको म्हणून बर्याचवेळा तुम्हाला मुद्दामहून ही गोष्ट सांगायचे टाळतो.
याचा अर्थ असा नाही की सगळे एजंट असे करतात, पण हा एक फँक्ट आहे.
मला ही माहीती लिहाविशी वाटली .....कारण पाठीमागील काही दिवसात अशी काही प्रकरणे माझ्याकडे आली ......ज्यामधे फसवणूक म्हणता येणार नाही पण ....प्राँपर्टी देणार आणि घेणार यांच्या अज्ञाना मुळे हे वाद निर्माण झाले. काही व्यव्हार ब्रोकर मार्फत झालेत.....पण ब्रोकर अशिक्षित असल्याने तो पण नवीन सरकारी नियमा विषयी अज्ञानी.....याचे पर्यावसन वादात भांडणात झाले....
एक छोटासा किस्सा सांगतो....झाले होते असे ....माझे एक व्यापारी मित्र त्यांनी काही दिवसा पूर्वी एक 16 गुंठे शेत जमीन महामार्गालगत खरेदी केली होती बाजार भावा नुसार 68 लाख रुपया मधे. ती जमीन त्यांना बिनशेती कमर्शीयल करून पाहीजे होती. मी पेपर पाहीले,,,,, त्यातील जमीनीचे मोजमाप पाहीले....आणि त्यांना स्पस्ट सांगितले ही जमिन बिनशेती होऊ शकत नाही....त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले , मी त्यावर काही ऊपाय सांगितले पण त्या पध्दतीत पण ती जमीन बसत नव्हती. आता मात्र माझ्या व्यापारी मित्रांला घाम फुटू लागला त्याचा चेहरा केविलवाणा झाला. मला हे बघून वाईट वाटले पण मी तरी काय करणार सरकारी नियम तर बदलू शकत नाही. मग त्यांनी ज्याच्याकडून जमीन खरेदी केली त्यांना माझ्या आँफीसला बोलावले आणि जमिन बिनशेती होत नाही ..तुम्ही अजून दुसर्याकडे माहीती घ्या ....आणि हा व्यव्हार आपण कँन्सल करूया अशी विनंती केली . त्या मालकाने तुम्ही खरेदीपुर्वी हे सगळे बघून घ्यायला पाहीजे म्हणत कानावर हात ठेवले. नंतर याचे पर्यावसन मोठ्या वादात झाले.....असो हे फक्त एक उदाहरण दिले.
या गोष्टी टाळावयाच्या असतील तर प्राँपर्टी घेताना पडताळून पहा....
प्रत्येक प्राँपर्टी साठीचे सरकारी नियम आणि कायदे वेगळे असतात.... मग घरासाठी वेगळे , शेती साठी वेगळे ,फ्लँट साठी वेगळे....जिल्हा मार्ग, राज्य मार्ग, राष्ट्रिय महा मार्ग.....प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम आणि कायदे. हे सगळी माहीती मी तुम्हाला अशी लिहून देणे अशक्य आहे. आणि व्यवस्थित समजणार पण नाही.
अधिक माहीतीसाठी मला काँल करा किंवा भेटू शकता. सल्ला मोफत आहे.
आँफिस पत्ता : 411/8 ,भागिर्थि निवास, मार्केटयार्ड ,शनिवार पेठ, कराड.
शेती उतपन्न बाजार समिती समोर.
फोन : 8275481666
7020136318
धनंजय पवार...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏