Deepak BHAT

Deepak BHAT I am an insurance agent. I have all insurance plans from age 0 to 90. I have family floater plan fo

22/06/2024

*एका सैनिकाच्या पत्नीची वटपौर्णिमा!*

*शहीद विक्रांत सबनीस यांच्या सुविद्य पत्नीने २-३ वर्षापूर्वी एका blog वर लिहिलेला भावूक लेख.*

*प्रिय विक्रांत,*
कसा आहेस?
मी ठीक.
सॉरी, काल लिहू शकले नाही.
काल आपल्या पियुची शाळा सुरु झाली. मागच्या आठवड्यात जमलं नाही, म्हणून काल रात्री तिच्या वह्या पुस्तकांना कव्हर्स घालण्याचा 'सोहळा’ पार पडला.
'सोहळा’च तो! कोऱ्या करकरीत पुस्तकांच्या सुवासाचं अत्तर शिंपडून पार पडणारा !
थोडक्यात...म्हणून काल लिहिणं जमलं नाही.

आज वटपौर्णिमा होती. तू 'गेल्या'नंतरची पहिली....
काल लोकलच्या डब्यात कुणीतरी विषय काढला.

मी गप्पांमधून अंग काढत ट्रेनच्या खिडकीतून दिसणाऱ्या काळोखात बघत बसले.
आपल्या लग्नापूर्वी तू सांगितलेला जोक आठवला - वटपौर्णिमेला बायका वडाजवळ काय मागतात ? - 'वडा-पाव' !
तुझ्या तोंडून प्रथम ऐकला तेव्हा केव्हढी हसले होते मी ! आठवतंय नं ?

आणखी एक प्रसंग आठवला.
*आपलं नुकतंच लग्न झालं होतं. माझ्या एकंदरीत 'उत्साहावरून' सासुबाईंनी माझं मन ओळखलं असावं. माझा हात धरून मला सोसायटीतल्या वडाजवळ घेऊन गेल्या. मला म्हणाल्या उद्या सकाळी आपल्याला इथे येऊन पूजा करायची आहे. मी म्हटलं 'माझा विश्वास नाही'.*
*तर म्हणाल्या,’या निमित्ताने वडाला नमस्कार करायचा. इतकी वर्ष इथे उभा राहून तो आपल्याला सावली देतोय त्याबद्दल त्याचे आभार मानायचे.*

*परंपरेपेक्षा मला ही कृतज्ञतेची भावना जास्त भावली.*
मी सासूबाईंबरोबर दर वर्षी पूजा करू लागले.

आज सकाळी पुजेची थाळी घेऊन वडाजवळ गेले. सोबत सासूबाई होत्या.
वडाजवळ उभी राहिले. बराच वेळ निःशब्द !

अचानक काय वाटलं माहित नाही -
*भरल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी वडाला एक salute ठोकला !*
*Afterall, तू मेजर होतास, विक्रांत !*

सासूबाई मला सावरायला म्हणून आल्या होत्या, पण आता त्यांचाच बांध फुटला.

आधीच सोसायटीतल्या बायकांनी मी तिथे गेल्यामुळे भुवया उंचावल्या होत्या.
आता तर मला ऐकू जाईल अशी कुजबुज सुरु झाली.
'हिला आणायचं का इथे ? सबनीस काकींना तरी कळायला हवं होतं!'
गर्दीतून कोणीतरी हळूच म्हणालं.

माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या त्या बायकांशी मला हुज्जत घालायची नव्हती, कारण मी काय करत होते याबद्दल मला विश्वास होता.

विक्रांत,
आपण या जन्मात भेटलो खरे -
पण तू 'मला असा' किती मिळालास?
पुढचे सात जन्मच काय- सगळे जन्म तू मला हवा आहेस...
हे, खरं तर, घरी बसून देखील मागता आलं असतं.
पण का कोणास ठाऊक, मला वडाजवळ जावसं वाटलं.
घरातल्या एखाद्या आजोबांसारखा असलेला तो वड माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल असं वाटलं.

त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की परंपरा-रूढी, प्रतीकं तुम्ही माना किंवा मानू नका ,
पण तुमच्या एकूण 'असण्याला'च या सगळ्या गोष्टी चिकटलेल्या असतात.

तू असतास तर मला वेड्यात काढलं असतंस कारण तुझा या कशावर विश्वास नव्हता.

पण एक सांगू ? विश्वास-अविश्वास या सगळ्याच्या पलीकडे एक प्रांत असतो.
मी त्याला 'instinct' म्हणते.
भिकाऱ्याला कधीही भीक न देणारे आपण एखादवेळी पट्कन कुणालातरी भीक देऊन मोकळे का होतो,
याला जसं लॉजिक नसतं तसंच काहीसं.
अशावेळी आपण फक्त आपल्या 'instinct' ने दिलेली आज्ञा पाळत असतो.

*सोळा डिसेंबरच्या रात्री बॉर्डरवर शत्रूशी चकमक झाली. फारशी कुमक जवळ नसताना तू कोणाच्या आज्ञेने लढलास आणि शहीद झालास?*
*Vikrant, you just followed your instinct !*

वटपौर्णिमेला मला वडाजवळ पूजा करताना पाहून शेरे मारणाऱ्या समाजाबद्दल मला राग नाही, पण गंमत वाटते.

*सो कॉल्ड प्रगतीच्या नावाखाली स्त्रियांच्या हातात सिगरेट आणि दारूचा ग्लास खपवून घेणारा समाज विधवा स्त्रीचा वड पुजण्याचा हक्क नाकारतो.*

*आपल्या मुलीबाळी गणेशोत्सवात 'शीला की जवानी' म्हणत नाचलेल्या चालतात, पण पिरियड्स चालू असलेल्या स्त्रीला देवघरात यायचा मज्जाव असतो !*
*हा paradox मला मान्य करावा लागतो*
तुम्ही ढीग शिका, पदव्या मिळवा, जग जिंका -

*माझ्यासारख्या एकट्या बाईला समाजात राहायचं असेल तर जगण्यातल्या या विसंगतीला पर्याय नाही.*

आर्मीत गेल्यानंतर तू आम्हा सिविलीयन्सना नेहमी नावं ठेवायचास. 'तुम्हाला जगण्याची शिस्त नाही' म्हणायचास.
नसेल आम्हाला शिस्त. *पण इथेही कुठलीही गोष्ट लढूनच मिळवावी लागते.*

*मी ही रोज लढते....*

*भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाचं रक्षण करण्यासाठी. माझ्या नवऱ्याने रक्त सांडलं या जाणीवेसह जगत राहण्याबद्दल कुठलं शौर्यचक्र मिळणार नाही हे माहित असून लढते*.

*पियु, सासूबाई आणि बाबांसमोर कणखर राहण्याचा जो मी 'अभिनय' करते त्याबद्दल कुठलंही award मिळणार नाही हे माहित असून लढते.*

*आपल्या पियुच्या न संपणाऱ्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरं देण्याबद्दल कुणी पाठ थोपटणार नाही हे माहित असून लढते.*

*I am a soldier, I fight where I am told, and I win where I fight !*
तूच म्हणायचास ना?

थांबते. पियुला गोष्ट सांगायची वेळ झाली.
उद्या भेटू.
बाय!
💐🙏

12/12/2023

सुंदरी

©® ज्योती रानडे

सुंदरी हे मेन रोडवरचं अतिशय प्रसिद्ध दुकान! लखलखणारी शोरूम, चकचकणारी दिव्याची झुंबरं आणि शीण घालवणाऱ्या एअर कंडीशनिंग मुळे बायकांचे पाय आपोआप दुकानाकडे वळत. अगदी साध्या कॉटनच्या साड्यांपासून पैठणी, कांजीवरम पर्यंत सर्व प्रकारच्या साड्या उत्तम दरात मिळत असत. बाहेरच्या काचेतून उभ्या केलेल्या आणि खऱ्या वाटणाऱ्या सडपातळ ललनांच्या सुंदर साड्या बघत लहान मोठे सर्व लोक थांबत असतं.

अशाच एका गर्दीच्या रविवार सकाळी ती सुंदरी मधे आली. दारा जवळच्या युनिफॉर्म मधल्या दरवानाने काचेचे दार उघडण्यापूर्वी तिला प्रश्न केला, “काय हवय आजी?”

”साड्यांचं दुकान आहे ना! साड्यांसाठीच आलेय" आजी म्हणाली.

दरवानानं तिच्या मोठाली पिवळी फुलं असलेल्या हिरव्या साडीकडे बघत दार उघडले. अशा शोरूम मध्ये तू का आलीस हा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

आजी आत गेली. मोठी पिवळी फुले असलेली बेताची हिरवी साडी, पायात जुन्या झिजलेल्या चपला आणि केसातून दिसणाऱ्या रुपेरी छटा असलेली आजी पाठीत वाकली होती. हातात एक कापडी पिशवी होती व त्यात एक पाण्याची बाटली दिसत होती.

दुकानात चार पाच सेल्समन होते आणि जवळ जवळ आठ दहा सेल्स गर्ल्स होत्या. त्यातले काहीजण गिऱ्हाईकाला साड्या दाखवत होते. बेताची गर्दी होती पण आजीकडे कुणाचच लक्ष गेले नाही. ती थोडावेळ संकोचाने तशीच उभी राहिली व नंतर एक सेल्समन खुर्चीवर बसून फोन मध्ये काहीतरी बघून हसत होता त्याच्याकडे गेली.

"सिल्कच्या साड्या दाखवता का हो ?" तिने विचारले.
फोन मधील नजर वर न काढता तो म्हणाला, " दुसरा मजला".
आजी म्हणाली, "जिना चढवणार नाही हो मला. इथेच दाखवा की."

त्याने त्रस्त चेहऱ्याने तिच्याकडे बघितले आणि तो म्हणाला, " लिफ्ट आहे की तिथं. लिफ्ट घेऊन जा ना बाई. सिल्क च्या साड्या कुणाला हव्या आहेत? तुम्हाला?" आणि तो हसला.

तेवढ्यात काउंटर वरचा मॅनेजर गायतोंडे त्याला म्हणाला, "आधी यांचे काम कर रे केशव." म्हणून त्याने नवीन आलेल्या गिर्हाईकाकडे बोट दाखवले. निळी जीन्स व पांढरा कुर्ता घातलेल्या त्या स्टायलिश तरुणीला केशव अदबीने विचारू लागला, "मॅडम, काय दाखवू?"
ती म्हणाली, “ I don't know. I never wear sarees. दाखवा pure silk वगैरे!

आजी हळूहळू चालत लिफ्ट कडे गेली. लिफ्ट मधून दुसऱ्या मजल्यावर गेली. वरच्या मजल्यावर काही सेल्समन कामात होते तर काही आराम करत बसले होते. आजीला बघून न बघितल्यासारखं करणारे बरेच होते. आजीला काय करावे समजेना. कुणाचेही तिच्याकडे लक्ष नव्हतं. आता मात्र आजीला राग यायला लागला.

ती मोठ्याने म्हणाली, " मला कुणी साड्या दाखवेल का?"
तिथली एक बाई काउंटर वरून म्हणाली," आजी या दुकानात भारीच्या मिळतात साड्या. तुम्हाला कितीपर्यंतच्या साड्या हव्या आहेत?"
तेवढ्यात एक चुणचुणीत, साधारण ३८-४० वर्षांची बाई आजी जवळ आली आणि म्हणाली, "आजी मी संगीता. या ना. काय दाखवू?"
आजीने सिल्कच्या साड्या मागितल्या. तिने पाच सहा सिल्कच्या साड्यांपासून सुरुवात करत जवळ जवळ १५-२० साड्या दाखवल्या. आजीने त्यातल्या दोन साड्या निवडल्या. तिने त्या उलगडून नेसून दाखवल्या. आजीशी गप्पा मारता मारता संगीताने तिच्या नातीचे लग्न आहे ही माहिती काढली. आणि एक ऑफ व्हाईट रंगाची साडी तिने आजीसाठी निवडली. आजीला ती साडी खूप आवडली. आजीने ती साडी पण विकत घेतली.

आजीनी संगीताला विचारलं, “ तू किती वर्षे आहेस इथे?
ती म्हणाली, “पाच वर्षे झाली की.”
“छान केलस ग काम माझं. दे या साड्या.” आजी म्हणाल्या.
संगीताने बोलता बोलता तिच्या मुलीच्या कॉलेज साठी ती पैसे जमवत आहे व त्यासाठी आणि एक नोकरी पण करत आहे हे आजींना सांगितले. "सगळंच महाग झालय ग!" आजी म्हणाल्या.

“आजी चला. आपण लिफ्ट मधून खाली जाऊ. मी आणते साड्या. खाली पैसे द्या. आणि काही लागले तर मला टेक्स्ट करा. तुमच्याकडे मोबाईल आहेच. हा नंबर घ्या म्हणजे तुम्हाला काय हवे ते मी तयार ठेवीन." आजी ने खुशीने मान हलवली.

दोघी खाली आल्या. मॅनेजर ने आजीकडे बघायला मान वर न करता बिल समोर ठेवले. तो संगीताला ओरडला,"लग्नाची खरेदी करायला आलेल्या त्या पाटील बाई खोळंबल्या आहेत संगीता. जा वर. गप्पा मारत बसू नको इथे."

आजीला ते वाक्य लागले. आजी म्हणाली, "अहो ती मला मदत करते आहे ना? तिला कशाला ओरडता?" मॅनेजर नी ऐकून न ऐकल्यासारखे केले.
आजी म्हणाली, "गायतोंडे साहेब तुमच्याऐवजी संगीता मॅनेजर हवी बघा."
मॅनेजर भडकला व म्हणाला, "आजी तुम्हाला काय माहीत आहे दुकान कसं चालवायचं ते? ही लोकं कामचुकार असतात.”

आजी एकदम ताठ उभी राहिली आणि म्हणाली, " गायतोंडे काय आणि कसे बोलत आहात गिऱ्हाईकाशी विचार करा. It won't be tolerated."

आजीनी रुपेरी केसांचा टोप काढून टाकला व हिरवी साडी काढून टाकली. आतमध्ये सिल्क चा उंची सलवार कमीज बघून गायतोंडे सकट सर्वजण चमकले. त्यांनी सारिका मॅडमला फोटोत, दुकानाच्या जाहिराती मधे अनेकवेळा बघितलं होतं.

"मी सारिका पेठे, सुंदरी शॉप्स ची CEO. मी सुंदरी च्या सर्व दुकानांमध्ये वेषांतर करून जाते आणि आपले दुकानाचं कामकाज कसं चाललय बघते. गिऱ्हाईकाच्या रूपात देव दुकानात येतो ही भावनाच आपल्या यशाचे रहस्य आहे.

पण या दुकानाच्या शाखेत व्यक्तीचे वय, कपडे, इंग्लिश भाषा आणि व्यक्तिमत्व यावरून त्याला कसे वागवायचे हे ठरवले जात आहे हे पाहून मला फार वाईट वाटले. गायतोंडे, आजपासून संगीता या दुकानाची मॅनेजर असेल. २५ लोकांच्या स्टाफ पैकी फक्त या एका मुलीने मला योग्य वागणूक दिली. I am so disappointed. केशव, तुमची आई दुकानात आली तर असेच बोलाल का तिच्याशी?
संगीता मला उद्या सकाळी माझ्या ऑफिस मध्ये येऊन भेट. तुझ्यासारखी माणसं कशी शोधायची आपण ठरवू. आणि तुझ्या मुलीच्या कॅालेजची जबाबदारी आता सुंदरी शॅाप्स ची. दोन दोन नोकऱ्या करण्यापेक्षा सगळे लक्ष इथेच दे. म्हणजे तुझे काम याहून उत्तम होऊ लागेल.”

संगीताने हात जोडले. “थॅ्क्यु मॅडम” ती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.

गायतोंडे, केशव, दरवान व बाकी सगळेच शरमून मान खाली घालून उभे होते. हे दुकान उघडलं तेव्हाही सरिता मॅडमनी परत परत सांगितलं होतं, “ गिऱ्हाईकाच्या रूपात देव दारात येतो. तो प्रसन्न झाला की बाहेर जाताना यश मागे ठेऊन जातो हे कधी विसरू नका."

आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, “सारिका मॅडम दुसरी संधी देतील का?”

©® ज्योती रानडे

12/07/2017

There are so many plans with LIC. but i have shown some of them for your kind perusal.

Address

91/G LIC Of India , MIDC Phase 1, Dombivli (east)
Dombivli
421203

Telephone

9920010882

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deepak BHAT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share