09/09/2018
निवृत्तीपश्चत नियोजनाची सुरुवात केव्हा करावी?
प्रदीर्घ काळ गुंतवणूक केल्याने परताव्यावर चक्रवाढ वृद्धीचा परिणाम दिसून येतो. उदाहरण म्हणून समजा एखाद्याने वयाच्या पंचविसाव्या वर्षी मासिक ५०००च्या गुंतवणुकीला सुरुवात केली तर साठाव्या वर्षी त्याचे २१ लाख गुंतलेले असतील. या गुंतवणुकीवर परतावा साल दर शेकडा १२ टक्के धरला तर या गुंतवणुकीचे साठाव्या वर्षी ३.२ कोटी जमतील. त्या उलट एखाद्याने काहीसे उशिराने म्हणजे वयाच्या ३५व्या वर्षी थोडी अधिकची म्हणजे दरमहा ७००० गुंतवणूक सुरू केली तर या व्यक्तीचेही वयाच्या ६०व्या वर्षांपर्यंत २१ लाख गुंतविले जातील. मात्र या गुंतवणुकीवर १२ टक्के असा सारखाच परतावा दर गृहीत धरला तरी ६० व्या वर्षी तिचे १.३ कोटी रुपयेच जमा होतील. म्हणून गुंतवणुकीस जितका उशीर कराल तितके अंतिम परताव्यात नुकसान होईल. म्हणून नोकरीस सुरुवात करता क्षणीच निवृत्तीपश्चातच्या गुंतवणुकीला सुरुवात करणे फायद्याचे आहे.
एचडीएफसी रिटायरमेंट सेिव्हग्ज फंड हा एका विशिष्ट ध्येयासाठी गुंतवणूक साधन म्हणून उपलब्ध झाला असून त्या ध्येयासाठी बचत करणारा फंड आहे. आमचा असा अनुभव आहे की, बहुसंख्य गुंतवणूकदार आपल्या वित्तीय ध्येयाची पूर्तता होत नाही किंवा त्या ध्येयाची समयसीमा जवळ येत नाही तोपर्यंत आपली गुंतवणूक सुरू ठेवतात. बहुतांश ज्या ध्येयासाठी ही बचत केली त्याचसाठी ती वापरतात, हे विशेष नमूद करावेसे वाटते. बाजारातील तेजी-मंदीचा या योजनांवर परिणाम होत नाही.
योग्य आर्थिक नियोजना साठी भेट द्या
Financial Advisor
अमित अनिल पाटील
पंजाब नॅशनल बँकांच्या वर
चिखली रोड, बुलडाणा
९७६४६५६५५६
सर्व कंपनीच्या Mutual Fund ची माहिती व कामे केल्या जातील.