06/06/2026
* #सुवर्णदिनी*
* #सुवर्णक्षणी*
*अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सालाबादप्रमाणे या १५ व्या वर्षी देखील जय शिवराय प्रतिष्ठान कडून अठरा पगड जाती व बारा बलुतेदार मावळ्यांकडून पवित्र नद्यांच्या पाण्यानी जलाभिषेक व मिठाईवाटप करण्यात आला*.*
या कार्यक्रमासाठी मान्यवर आमदार श्री. राजाभाऊ राऊत, पंचायत समिती सभापती सौ. मिनाक्षी (ताई) रोंगे नगरसेवक श्री. विजय नाना राऊत उपनगराध्यक्ष श्री रोहित पाटील नगरसेवक श्री. संदेश काकडे नगरसेवक श्री. दीपक आबा राऊत नगरसेवक श्री. मदन गव्हाणे मराठा सेवा संघाचे - संतोष मोळवणे साहेब प्रा किरण गाढवे सर,रावसाहेब यादव, कल्याण घळके, महेश देशमुख,किरण कोकाटे सर,छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री अजय पाटील.वसंत (मामा) हवालदार, शंकर वाघमारे, सौ. शैलजा गिते मॅडम,सौ शितल मांजरे पाटील मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, शिवप्रेमी संघटनेचे पदाधिकारी, प्रत्येक समाज घटकातील प्रतिनिधी,पत्रकार,पोलीस बांधव महिला,युवक, इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जलाभिषेक करून पुष्पहार घालून जय शिवराय प्रतिष्ठान कडून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली, तसेच मिठाईवाटप करण्यात आला याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये व जय शिवराय प्रतिष्ठान मध्ये कार्य करणाऱ्या स्व बाबासाहेब बारकुल यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या परिवारावर कोसळलेला दुःखाचा डोंगर आर्थिक स्वरूपात बाजूला करण्यासाठी बारकुल परिवाराला १३७००० रुपये परिवाराच्या एक वर्षाच्या उदरनिर्वाहासाठी कर्तव्य मदत निधी देण्यात आला.
यावेळी आठरा पगड जाती आणि बारा बुलुतेदार समाजातील अनेक समाजबांधव उपस्थित होते, यावेळी मा आमदार राजाभाऊ राऊत यांनी मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करत असताना छत्रपती शिवरायांचा विचार समाजात रुजला पाहिजे आणि १८ पगड जाती १२ बलुतेदार यांना एकत्र करून ज्या पद्धतीने जय शिवराय प्रतिष्ठान काम करत आहे त्याच पद्धतीने समाजातील सर्व समाज बांधवांनी समाज हिताच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एकत्र आलं पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त करत जय शिवराय प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केला*
व शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात संपन्न झाला.*या वेळी शिवभक्त व जय शिवराय प्रतिष्ठान सदस्य उपस्थित होते*🙏🏻 या कार्यक्रमासाठी परिश्रम कार्याध्यक्ष राहुल वडेकर उपाध्यक्ष सुमित नागटिळक सचिव गणेश वाणी सहसचिव किरण नान्नजकर कोषाध्यक्ष विनायक हांडे संचालक संकेत वाणी कार्यकारणी उपाध्यक्ष सुहास गुंड कार्यकारणी सचिव विनीत नागोडे व जय शिवराय प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.