DHAN

DHAN Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DHAN, Financial planner, Baramati.

27/07/2024

पटलं तर शेअर करा,

भारतीय कुटुंबामध्ये साधारण चार ते पाच लोक असतात. नवरा, बायको, एक किंवा दोन मुले व आजी आजोबा, यामध्ये कमावती व्यक्ती एक किंवा दोन असतात. घरातील कोणताही निर्णय घेताना सगळ्यांची मते विचारली जातात पण निर्णय मात्र कमावणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार होतो. कुटुंबामध्ये कमावणारी व्यक्ती एक किंवा दोन पण खाणारे तोंडे चार ते पाच.

आज आपल्या देशामध्ये
शासन गरिबांसाठी खूप वेगवेगळ्या योजना आणत आहे. रेशन कार्ड वर खूप कमी दरामध्ये धान्य मिळत आहे वेगवेगळ्या योजनांमधून वेगवेगळे अनुदान मिळत आहेत. तसेच आता नवीनच सुरू झालेले लाडकी बहीण योजना सहज सुरू झालेली आहे त्याचबरोबर विकासाची कामेही खूप होतात आणि ह्या सर्वांचा सर्वांचा होणारा खर्च हा शासन आपल्या तिजोरी मधून करत आहे त्या ज्या तिजोरी मध्ये शासन स्वतः पैसे छापून ठेवू शकत नाही. तो पैसा मात्र वेगवेगळ्या कर प्रणालीतून जसे की इन्कम टॅक्स, जी एस टी व तत्सम टॅक्सेस मधून हा पैसा येतो. सरकारच्या म्हणण्यानुसार हे टॅक्सेस बनणारे लोक अंदाजे आठ ते दहा करोड आहेत म्हणजे कमावणारे लोक हे आठ ते दहा करोड आहेत व याचा उपभोग घेणारे 140 करोड लोक आहेत. ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये कमावणारे व्यक्ती एक किंवा दोन असतात व त्याचा उपभोग घेणारे चार ते पाच जण असतात.

आपल्या देशात ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस हे टॅक्स भरणारे खूप कमी लोक मतदानास जातात. भारत देशातील 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती एक मत देऊ शकते भले तो टॅक्स भरत असेल किंवा नसेल. निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी फक्त मतांची संख्या कोणाला जास्त आहे हे पाहिले जाते ते मत टॅक्स भरणार आणि दिले आहे हे तर कोणी दिले आहे हे पाहिले जात नाही.राजकारणी लोक या गोष्टीचा गैरफायदा घेऊन सामान्य गरीब लोकांना कवडी मोलाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या योजना देऊन त्यांचे मते मिळवून निवडून येतात. आणि येथूनच सरकारमध्ये भ्रष्टाचार व चुकीच्या गोष्टी सुरू होतात आणि आपण फक्त यावर चर्चा करतो की सरकार केव्हा सुधारणार, देश केव्हा सुधारणार.
जसे कुटुंबामध्ये कमावणाऱ्या व्यक्तीच्या मतानुसार सर्व गोष्टी होतात त्या पद्धतीने जर नवीन सरकार निवडताना फक्त टॅक्स भरणारेच मते मत देतील असे ठरले तर राजकारणी लोक गरीब लोकांना मतासाठी आम्ही ते दाखवू शकणार नाही तर तेच राजकारणी लोक टॅक्स भरणाऱ्या लोकांसाठी चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न करतील. सरकारच्या तिजोरीत येणाऱ्या पैशाचा योग्य वापर होईल व देशाला हितकारक असणाऱ्या योजनांवर जास्त खर्च होईल तसेच टॅक्स भरणाऱ्यांना सुद्धा फायदा होऊ शकतो. निवडणुकीमध्ये योग्य तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढेल.
वरील गोष्टीचा विचार करून प्रत्येक टॅक्स पेअर व आयटी रिटर्न भरणाऱ्यांनी सरकारला अपील केले पाहिजे की फक्त भरणाऱ्यांनाच निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा.
पटलं तर शेअर करा,
दिपक चांगण मो. 7757082498

16/11/2021
30/05/2021

*मेडीक्लेम/ आरोग्य विमा/ हेल्थ इंशुरन्स ची आवश्यकता का आहे ???*

*१) अचानक येणाऱ्या आजारात आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही.*

*२) कुटुंबातील कोण आणि केंव्हा आजारी पडणार हे माहित नसते.*

*३) हॉस्पिटलच्या बिलात सवलत मिळेलच हे माहित नाही, मात्र मेडीक्लेम काढलेला असलेस हॉस्पीटल मधे जी तातडीची व अत्त्युच्च दर्जाची ट्रिटमेंट व सेवा मिळते त्याला तोड नाही. कोणत्याही नातेवाईकास न विचारता अत्यावश्यक उपचार तातडीने केले जातात.*

*४) डॉक्टरांना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु नाही करू शकत. मात्र मेडीक्लेम असलेस सर्वप्रथम रुग्णावर उपचार सुरु होतात.*

*५) पेशंट च्या वेदना आपण बघू नाही शकत*

*६) मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार करावा लागु शकतो.*

*७) आपल्या व्यवसायाचे पैसे हॉस्पिटलच्या खर्चासाठी वापरले तर भांडवलाची अडचण आलेने व्यवसाय बंद पडू शकतो .*

*८) आजारी पडणे वा अपघात होणे हे आपल्याला पुर्वकल्पना न देता होणाऱ्या घटना आहेत.*

*९) पुर्वीप्रमाणे कमी पैशात आजार बरे नाही होवू शकत नाहीत, मात्र मेडीक्लेम असलेस विचारच करावा लागत नाही.*

*१०) मेडीक्लेम विमा घेऊ नको सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत नाही करू शकत, तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम विमा राहिला असता तर कुठे पैसे बघण्याची वेळ आली नसती*

*११) मेडीक्लेम विमा असल्याने आपले भविष्यातील नियोजन डळमळीत होत नाही, जसे मुलांचे शिक्षण, मुलांची लग्नकार्य, मुलांना व्यवसायासाठी लागणारे सुरुवातीचे भांडवल वगैरे.....*

*१२) मेडीक्लेम व लाईफ इंशुरन्स या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत व जीवनातील रोटी, कपडा और मकान इतक्याच महत्वाच्या आहेत. लाईफ इंशुरन्स एकाच्या नसतेवेळी कुटुंबाची आर्थिक बाजु सक्षमतेने सांभाळतो तर मेडीक्लेम एकाच्या ना कमावत्या कालावधीत साथ देतो. त्यामुळे विम्याचे दोन्ही प्रकार तेवढेच महत्वाचे आहेत.*

*मेडिक्लेम कोण घेऊ शकत ???*

*१) ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे.*
*२) जो आपल्या घरात आर्थिक सुख शांती बघू शकतो*
*३) पती-पत्नी, पती-पत्नी- मुल, फक्त स्वत:, वय ६५ पर्यंत विना वैद्यकिय चौकशी होता विनासायास मेडीक्लेम मिळतो.*

*मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो ????*

*जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम विम्याची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम भेटणार नाही. आणि जरी भेटला तरी आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.*

*कायम लक्षात ठेवा:- Health is wealth
For more information call
Dipak Changan 7757082498

18/09/2020
15/09/2020

परमार्थ कि स्वार्थ
एखाद्या गोष्टीचा फायदा आपणास व्हावा हि इच्छा असणे म्हणजे स्वार्थ व स्वतःच्या फायद्या तोट्याचा विचार न करता, सर्वांच्या फायद्याचे काम करणे म्हणजे परमार्थ हे रूढार्थाने सर्वमान्य आहे. एखाद्या व्यक्ती संदर्भात आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे जसे कि अपघात, गंभीर आजारपण, नैसर्गिक आपत्ती, आकस्मिक मृत्यू यामुळे जबरदस्त आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा प्रसंगी समाजातील इतर व्यक्ती सहानुभूतीने संकटग्रस्त व्यक्तीस मदत करण्याचा प्रयत्न करतात. पण हि सर्व मदत संकटग्रस्त व्यक्तीचे संपूर्ण नुकसान भरून निघेल याची शाश्वती नसते. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे अशी संकटे कुणाच्या आयुष्यात केव्हा येईल हे अनिश्चित आहे. अशा परिस्थितीत नुकसान भरपाईची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. एक उदाहरण पाहू, समजा १०० व्यक्तींनी एकत्र येवून प्रत्येकी रु १०००/- वर्गणी गोळा करून एक सामाईक निधी करून यातून १०० पैकी ज्या व्यक्तीवर संकटे येतील त्यांना आकस्मिक घटनेमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई म्हणून देता येऊ शकते. या समुहातील प्रत्येकाने वर्गणी देऊन संकटग्रस्त व्यक्तीस मदत करणे म्हणजे परमार्थ व स्वतःवर संकट आले तर त्याची भरपाई मिळण्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वार्थ एकत्रित साधण्याची संधी निर्माण होते. हेच मुलभूत तत्त्व वापरून विमा व्यवसाय चालतो.

दिपक चांगण, बारामती.
मो. नं. 7757082498

Address

Baramati
413133

Telephone

+917757082498

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DHAN posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to DHAN:

Share