20/10/2021
*तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनी लाच पैसे मिळतील का ???*
वरील प्रश्नाचे उत्तर तुम्ही "Of-cource !" असेच द्याल पण तरीही पुन्हा विचारतो !
तुम्ही तुमच्या आयुष्यात फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स मध्ये पैशे टाकले असतील पण तुमच्या नंतर हे पैशे तुमच्या नॉमिनीला मिळतील याची तुम्हाला खात्री आहे का ?
*'Nomination' बद्दलच्या कायद्याची तुम्हाला माहिती आहे का ?*
तुम्ही आयुष्यात ज्यांच्यासाठी मेहनत घेता, काबाड कष्ट करता, इन्वेस्टमेंट करत असता, ती असतात तुमची मूल, बायको, आई, बाबा आणि भावंड, जर आपल्याला काही झाले तर तुम्ही यामधील कुणालातरी नॉमिनी सुद्धा केलेलं असत पण तुमच्या नंतर पूर्ण पैसा तुमच्या नॉमिनीलाच मिळेल का ?
*तर उत्तर आहे - नाही*
शॉकिंग ???
खालील उदाहरण पहा !
महेश हा ५५ वर्षाचा माणूस आहे ज्याचे आपल्या मुलांशी अजिबात पटत नाही. महेशने आपली इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड मधील संपूर्ण मिळकत बायको च्या नावे नॉमिनी म्हणून ठेवलेली आहे.
अचानक महेशचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यातच त्याच निधन होत. त्याने बायकोलाच नॉमिनी ठेवलेलं होत पण मूल संपत्ती साठी कोर्टात गेली, कोर्टाने इन्शुरन्स व म्युच्युअल फंडातील संपत्तीचे बायको आणि मुलांनमध्ये समान भाग केले. आणि त्याच्या बायकोच्या वाट्याला छोटासा हिस्साच फक्त आला !
असे का झाले ?
महेशने बायको ला नॉमिनी ठेवले होते पण त्याने *'legal Will'* बनवले नव्हते. त्यामुळे त्याच्या नंतर त्याच्या संपत्तीची वाटणी ही *'Succession Law'* (वारसा हक्क) नुसार झाली आणि सर्व *'Legal Heir'* (वारसदार) मध्ये समान वाटणी झाली.
*'Succession Law' समजून घ्या !*
'Succession Law' नुसार नॉमिनी हा फक्त असेट्सचा (पैशाचा) Trustee आहे, *मालक नाही*. त्याचे काम हे फक्त नॉमिनेटेड मालमत्तेची काळज़ी घेऊन ती legal Heirs ला सुपुर्द करण्यापर्यंत मर्यादित आहे.
नॉमिनी अस्सेट ला होल्ड करू शकतो पण अस्सेट (पैशाचे) चे खरे मालक हे तुमचे 'Legal Heir' च असतात.
मग 'Legal Heir' कोण असतात?
'Legal Heir' ते असतात जे Succession Act मधे नमूद केलेले आहेत.
जर तुम्ही *Will* बनविली असेल तर मात्र संपत्तीचे वाटप *Will* नुसार होते आणि जर तुम्ही *'legal Will' नाही बनवली* आहे तर 'Succession Law' नुसार तुमचे 'Legal Heir' ठरवले जातात.
'Succession Law' चे कायदे