YES Ambajogai

YES Ambajogai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from YES Ambajogai, Nagar parishad Ambjogai, Ambajogai.

24/04/2018
अंबाजोगाईचे वनपाल शंकर वरवडे यांचा मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान..▪ वन खात्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल वरव...
24/03/2018

अंबाजोगाईचे वनपाल शंकर वरवडे यांचा मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान..

▪ वन खात्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल वरवडे यांना सुवर्णपदक

अंबाजोगाई : बीड वन विभागातील परळी वनपरिक्षेत्र विभागा अंतर्गत येणाऱ्या अंबाजोगाई वन परिमंडळ येथील वनपाल व बीड जिल्ह्यातील नांदूरघाट येथील सुपुत्र शंकर गणपत वरवडे यांनी सण 2016-17 या सालात वन व वन्यजीव व्यवस्थापन या कार्य प्रकारात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने शंकर वरवडे यांना मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वन, वित्त व नियोजन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते सुवर्ण पदक व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आल्या मुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

वनसेवेतील अधिकारी व कर्मचारी यांनी पाच वर्षात वनसरक्षणाचे केलेले प्रभावी कार्य व वन सेवेतील वन व वन्यजीव संरक्षण तसेच व्यवस्थापण, वनसेवेतील कार्या साठी दिलेले योगदान, उत्कृष्ट कार्य या बद्दल महाराष्ट्राच्या वन विभागाच्या वतीने राज्यभरातील प्रत्येक पदासाठी सुवर्ण, रजत व कांस्य पदक या साठी निवड करून त्यांना सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराची निवड करताना वन विभागाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख यांच्या मार्गदर्शना खाली एक समिती नियुक्त करण्यात आलेली असते व या समितीने बीड वन विभागातील परळी वनपरिक्षेत्र विभागा अंतर्गत येणाऱ्या अंबाजोगाई वन परिमंडळ येथील वनपाल व बीड जिल्ह्यातील नांदूर घाट येथील सुपुत्र शंकर गणपत वरवडे यांनी सण 2016-17 या साला सह मागील पाच वर्षात वन व वन्यजीव व्यवस्थापन या कार्य प्रकारात वनपरिमंडल अंबाजोगाई येथे राज्य पर्यटन योजने अंतर्गत रेणुका देवी व मुकुंदराज वनक्षेत्राचा पर्यटन स्थळ म्हणून केलेला विकास, अंबाजोगाई वन परिमंडळात विविध योजने अंतर्गत 140 हेक्टर क्षेत्रावर पूर्व पावसाळी कामे करून 2 लक्ष रोपे लागवडीचे केलेले यशस्वी नियोजन व पूर्ण केलेली कामे, या परिमंडळात संयुक्त वन व्यवस्था पन समित्यांच्या बैठका घेऊन विविध लाभार्थ्यांना एल. पी. जी. गॅस व दुभती जनावरे उद्दिष्टा प्रमाणे केलेले वाटप, वन परिमंडळात गस्त करून अवैध वृक्ष तोड व अवैध वाहतुकीबाबत गुन्हे नोंदवून आरोपी कडून वसुल केलेली 87 हजार नुकसान भरपाई, वन्य जीव प्रगणने मध्ये वनस्पती सर्वेक्षण व वन्य प्राण्यांची माहिती संकलित करून वन्यजीव व्यवस्थापणाचे पार पाडले कार्य या सर्व बाबींचा आढावा घेऊन जे उत्कृष्ट कार्य केले आहे त्या कार्या बद्दल महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने शंकर वरवडे यांची सुवर्ण पदकासाठी निवड करण्यात आली.

या निवडी मुळे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने शंकर वरवडे यांना मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वन, वित्त व नियोजन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते व पशु व दुग्ध विकास मंत्री मा. ना.महादेव जानकर, आ. लोढा, वन विभागाचे मुख्य सचिव मलिक साहेब यांच्या सह राज्याच्या वनविभागाचे सचिव विकास खारगे, राज्याच्या संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक जीत सिंग, वन बल प्रमुख श्री. भगवान यांच्या उपस्थिती मध्ये सुवर्ण पदक व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आल्या मुळे वनपाल शंकर वरवडे यांचे बीड वनविभागिय अधिकारी ए. आर सातपुते, परळी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे वनरक्षक तोंडे, बिल्पे, नागरगोजे क्लार्क बिरारे यांच्या सह मित्र परिवार, नातेवाईक यांनी स्वागत केले आहे.

Happy Friendship day..YES Ambajogai
06/08/2017

Happy Friendship day..
YES Ambajogai

05/06/2017
ग्रीन आर्मी ( हरितसेना ) रजिस्ट्रेशन बाबतआपल्याला सूचित करण्यात येते की, शासनाने येणाऱ्या 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड ह...
06/05/2017

ग्रीन आर्मी ( हरितसेना ) रजिस्ट्रेशन बाबत

आपल्याला सूचित करण्यात येते की, शासनाने येणाऱ्या 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम हाती घेतला आहे.

त्या करीता महाराष्ट्र वनविभाग कार्यरत आहे, तरी या कार्यक्रमात सर्वांचा सहभाग व्हावा या करीता ग्रीन आर्मी ( हरितसेना ) नावाचा एक पोर्टल तयार करण्यात आला आहे.

या पोर्टल मधे आपना सर्वांचा रजिस्ट्रेशन करायचा आहे. जसे की PCCF, APCCF, CCF, CF, ACF, DFO, RFO, RO, Beat Gaurd, Vanmajur, Data Entry Operator's, सर्व सामान्य जनता, शाळेतील विद्यार्थी, कॉलेज चे विद्यार्थी, आपली फॅमिली, आपले मित्र परिवार आणि सर्व असे करुण 1 कोटि च्या वर लोकांचे रजिस्ट्रेशन करायच आहे.

रजिस्ट्रेशन करने अगदी सोपे आहे, आपण www.mahaforest.nic.in वर जाऊन Green Army Registration CLICK HERE
ला सेलेक्ट करावे. किंवा greenarmy.mahaforest.gov.in वर नोंदणी करू शकता

*अंबाजोगाई परिसरात बिबट्या आढळला*▪ *परिसरात वनसंपदा वाढल्याचे शुभसंकेत*अंबाजोगाई : तालुक्यातील येल्डा परिसरात आज दुपारी ...
29/04/2017

*अंबाजोगाई परिसरात बिबट्या आढळला*

▪ *परिसरात वनसंपदा वाढल्याचे शुभसंकेत*

अंबाजोगाई : तालुक्यातील येल्डा परिसरात आज दुपारी बिबट्या आढळून आल्याचे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. मात्र बिबट्याचा वावर म्हणजे परिसरात वनसंपदा आणि पशुधन वाढल्याचे लक्षण असल्याचा दावा वनाधिकाऱ्यांनी केला.

अंबाजोगाईपासून सहा किमी अंतरावर असलेल्या येल्डा परिसरातील शेंडगे वस्तीत आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सर्जेराव शेंडगे, व्यंकटेश चामनर, अशोक खोडवे, तुकाराम शेंडगे, कालिदास खोडवे या ग्रामस्थांनी बिबट्यास पाहिले. क्षणार्धात तो नजरेआड झाला आणि नंतर ओढ्याशेजारील झाडीत लपून बसला. सुरूवातीस हा वाघच आहे अशी अफवा पसरली. याची खबर मिळताच वनविभागाचे अधिकारी शंकर वरवडे, जी.बी. कस्तुरे आणि वनसेवक ज्ञानोबा हेडे तातडीने येल्ड्याकडे रवाना झाले आणि पाळत ठेऊन पाहणी केली असता त्यांना सदर प्राणी बिबट्या असल्याची खात्री झाली. गर्दी वाढताच बिबट्या पुन्हा शेजारच्या वनपरिसरात निघून गेला. मागील महिनाभरात बीड जिल्ह्यात बिबट्या दिसण्याची हि दुसरी वेळ आहे. मागील महिन्यातच आष्टी तालुक्यात बिबट्या आढळून आला होता, परंतु दोन दिवसातच तो निघून गेला.

दरम्यान, बिबट्याची उपस्थिती म्हणजे अंबाजोगाई परिसरातील वनसंपदा वाढल्याचे शुभलक्षण असल्याचा दावा वनाधिकाऱ्यांनी केला. सहसा बिबट्याचा वावर वनसंपदा आणि तृणभक्षी प्राणी असलेल्या क्षेत्रात असतो. अंबाजोगाईच्या आजूबाजूला विपुल वनसंपदा तर आहेच, परंतु हरिण, रानडुक्कर अश्या शेतीची नासधूस करणाऱ्या प्राण्यांचीही प्रचंड संख्या आहे. हेच प्राणी बिबट्याचे प्रमुख भक्ष्य आहे. बिबट्याच्या आगमनामुळे शेतकऱ्यांचे शत्रू असलेल्या हरीण, रानडुकरांच्या त्रासापासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा वनाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे बिबट्या आल्यामुळे घाबरून जाऊ नये. बिबट्या सहसा मनुष्यप्राण्यावर हल्ला करत नाही, त्यामुळे त्याचा पाठलाग करू नका अथवा त्याला छेडू नका असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे. जर एखाद्यावेळेस बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला तर त्याचीही योग्य ती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यास मिळेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

▪ *पाच वर्षापासून सुरू होता शोध*

अज्ञात प्राण्याने शेळी, मेंढ्या, गायीसारख्या फडशा पाडण्याच्या सततच्या घटनांमुळे पाच वर्षापासून या परिसरात वाघ असल्याची चर्चा होती. सदरील प्राणी पकडण्यासाठी वनविभागाने बुट्टेनाथ परिसरात पिंजराही लावला होता, पण तो प्राणी हाती आला नाही, जनावरांचे बळी जातच राहिले. नंतर काही दिवसा तडस आढळून आला होता. त्यानंतर आजच बिबट्या ठळकपणे समोर आला.

▪ *बिबट्याचा वावर हा शुभसंकेत*

"बिबट्या स्वत:हून माणसावर हल्ला करत नाही, त्यामुळे विनाकारण त्याला छेडू नये. उलट बिबट्याचा शेतकऱ्यांना फायदाच होईल. हरीण, रानडुक्कर आदी शेतीची नासधूस करणाऱ्या प्राण्यांना आळा बसेल. जर बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला तर त्याची नुकसानभरपाई देण्यात येईल."

- शंकर वरवडे, वन परिमंडळ अधिकारी अंबाजोगाई

YES Ambajogai चे सदस्य Dhananjay Gutte (पोलिस काॅन्स्टेबल किनगाव ) यांची पक्षी संवर्धन वरील मुलाखत साम टिव्ही वर दाखविण्...
22/03/2017

YES Ambajogai चे सदस्य Dhananjay Gutte (पोलिस काॅन्स्टेबल किनगाव ) यांची पक्षी संवर्धन वरील मुलाखत साम टिव्ही वर दाखविण्यात आली. त्याची YouTube लिंक https://youtu.be/-xAGT7e2yFc

www.saamtv.com Dhananjay Guttes Inspirational story of Saving Birds and Animals Link : https://youtu.be/-xAGT7e2yFc

राज्यस्तरीय 30 वे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन,अंबाजोगाई 2017 चे यशस्वी आयोजन करणारी टीम .......Yes Ambajogai.
09/01/2017

राज्यस्तरीय 30 वे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन,अंबाजोगाई 2017 चे यशस्वी आयोजन करणारी टीम .......
Yes Ambajogai.

निमंत्रण  निमंत्रण  निमंत्रण  अंबानगरी मध्ये प्रथमच ७ व ८ जानेवारी २०१७ रोजी होत असलेल्या ३० व्या महाराष्ट्र पक्षीमित्र ...
05/01/2017

निमंत्रण निमंत्रण निमंत्रण
अंबानगरी मध्ये प्रथमच ७ व ८ जानेवारी २०१७ रोजी होत असलेल्या ३० व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनसाठी सर्व अंबाजोगाईकरांना 'YES' (युथ एव्हायराॅनमेंटल सोसायटी) व वनविभाग बीड च्यावतीने आग्रहाचे निमंत्रण
'YES' हि संस्था अंबाजोगाईतील धडपड्या निसर्गप्रेमी आणि पक्षीमित्रांची संघटना आहे. पक्ष्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन, विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी पक्ष्यांची माहिती देणारी पुस्तिका असे विविध उपक्रम या संस्थेने राबविले आहेत. त्यासोबातच पक्ष्यांचे संगोपन, उन्हाळ्यात त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था, जखमी पक्षांवर उपचार आदी कार्य देखील हि संघटना करते. वनविभागातर्फे केल्या जाणाऱ्या पक्षी प्रजाती गणनेतही या संस्थेने वनविभागाला मोलाचे सहकार्य केलेले आहे. महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संघटनेने या सर्व कार्याची दखल घेऊन ३० व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलना ची संधी 'YES' (युथ एव्हायराॅनमेंटल सोसायटी) ला दिली आहे
संमेलनसाठी वनविभाग बीड, नगरपरिषद अंबाजोगाई, योगेश्वरी शिक्षण संस्था, सर्व शिक्षण संस्था, मानवलोक,वसुंधरा सेवा प्रतिष्ठान,यूथ मिनिस्ट्री ,हेलपिंगहॅन्ड, हेमंत राजमाने सेवाभावी संस्था, पत्रकार संघ, दै विवेकसिंधु नगराध्यक्ष सौ रचना मोदी व सर्व नगरपरिषद सदस्य, सवागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, भाऊ काटदरे , शरद आपटे विभागीय वनअधीकारी, अमोल सातपुते, चंद्रशेखर वाडमारे यूथ एनव्हयरमेंट सेवाभावी संस्थेचे रत्नाकर निकम, शंकर कराड डॉ शुभदा लोहिया,राजेसाहेब किर्दंत,अभिजीत लोहिया विजय लोखंडे, अभिजित जगताप डॉ प्रशांत बगाडे संतोष कदम,मुन्ना सोमाणी सदानंद वालेकर सचिन सोमवंशी च्या वतीने अंबाजोगाईकरांना आग्रहाचे निमंत्रण व संमेलनसाठी येणाऱ्या पक्षीमित्राचे हार्दिक स्वागत

नविन वर्षाची सुरूवात स्वच्छता मोहीम आयोजित करून करूया अशी हाक YES Ambajogai ग्रुप ने दिली त्यास  अंबाजोगाई येथील विविध ग...
01/01/2017

नविन वर्षाची सुरूवात स्वच्छता मोहीम आयोजित करून करूया अशी हाक YES Ambajogai ग्रुप ने दिली त्यास अंबाजोगाई येथील विविध ग्रुप ने ( जेष्ठ समाज सेवक श्री नंदकीशोर मुंदडा , हेल्पींग हॅड , रोटरी क्लब , कै . हेमंत राजेमाने प्रतिष्ठान, युथ मिनीस्ट्री ) व अनेक शुभचिंतक मित्र यांनी प्रतिसाद देऊन मोलाची साथ दिली, त्या बद्दल आम्ही सदैव ऋणी राहूत .
Yes Ambajogai.

येस अंबाजोगाई आयोजित ३० वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन २०१७ निम्मित आयोजित अंतरशालेय रंगभरणं व चित्रकला स्पर्धा दै.  सक...
26/12/2016

येस अंबाजोगाई आयोजित ३० वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन २०१७ निम्मित आयोजित अंतरशालेय रंगभरणं व चित्रकला स्पर्धा
दै. सकाळ, दै.लोकमत, दै. दिव्यमराठी दै. विवेकसिंधू यांनी 'येस' अंबाजोगाईच्या उपक्रमास दिलेल्या प्रसिद्धीसाठी 'येस' अंबाजोगाई आभारी आहे

Address

Nagar Parishad Ambjogai
Ambajogai
431517

Telephone

+91 98602 68888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YES Ambajogai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to YES Ambajogai:

Share