Raigad DCC Bank - RDCC Bank

Raigad DCC Bank - RDCC Bank The Raigad District Central Co-operative Bank Ltd. Official Facebook Fan Page Raigad D.C.C. Wished to continue the same for the years to come......

Bank has gained confidence and support of its esteemed customers since last more than 50 years, sheer due to overall integrated development of the Raigad District through implementation of advanced technologies and innovative schemes coupled with prompt and courteous service.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सिईओ श्री प्रदीप नाईक यांना महाराष्ट्र शासन सहकार विभाग आयोजित महाराष्ट्र कोऑपरेटिव...
13/10/2016

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सिईओ श्री प्रदीप नाईक यांना महाराष्ट्र शासन सहकार विभाग आयोजित महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह समिट 2016 मध्ये 'बेस्ट लिडरशीप' पुरस्कार दिनांक 04.10.2016 रोजी मुंबई, हॉटेल ताज विवंता येथे महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचीव श्री देवरा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

देशातील बँकिंग संस्थेचे आर्थिक मुल्यमापन करून त्यांना त्यांच्या वार्षिक कामगिरीच्या आधारे गुणवत्ता मानांकन ठरवणारी संस्थ...
30/09/2016

देशातील बँकिंग संस्थेचे आर्थिक मुल्यमापन करून त्यांना त्यांच्या वार्षिक कामगिरीच्या आधारे गुणवत्ता मानांकन ठरवणारी संस्था नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कॉ-ऑप बॅंक्स आणि बँकिंग फ्रंटिअर्स यांजकडून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस यंदा दोन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

आर.डी.सी.सी.बँकेला राज्यातील सर्वोत्तम जिल्हा बँकेचा सन २०१५चा पुरस्कार  प्रदान                      प्रदीप नाईक यांना र...
20/02/2016

आर.डी.सी.सी.बँकेला राज्यातील सर्वोत्तम जिल्हा बँकेचा सन २०१५चा पुरस्कार प्रदान प्रदीप नाईक यांना राज्यातील बेस्ट बँकर सी.ई.ओ. म्हणून सन्मानित

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि.,मुंबई यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक या श्रेणीमधून बँकिंग क्षेत्रामधील सन्मानाचा प्रथम क्रमांकांचा कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळालेला असून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांना सर्वोकृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कै.बापूरावजी देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रेणीमधून त्यांची निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सातव्यांदा या पुरस्काराची मानकरी ठरणारी महाराष्ट्रातील पहिली बँक ठरली आहे. मुंबईमधील शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह येथे रिझर्व्ह बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एन.एस.विश्वनाथन, नाबार्डचे उपकार्यकारी संचालक आर.अमलोरपवनाथन, नाफकॅबचे अध्यक्ष डॉ.मुकुंद अभ्यंकर यांच्या हस्ते बँकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आर.डी.सी.सी बँकेला राज्यातील सर्वोत्तम जिल्हा बँकेचा सन २०१५ चा पुरस्कार जाहीर
28/12/2015

आर.डी.सी.सी बँकेला राज्यातील सर्वोत्तम जिल्हा बँकेचा सन २०१५ चा पुरस्कार जाहीर

सन २०१५ या वर्षीचा अविज पब्लिकेशन, कोल्हापूर आणि  ग्यालेक्झी कौन्सिलिंग प्रा. लि. पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा सहकारी ब...
15/10/2015

सन २०१५ या वर्षीचा अविज पब्लिकेशन, कोल्हापूर आणि ग्यालेक्झी कौन्सिलिंग प्रा. लि. पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा सहकारी बँकिंग क्षेत्रामधील राज्यस्तरीय जिल्हा सहकारी बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी बँकेला हा पुरस्कार मिळाला आहे. या कार्यक्रमामध्ये गोवा राज्याचे सहकार उद्योग व समाज कल्याण मंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आय टी विभाग प्रमुख मंदार वर्तक अकौंट विभागाचे महेंद्र माळी आणि गजानन हावरे उपस्थित होते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील अभ्यास दौरा संपन्न        रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...
16/09/2015

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील अभ्यास दौरा संपन्न

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कामगिरी आणि कार्यप्रणाली हा देशपातळीवरील कौतुकास्पद विषय झाला असल्याने भारतभरातील अनेक राज्यांमधून बँकर्स आणि बँकांचे शिष्टमंडळ यांची रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट आवर्जून देण्यात येत असते. याच कामगिरीची दखल घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुणे येथील कृषी बँकिंग महाविद्यालय यांनी आरबीआय ऑफिसर्ससाठी आयोजित केलेल्या ट्रेनिंगमधील अभ्यासदौरा म्हणून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवड केली. या कार्यक्रमासाठी कृषी बँकिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक योगेंद्र सेठी, के.सी.बडतया यांच्यासह चंदीगढ, कोलकाता, सिक्कीम, महाराष्ट्र, झारखंड आणि देशभरातील विविध राज्यांचे आरबीआयचे अधिकारी उपस्थित होते. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अकौंट विभागाचे मुख्य व्यवस्थापक व्ही. एस.पाटील, कर्ज आणि देखरेख विभागाचे उपमुख्य व्यवस्थापक मिलिंद वाड आणि प्रशासन विभागाचे उपमुख्य व्यवस्थापक अजित भगत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
गतवर्षी नाबार्डच्या वतीने आणि यंदा आरबीआयच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरचे एक दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम भरविण्याचा मान रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सातत्याने मिळत असून त्यामुळे बँकेची प्रतिमा देशपातळीवर उत्तुंग भरारी घेताना पाहायला मिळत आहे.
या प्रशिक्षण दौ-याचा मूळ उद्देश हा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताळेबंद पत्रक आणि आर्थिक व्यवस्थापन याविषयीची प्राथमिक माहिती यासंबधी होता. यामध्ये बँकेचे आय.टी.विभागाचे सिनियर व्यवस्थापक प्रकाश म्हात्रे यांनी याविषयी सादरीकरण केले.
आरबीआयच्या वतीने कृषी बँकिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक योगेंद्र सेठी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि रायगड जिल्हा बँकेने ज्या पद्धतीने आपले काम मनापासून आणि काळाला सुसंगत केले आहे त्याबद्दल बँकेचे आभार मानले तसेच त्याचे आपण सर्वांनी अनुकरण केले पाहिजे असे उपस्थित आरबीआयच्या इतर अधिका-यांना मार्गदर्शन करताना म्हटले शिवाय या बँकेमध्ये जी गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते ती गुणवत्ता संपूर्ण भारतामध्ये आपण पोहचविणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने रायगड जिल्हा बँक खूपच पुढच्या प्रवासात सामील झाली आहे असे म्हणून योगेंद्र सेठी यांनी रायगड जिल्हा बँकेचे कौतुक केले आणि बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आरडीसीसी बँक अभ्यास दौ-याच्या वेळी बँके विषयी माहिती सांगताना सिनियर व्यवस्थापक प्रकाश म्हात्रे, योगेंद्र सेठी, के.सी.बडतया आदी.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत वित्तीय साक्षरता जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन संपन्न                 नाबार्ड स्थापना दिनाचे ...
21/07/2015

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत वित्तीय साक्षरता जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन संपन्न

नाबार्ड स्थापना दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक नंदा सुरवसे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी बाळासाहेब पाटील, अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी विणा सुपेकर, लीड डेव्हलपमेंट ऑफिसर टी.मधूसूदन, आर सेटीचे विभागप्रमुख कुंभार, तंत्र अधिकारी गणेश बावडे आदी मान्यवर व बचतगटाच्या महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी सांगितले की पंतप्रधान जनधन योजना जिल्हयात चांगल्या पध्दतीने राबविली जात असून या योजनेचा लाभ अनेक लोकांनी घेतलेला आहे त्यामाध्यी आरडीसीसी बँकेचे चांगले योगदान असून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक यांचे त्यांनी कौतुक केले.शिवाय या योजनेत दोन लाख पेक्षा अधिक जनधन योजनेची खाती उघडली गेली असून याचा लाभ जिल्हयातील नागरिकांना मोठ्या संख्येने होणार आहे. जनधन योजनेबरोबरच अन्य योजनांचा नागरिकांनी चांगला उपयोग करून घेतला, तर त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही असेही ते म्हणाले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बँकेच्या विविध योजनांचे महत्त्व पटवून दिले.ज्यामध्ये शेतीसाठी शून्य टक्के दराने पीककर्ज , जिल्ह्यातील बचतगटांना व्यवसायाच्या संधीसाठी दिले जाणारे कर्ज आणि तसेच किसान क्रेडीट कार्डचे महत्त्व पटवून देताना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वित्तीय साक्षरतेचे कार्यक्रम जे.एल.जी.आणि बचतगटांच्या स्थापनेच्या माध्यमातून करत असून या सर्व योजना लोकांसाठीच आहेत याचा लाभ जिल्ह्यातील लोकांनी आणि अधिकाधिक शेतक-यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

वित्तीय साक्षरता या कार्यक्रमाअंतर्गत विविध योजनेवर शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक नंदा सुरवसे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये नाबार्डच्या असणा-या योजनांचा उल्लेख केला तसेच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नाबार्ड कार्यरत असून असे अनेक उपक्रम राबविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे त्यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केले. त्याचप्रमाणे एल.डी.एम.टी.मधुसूदन यांनी आपल्या भाषणामध्ये बँकेचे महत्त्व लोकांना पटवून दिले ज्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांनी सावकारापासून दूर राहून बँकेत आपल्या ठेवी ठेवाव्यात आणि सुरक्षित व्यवहार करावेत असे आवाहन केले.तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आयटी विभाग प्रमुख मंदार वर्तक, प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाबार्डच्या अधिकारी नंदा सुरवसे यांनी तर सूत्रसंचालन संदिप जगे यांनी केले.

Congratulations For Winning BANKING FRONTIERS AWARD 2014 - 1. Best CEO2. Best IT Head3. Best CBS Initiative4. Best NPA M...
05/11/2014

Congratulations For Winning BANKING FRONTIERS AWARD 2014 -
1. Best CEO
2. Best IT Head
3. Best CBS Initiative
4. Best NPA Management
5. Best Youth Customer Acquisitions

-- Raigad DCC Bank - RDCC Bank

15/08/2014

On Independence Day
Here’s wising our dreams of a new
tomorrow come true 4 us…
Now And ALWAYS!

HAPPY INDEPENDENCE DAY

-- Raigad DCC Bank - RDCC Bank

17/07/2014

सस्नेय नमस्कार ,

Raigad DCC Bank - RDCC Bank च्या आजपर्यंतच्या कार्याबद्दल आपले मत किवा सूचना नोंदवण्यासाठी खालील LINK वर CLICK करा.

LINK: https://www.facebook.com/rdccbank/reviews

धन्यवाद,

The Raigad District Central Co-operative Bank Ltd. Official Facebook Fan Page

India's First ATM Mobile Demonstration Van in DCCB Category.       Pradeep Naik Mandar Vartak Pratik Bana Prashant Naik
07/07/2014

India's First ATM Mobile
Demonstration Van in DCCB Category.



Pradeep Naik Mandar Vartak Pratik Bana Prashant Naik

03/06/2014

- धन्यवाद -

आपल्या उत्स्पुर्थ प्रतिसादा आणि प्रेमा मुळेच १०० Likes चा टप्पा आम्ही गाठू शकलो. आपले सहकार्य या पुढे हि आशेच लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना.

- Raigad DCC Bank - RDCC Bank

Address

Alibag
402201

Opening Hours

Monday 10am - 4pm
Tuesday 10am - 4pm
Wednesday 10am - 4pm
Thursday 10am - 4pm
Friday 10am - 4pm
Saturday 10am - 4pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raigad DCC Bank - RDCC Bank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Raigad DCC Bank - RDCC Bank:

Share